Category: मुंबई

Mumbai news

 यूपीआय वापरणाऱ्यांना आजपासून खास सुविधा

 रिझर्व्ह बँकेचा निर्णय, डिजिटल पेमेंटच्या कक्षेत नवी क्रांती मुंबई : आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण यूपीआय वापरतो, इतकी याची व्याप्ती आता विस्तारली आहे. डिजिटल पेमेंटच्या याच कक्षेत आजपासून नवी क्रांती येत आहे. आजपासून यूपीआय नियमांबाबत मोठा बदल झाला असून रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार यूजर्स आता कोणत्याही यूपीए अॅपचा वापर करून डिजिटल वॉलेटद्वारे पैसे देऊ शकतात. याचा सर्वात मोठा फायदा असा असेल की, कोणत्याही एकाच अॅपवर अजिबात अवलंबून राहावे लागणार नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण केवायसी म्हणजेच नो यूवर कस्टमर अपडेट करणे आवश्यक आहे. पीपीआयधारक त्यांचे इन्स्ट्रुमेंट जसे की गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीमसारख्या यूपीआय अॅप्सशी लिंक करू शकतात. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच फीचर फोन यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता यूपीआय १२३ पे वापरून १० हजार रुपयांपर्यंतचे यूपीआय पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. पूर्वी ही मर्यादा ५ हजार रुपये होती. रिझर्व्ह बँकेने यूपीआय ट्रान्सॅक्शन आणि वॉलेट पेमेंटच्या लिमिट बदलल्या आहेत. ही लिमिट वाढवण्यात आली आहे. नवीन नियमानुसार लोक आता यूपीआय १२३ पे वापरून ५ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतील. आता प्रीपेड वॉलेट फोन पे, यूपीआय आणि पेटीएम वापरणे सोपे झाले आहे, परंतु या नवीन नियमाचा फायदा घेण्यासाठी वॉलेटचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि वॉलेट अॅपशी लिंक असणे आवश्यक आहे. 000000

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या विजय वैद्य संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

 ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास; योगेश वसंत त्रिवेदी यांनी वाहिली आदरांजली   मुंबई : ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता. सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नांवाने संदर्भ ग्रंथालय सुरू होऊन ते चांगल्याप्रकारे कार्यान्वित होणे या माध्यमातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात सुरु करण्यात आलेल्या कै. विजय वैद्य संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन योगेश त्रिवेदी यांच्या आजच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे हे होते. पत्रकार कक्षात संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यासाठी अशोक शिंदे, नासिकेत पानसरे आणि प्रितम नाचणकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. हे तीनही या बाबतीत वैद्य यांचे मानसपुत्र म्हणावे लागतील, असेही त्रिवेदी यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात कार्यरत असलेले विजय वैद्य यांचे चिरंजीव श्री विक्रांत विजय वैद्य हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. नव्या पिढीतील पत्रकारांनी विविध संदर्भ ग्रंथ अभ्यासले पाहिजेत, वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्यासाठी त्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल आणि असे संदर्भ ग्रंथांचे संकलन करून वाचनालयांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विजय वैद्य यांच्या कार्याला आदरांजली ठरेल, असेही योगेश त्रिवेदी यांनी सांगितले. पत्रकार कक्षात झालेल्या या कार्यक्रमास संघाचे सदस्य आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती. या संदर्भ ग्रंथालयात अनेक प्रकारचे जवळपास १२०० ग्रंथ आहेत. या ग्रंथालय प्रक्रियेच्या पूर्णत्वाच्या कार्यात संघाचे सदस्य अशोक शिंदे, नासिकेत पानसरे, प्रितम नाचणकर यांनी सहभाग दिला आहे. विक्रांत वैद्य यांनी विधिमंडळ कामकाजातील नोंदी तसेच त्या संबंधित ग्रंथसंपदा ग्रंथालयात अधिक प्रमाणावर वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांनी विजय वैद्य यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच पत्रकारांनी एक क्षण तरी विजय वैद्य होण्याचा प्रयत्न करावा, पत्रकारितेतील आदर्श आजच्या पिढीने घेण्याची आवश्यकता विशद केली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय आधुनिक काळाशी सुसंगत करण्यासाठी तसेच ग्रंथसंपदा वाढविण्याचे प्रयत्न संघाच्या वतीने भविष्यात केले जातील, याची ग्वाही दिली. आभार संघाचे कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुयश पडते, विनया पंडित-देशपांडे, महेश पवार, अशोक अडसूळ आदी मान्यवर पत्रकार मंडळी देखील उपस्थित होती. 00000

थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये 320 जणांविरोधात कारवाई

कल्याण :   कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरुबअसून 31 डिसेंबर अनुषंगाने विहित वेळेपेक्षा सुरू असलेल्या 35 आस्थापनावर  कारवाई. तसेच उघड्यावर…

 ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे   मुंबई : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी उपस्थित होते. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला. ००००००

माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई : “किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाच्या विकासात…

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई : पुरस्कार प्राप्त मानकरी : मंगेश मोरे (दै. सामना), घन:श्याम भडेकर (ज्येष्ठ पत्रकार),सचिन लुंगसे (दै. लोकमत), विनोद राऊत (दै. सकाळ), पांडुरंग म्हस्के (दै. सकाळ) मुंबई, गुरुवार : मुंबई मराठी…

3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता…

राष्ट्रीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवड

कल्याण : ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मान्यतेने ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ३७ वी पुरुष व…

 थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

 थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर होणार कायदेशीर कारवाई   मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी केले. राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्या नंतर ३१ डिसेंबर पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्ष्यात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू  ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र ३१ मार्च २०२५ नंतर या योजनेला मुदत वाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असुन थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ९३८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास  कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रँचायझी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. असा लाभ घ्या संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा  एकदा नियमित  वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. -मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई 0000

आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल साळुंखे, अंकुश महाले यांच्याकडे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.

अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा मुंबई:- दिल्ली येथे ३ ते ८ जानेवारी  या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता स्नेहल साळुंखे या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या महिला संघाची धुरा सोपविण्यात…