Category: मुंबई

Mumbai news

आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच

कुर्ला बस दुर्घटना प्रकरण मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांनी शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना तो फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मोरे याच्या जामीन अर्जावर शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओचा अहवालाचा दाखला देऊन मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. तसेच, जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी मोरे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला होता. दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चार करून आपल्याला जामीन मंजूर करण्याची मागणी मोरे याच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती.

मकर संक्रांतीला पतंग उडवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात, त्यामुळे याला ‘पतंगांचा सण’ असेही म्हटले जाते. मकर संक्रांती सणाच्या अगदी आधी,नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि /…

क्रीडा शिक्षक डॉ. भूषण जाधव सोलापूर महानगरपालिकाचे क्रीडा अधिकारी

कल्याण : कल्याणचे क्रीडा शिक्षक डॉक्टर भूषण जाधव हे सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी पदी नुकतेच रुजू झाले. तलवारबाजी या खेळाचे एनआयएस कोच असणारे डॉक्टर भूषण जाधव हे कल्याणच्या सेक्रेड हार्ट शाळेचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. तलवारबाजी या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मजल मारली. तलवारबाजीच्या या कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन ही नुकतेच गौरवण्यात आले होते. या सर्व कार्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेने त्यांची सरळ क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. मूळचे छत्रपती संभाजीनगर चे असणारे डॉक्टर भूषण जाधव यांनी लहानपणापासूनच डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी या खेळांमध्ये आपले करिअर करण्याचे आव्हान स्वीकारले. कुटुंबातूनही त्यांना या खेळासाठी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळाले.  त्यामुळेच त्यांनी तलवारबाजी या खेळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य स्पर्धां बरोबरच तलवारबाजी प्रशिक्षणासाठी विदेश दौरे ही केले. या खेळाचे एनआयएसचे पहिले प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी राज्यात मान पटकावला. तलवारबाजी या खेळामध्ये त्यांना डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे, सेक्रेड हार्ट स्कूलचे संचालक अल्बिन अँथोनी यांचे मार्गदर्शन लाभले. तर या निवडीबद्दल त्यांचे डॉ उदय नाईक, प्रा. लक्ष्मण इंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर, अविनाश ओंबासे, प्रताप पगार, राम म्हात्रे, विश्वास गायकर, विजय सिंग, महादेव क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 000000

 कचरा संकलनात हलगर्जीपणा

केडीएमसीकडून या 3 प्रभागातील कंत्राटदाराचा ठेका रद्द   कल्याण : कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केले जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रात सात प्रभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नविन खासगी एजन्सीचे कामही लवकरच सुरू होणार असून त्यानंतर हा सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बी, डी आणि जे या तीन प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत कचरा संकलनासाठी आर अँड बी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून जुन्या झालेल्या कचऱ्याचा गाड्या, सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या आणि नादुरुस्त असलेल्या गाड्यांमुळे या तिन्ही प्रभागांतील कचरा संकलनावर मोठा परिणाम झाला होता. या प्रभागातील कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याबद्दल अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यावर केडीएमसी प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला रीतसर नोटीसही बजावली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीच सुधारणा न झाल्याने अखेर या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. तसेच त्यांच्याऐवजी आता केडीएमसीच्या सफाई कर्मचारी आणि यंत्रणेकडूनच बी डी आणि जे प्रभागांमध्ये कचरा संकलन केले जाणार आहे. मात्र हे काम सकाळऐवजी दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेमध्ये केले जाणार असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रातील ए बी आणि सी हे तीन प्रभाग वगळता उर्वरित 7 प्रभगांतील कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया पद्धतीसाठी नविन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये या एजन्सीचे काम सुरू होणार असून त्यानंतर या सातही प्रभागातील सफाई कर्मचारी आणि इतर यंत्रणा केडीएमसी प्रशासनाकडून ए बी सी प्रभागांमध्ये वळवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर या तिन्ही प्रभागांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने साफ सफाई आणि स्वच्छतेचे नियोजन करणे शक्य होणार असल्याची महत्त्वाची माहितीही उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सर्व नविन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत ब, ड आणि जे प्रभागातील नागरिकांनी काही काळ कळ सोसून महापालिका प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे. तसेच कचरा संकलन करणारी गाडीला उशिरा झाल्यास रस्त्यावर, मोकळ्या जागेमध्ये किंवा उघड्यावर कचरा न टाकण्याचे करण्याचे आवाहनही उपायुक्त  अतुल पाटील यांनी केले आहे. 0000

सरपंच हत्याकांड प्रकरणी ‘ग्रामपंचायत बंद’ यशस्वी

मुंबई / रमेश औताडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी एक दिवस राज्यभरातील ग्रामपंचायत बंद करण्याचे आंदोलन केले. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बंद राहिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला असंतोष ग्रामीण महाराष्ट्रात दिसून आला. तसेच सरपंच व त्यांचे सहकारी कर्मचारी हेही त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर दिसून आले. सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचने नुसार राज्यातील सर्वच विभागात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा अशी मागणी केली. 0000

हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन

नवी मुंबई : स्वच्छतेइतकेच पर्यावरणाकडे लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमांना सुरूवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते असे शहरातील मुख्य रस्ते,…

पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा खो खो विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व सहसचिव डॉ चंद्रजीत जाधव आज मुंबईत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना पहिल्या खो-खो…

शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचवा-मंत्री आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास आजच्या भावी पिढीपर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केले. माणगाव येथे…

आर टी ई शाळांची सरकारकडे अडीच हजार कोटी थकीत गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

रमेश औताडे मुंबई : गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून सरकारने आर टी ई शाळांमधे २५ टक्के आरक्षण देत त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. मात्र त्या इंग्रजी शाळांना देण्यात…

शिवनेरी वरील ध्वजस्तंभा प्रकरणी.26 जानेवारी ला शेकडो देशप्रेमी करणार आंदोलन.

मंजुरी 125 फुट तरतुद दहा लाख.उभारला चाळीस फुट   राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर 125 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शासनाने दहा लाखांची तरतूद केली असताना…