Category: मुंबई

Mumbai news

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ओला-उबरचा आज संप

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाइक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियनने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.  तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.…

परीक्षा पे चर्चा… राजकारणात मुरलेल्या भल्याभल्या राजकारणांची ‘शाळा’ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणाच्या पलिकडे जात यंदाही देशातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षेचे टेन्शन दूर करण्यासाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची अशी शाळा घेतली.

शरद पवार निवडणूक लढविणार ? मविआकडून राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु ० राज्यसभेच्या सात जागा २ एप्रिलला रिक्त होणार  

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या रोज नवे वळण पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकारणाचे सारे संदर्भ बदलले असून त्यामुळ विविध राजकीय पक्षांच्या भुमिकाही सातत्याने बदलत…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली मुंबई : मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकतीच प्रदेश कार्यालयात आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अजित दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. दादा आमच्या मध्ये नाही असे आम्हाला जराही वाटत नाही. कारण की त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक सारीक लक्ष असायचे. दादांकडे कोणतेही काम घेऊन जा आम्हाला विसरायला व्हायचं पण दादा कधीच ते विसरायचं नाही आणि ते काम मार्गी लागलेला असायचा अशी एक आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महिला अध्यक्ष आरतीताई साळवी यांनी सांगितलं. या श्रद्धांजली महाराष्ट्र,मुंबई,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,वॉर्ड अध्यक्षा,व मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी ,वार्डाची कमिटी ,पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

 महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर मुंबई : राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोकणासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काजू लागवड केली जाते. सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर काजू लागवड असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला या उद्योगाचा मोठा आधार आहे. मात्र उत्पादनवाढ, प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण, बाजारपेठ विस्तार व निर्यात वाढ यासाठी स्वतंत्र धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करत काजू मंडळाच्या कार्यक्षेत्रात लागवड वाढ, उत्पादकता वृद्धी, संशोधन, प्रक्रिया उद्योगांना चालना, ब्रँडिंग व मार्केटिंग सक्षमीकरण यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, काजू बोर्डचे संचालक परशुराम पाटील यांनीही सदर विषयावर मंत्री नितेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्यातील काजू उद्योगास भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच संभाव्य उपाययोजना याबाबत सविस्तर मांडणी केली होती. त्यांच्या सक्रिय पुढाकारामुळे हा विषय शासन पातळीवर प्रभावीपणे मांडला गेला. मंत्री आणि काजू बोर्ड प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेत संबंधित विषयास मान्यता दिली आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढीस लागेल. तसेच महाराष्ट्राचा काजू उद्योग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक होण्यास मदत होणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे महाराष्ट्रासह, कोकणाच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे. काजू हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी व उद्योजकांना बळकटी देणे हे आमचे प्राधान्य आहे.” तसेच कोकणच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबद्दल काजू उत्पादक शेतकरी व उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा मुंबई, दि. ६ फेब्रुवारी – महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता गमावला आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे रविवार, ८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ रमेश औताडे मुंबई : श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो यांच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिझम नेटवर्किंग इव्हिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका…