Category: मुंबई

Mumbai news

क्रॉस मैदानावर रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या टी-२० स्पर्धेला दमदार सुरुवात उपशीर्षक :

उद्घाटन सोहळा बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर व प्रशिक्षक नौशाद खान यांच्या हस्ते संपन्न मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरुष/महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ ला आज १३ एप्रिल रोजी चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर…

राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप

कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिमच्या वतीने शनिवारी सत्कार सोहळा मुंबई,-  राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख ठणकावून सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि नव्या पिढीला प्रेरणेची ठिणगी मिळावी, या उद्देशाने कुणाल केरकर यांच्या संकल्पनेतून आयर्न पॅराडाईज जिमतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या या दमदार यशाची दखल घेत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या विद्यमाने हा सोहळा शनिवार, १८ एप्रिल रोजी मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज येथे रंगणार आहे. या सोहळ्यात केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा दिमाखदार गौरव केला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात भक्कम कामगिरी करणारे कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. याच मंचावर राष्ट्रीय पदक विजेत्यांसह आयर्न पॅराडाईजसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : हरमीत सिंग (किताब विजेता), उमेश गुप्ता (उपविजेता), रेखा शिंदे (महिला शरीरसौष्ठव), राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव)  नीलेश गुरव (मेन्स फिजिक) रौप्य पदकविजेते : गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) कांस्य पदक विजेता निलेश रेमजे विशेष गौरव प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य).

राजीव श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारला

राजेंद्र साळसकर मुंबई:राजीव श्रीवास्तव हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE), १९९० बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक पदवी मिळवली असून, त्यांना भारतीय रेल्वे मध्ये ३४ वर्षांहून अधिक समृद्ध आणि विविध क्षेत्रांतील अनुभव आहे. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) जसे की, उत्तर रेल्वे, रेल विकास निगम लिमिटेड, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे येथे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यभार स्विकारण्यापूर्वी, श्रीवास्तव हे उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) म्हणून कार्यरत होते.

आशाताईंनी सांस्कृतिक वारसा समृद्ध केला- मोदी मुंबई : “भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक…

ई-बाईक टॅक्सीचालकांना मंडळात सामावून घेणार !

ई-बाईक टॅक्सीचालकांना मंडळात सामावून घेणार ! मुंबई –  महामुंबईसह राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळामध्ये आता…

कृषी विभागाच्या योजनात शेतकरी, शासनालाही ‘चुना’?

कृषी विभागाच्या योजनात शेतकरी, शासनालाही ‘चुना’? योगेश चांदेकर पालघरः शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी खात्याची असते; परंतु राज्यात कृषी विभागातच सर्वाधिक गैरव्यहार होतात. योजनांचा निधी खर्च;परंतु कामेच नाहीत, कामे हाती घेतली, तर…

सुरांचा ‘साज’ हरपला…

सुरांचा ‘साज’ हरपला… ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन संपदा सावंत मुंबई – सप्तसुरांना आपल्या स्वर्गीय आवाजाने ‘साज’ चढवणाऱ्या ‘स्वरसाम्राज्ञी’ ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी  त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात…

भूराजकीय संकटामुळे भारतासाठी पीव्हीसी ही धोरणात्मक गरज

१३वी ‘विनाइल इंडिया २०२६’ जागतिक पीव्हीसी शिखर परिषद मुंबईत सुरू मुंबई : ‘विनाइल इंडिया २०२६’ या दोन दिवसीय जागतिक पीव्हीसी शिखर परिषद व प्रदर्शनाच्या १३व्या आवृत्तीचा शानदार शुभारंभ ९ एप्रिल रोजी…

लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभारणीला गती

२५० एकर जमिनीच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांची शिफारस मुंबई:‘लॉर्ड बुद्धा’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ स्थापन करण्यासाठी घेरा, पुरंदर, ता. पुरंदर (जि. पुणे) येथील गट क्र.५०,१५१,१९६ वनविभागाच्या अखत्यारीतील ७३६.६३ हेक्टर जमिनीपैकी २५० एकर नापीक,…

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी सावली येथे दुसऱ्या TBM च्या असेंब्लीला सुरुवात

मुंबई  : येथील घनसोलीजवळ सावली येथे जमिनीखाली सुमारे ३९ मीटर खोलीवर दुसऱ्या टनेल बोरिंग मशीन (TBM) ची असेंब्ली सुरू झाली आहे.  या TBM ची सुरुवातीची ड्राइव्ह जुलै २०२६ मध्ये सुरू होण्याची…