Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्रात अनुसूचित जाती समन्वय अभियानास प्रारंभ

रमेश औताडे मुंबई: आम्ही संगतीत आणि पंगतीत सोबत बसत नाही हा दूरूभाव अनुसूचित जातीच्या विविध घटकांना खटकत असतो, मग आम्ही यांच्या जवळ गेलो तर रोटी बेटीची सोयरिक साधतील का? तसेच रिपब्लिकन ऐक्याचे ग्रहण अजुन सुटले नसताना आमच्या फाटाफुटी मुळे उपवर्गिकरणाच्या चर्चेला बळ मिळत आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती समन्वय अभियानाच्या प्रारंभ करताना बोलत होते. बागडे यांच्या निवासस्थानी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष रवी भाऊ शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, गर्जना संघटनेचे अध्यक्ष भाई महेश ठाकूर, आंरिमोचे नेते धर्माजी बागडे, ओबीसी नेते राजू पांजरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, रिपाइं आठवले शहर अध्यक्ष विनोद थुल, सेवानिवृत्त वित्त लेखा अधिकारी म्हाडा चे जयदेव चिंवडे, मातंग मोर्चा चे नेते मनोहर इंगोले, चर्मकार समाजाचे नेते व सुप्रसिद्ध शायर तन्हा नागपुरी, आंरिमो नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण आवळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे, संजय मोटघरे,सुधिर मोटघरे, हंसराज उरकुडे,माजी नगरसेवक अमर बागडे, युवा नेते सुरज ढोणे, पंकज पाटील, गौतम बागडे, सुदर्शन, वाल्मिकी मोर्चा चे नेते सुभाष बढेल, चरणदास गायकवाड,नरेश खन्ना, वैशाली तभाने, संगिता चंद्रिकापुरे, डॉ सुधा जनंबधू,जुलैखा बेगम रुबिना खान,सरिता थुल, अनिता थुल,भागनबाई मेश्राम, सुशिला जनंबादे, जयश्री मसराम यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतुल गंगापूरकर,भोजराज नंदागवळी अमोल बागडे यांनी केले. ०००००००

एमसीएफ कॅरम स्पर्धा माजी विश्व् विजेता योगेश परदेशी विजयी 

मुंबई: मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ), येथे संपन्न झालेल्या ११ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याकडून…

ऑसम अंधेरीचे थरारक विजेतेपद

मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा  महिलांमध्ये रणरागिणी क्लबचा दणदणीत विजय मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट्स टर्फवर रंगलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्याने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर बसवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचकारी लढतीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबवर अवघ्या १ धावेने (३३-३२) मात करत विजेतेपद पटकावले. विजयाचा क्षण येताच मैदानावर प्रेक्षकांनी जल्लोष करत उत्सव साजरा केला. याआधी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी (९८-३७) दणदणीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत प्रथमच नाणेफेक गमावल्याने वियोम फाऊंडेशनला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्याचा संघाला मोठा फटका बसल्याचे कर्णधार ओमकार पाटोळे यांनी सामन्यानंतर सांगितले. वियोमच्या पहिल्या जोडीतील सिद्धेश घोगरे (५) आणि श्रेयस वैद्य (६) यांनी ११ धावा केल्या. मात्र दिपेनने श्रेयसला बाद करत ५ धावांचा फटका दिला. दुसऱ्या जोडीतील ओमकार पाटोळे (-४) आणि रोहन गावडे (२) यांना मोठी कामगिरी करता आली नाही. ओमकारला आदिलने दोनदा बाद करत वियोमच्या धावसंख्येला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनिकेत माडीये (७) आणि प्रसाद आंब्रे (३) यांनी १० धावांची भर घातली. शेवटच्या जोडीतील शुभम गुरव (५) आणि अजित सेठी (८) यांनी महत्त्वपूर्ण १३ धावा जोडत वियोमला ३२ धावांपर्यंत पोहोचवले. ३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीची सुरुवात खराब झाली. मुसा सय्यद (०) आणि मोनू यादव (-४) यांना रोहन गावडेच्या अचूक गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. त्यानंतर संतोष जाधव (०) आणि अहमद (६) यांनी संघर्ष केला, मात्र सतत विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. तिसऱ्या जोडीतील दिपेन दांडेकर (१८) यांनी दमदार खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटच्या जोडीला विजयासाठी १६ धावांची गरज असताना रोहित खरात (१७) आणि आदिल सय्यद (-१) यांनी जबरदस्त धैर्य दाखवत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत रोहितने ऑसम अंधेरीला थरारक विजय मिळवून दिला. महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने एकतर्फी वर्चस्व राखत शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबवर ६१ धावांनी विजय मिळवला. रणरागिणीकडून नाजूका (२७), प्राजक्ता (२४), प्रिया (११) आणि दृष्टी व पूजा (प्रत्येकी ११) यांनी शानदार फलंदाजी केली. तर शक्तीकडून लावण्या (१३) आणि आचल (११) यांनी झुंजार लढत दिली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) म्हणून श्रेयस वैद्य (वियोम फाऊंडेशन) याची निवड करण्यात आली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : दिपेन दांडेकर (ऑसम अंधेरी) व सर्वोत्कृष्ट गोलंदाज : रोहन गावडे (वियोम फाऊंडेशन) ठरले.   स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक यशवंत किल्लेदार व नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बाळ वाडवलीकर (माजी क्रीडा अधिकारी, आरसीएफ), विलास पाटील (माजी जनरल व्यवस्थापक, आरसीएफ), संजय चुरी (पीडीजी, लायन्स क्लब ऑफ मुंबई), जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, वरदा चुरी (कार्याध्यक्षा – पार्क क्लब), दतात्रय वेदक (माजी अध्यक्ष – मुंबई महिला क्रिकेट), विनया तोरसकर (अध्यक्षा – वियोम फाऊंडेशन), संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर व इनडोअर क्रिकेटचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजिंक्य नाईक यांनी, “मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देणे हेच आमचे ध्येय आहे. क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन कायम पुढाकार घेईल,” असे सांगितले. तर यशवंत किल्लेदार यांनी, “आजची मुले मोबाईल आणि मनोरंजन विश्वात अधिक रमली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले. विजेत्या ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबला रु. २५,०००, चषक आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या वियोम फाऊंडेशनला रु. १५,०००, चषक आणि रौप्यपदक प्रदान करण्यात आले. ०००००००

 सीरत, समायरा उप-उपांत्यपूर्व फेरीत

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १३ वर्षांखालील मुली एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ३२ फेरीमध्ये…

– काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

 अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढला बाहेर कल्याण : कल्याणनजीक  काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र मुलाचा शोध लागला नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृत मुलाची ओळख अटाळी कोळीवाडा येथील ऋषभ रवींद्र राणे अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ सोमवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसोबत कालू नदीकाठी आंघोळीसाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि नदीच्या प्रवाहात वाहू लागला. ऋषभला बुडताना पाहून त्याचा एक मित्र त्याला वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र तोही पाण्याच्या प्रवाहात अडकला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या इतर दोन मित्रांनी प्रसंगावधान राखत त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले, मात्र ऋषभचा काहीच मागमूस लागला नाही. मित्रांनी जवळपास अर्धा तास नदीत शोध घेतला. मात्र यश न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. कल्याण अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेत मुलाचा शोध लागला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर ऋषभचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. ऋषभ हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तो घरातून हात-पाय धुवून येतो असे सांगून मित्रांसोबत नदीकाठी गेला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कल्याण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १२ च्या वतीने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नांतून…

मुलांमध्ये डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकचा वाढता धोका- डॉक्टरांचा इशारा

दर दिवशी ३ ते ४ लहान मुलांवर होत आहेत उपचार मिरा -भाईंदर : देशातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी पारा ४५°C पेक्षा जास्त नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी पालकांना २५ मे ते २ जूनदरम्यानच्या “नौतपा” काळात लहान मुले आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन, उष्माघात आणि हीट स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, विशेषतः नवजात बालक आणि सहा वर्षाखालील मुलांमध्ये हीटवेव्ह आणि नौतपामुळे संपूर्ण भारतात तापमानात मोठी वाढ होत असून त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई, वीज कपात तसेच डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. मिरा रोड येथील वोक्हार्टहॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांचे शरीर प्रौढांच्या तुलनेत तापमान नियंत्रित करण्यात कमी सक्षम असते. त्यामुळे त्यांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. अतिप्रमाणात घाम येणे, चिडचिड होणे, ओठ कोरडे पडणे, लघवी कमी होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, जास्त झोप येणे, जलद श्वास घेणे आणि शरीराचे तापमान वाढणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. डॉक्टरांनी पालकांना मुलांना दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत बाहेर न नेण्याचा आणि त्यांना थंड व हवेशीर वातावरणात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मुलांमध्ये हीट स्ट्रोकची सूचना देणारी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या जास्त ताप येणे, त्वचा कोरडी, लालसर आणि गरम होणे चक्कर येणे, गोंधळ उडणे किंवा अतिशय सुस्ती येणे जलद श्वास घेणे किंवा अनियमित हृदयाचे ठोके वारंवार उलट्या होणे किंवा पाणी पिण्यास नकार देणे.

आखाती युद्धामुळे ‘आंबा कॅनिंग’ उद्योगालाही बसला फटका…!

शेतकरी बागायतदारांचे दुहेरी नुकसान…! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणातल्या आंबा प्रक्रिया उद्योगालाही बसला असून परदेशातील मागणी घटल्याने ‘कॅनिंग’ कंपन्यांनी यंदा आंब्याची कमी प्रमाणात खरेदी केली असल्याचे आढळून आले आहे.परिणामी आंब्याचा दर आता थेट ६२ रुपयांवरून थेट १7 रुपयापर्यंत प्रती किलो इतका खाली घसरला आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदाच्या वर्षी आंबा पिक संपूर्णपणे धोक्यात आल्याने शेतकरी आणि बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दहा ते पंधरा टक्के इतकेच आंब्याचे पीक यंदा शेतकरी – बागायतदारांच्या हाती लागले आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना आता ‘कॅनिंग’च्या आंब्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकरी – बागायतदारांवर एक प्रकारे दुहेरी संकट ओढवले आहे. यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनात एकूणच घट होणार असल्याची सिंधुदुर्गातील शेतकरी  बागायतदारांची ओरड सुरू झाली होती. या हंगामातील तब्बल 8५ ते ९० टक्के पीक हातचे  गेल्याने शेतकरी – बागायतदार आधीच नुकसानीत गेले होते. आंब्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी -बागायतदार आक्रमक बनले होते. गेले महिनाभर आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली मात्र जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हणत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शेतकरी-बागायतदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या  ‘वर्षा ‘ निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मोर्चाही निघाला मात्र पोलिसांनी धरपकड केल्याने आंदोलनाची हवाच गेली. आंबा काढणीनंतर प्रतवारी झाल्यावर उरलेला आंबा प्रक्रिया उद्योगांना ( कॅनिंग ) दिला जातो त्यामुळे मिळेल त्या दराने आंबा द्यावा लागतो आणि त्याला पर्याय नसतो. यातून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ‘कॅनिंग’च्या आंब्याला हमीभाव मिळावा ही शेतकरी आणि बागायतदारांची फार जुनी मागणी आहे. परंतु शासन दरबारी याही मागणीची दखल घेतली गेली  नसल्यामुळे आता त्यांच्यासमोर  दुहेरी संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने या प्रश्नातही लक्ष घालून शेतकरी आणि बागायतदारांना दिलासा देण्याची गरज आहे. ‘कॅनिंग’चा दर सुरुवातीला ६२ रुपये प्रति किलो इतका होता  त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दर घसरत जाऊन आता तो १7 रुपये प्रति किलो  इतका खाली आला आहे. आंब्यापासून रस (पल्प)जाम, आंबा वडी, सरबते,लोणची, चॉकलेट आदी  विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात. सिंधुदुर्गातील अनेक महिला  बचत गट हा उद्योग करत आहेत. शिवाय आईस्क्रीम साठी या आंब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आईस्क्रीम उद्योगातील मोठमोठ्या कंपन्यांमार्फत या आंब्याची खरेदी केली जाते. मात्र शेतकरी- बागायतदारांना हवा तसा दर दिला जात नाही. परिणामी त्यांना नुकसान सोसावे लागते.परदेशात ‘पल्प’ ला  मोठी मागणी आहे मात्र आखाती युद्धामुळे यंदा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी- बागायतदार धास्तावले आहेत. ‘कॅनिंग’च्या आंब्याला हमीभाव मिळावा ही शेतकरी- बागायतदारांची मागणी सरकारने मान्य केल्यास हाही प्रश्न सुटू शकतो असं त्यांचं मत आहे.  गतवर्षीपेक्षा यंदा हापूसचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने प्रक्रिया उद्योगाकडे वळणारा हापूसही कमी प्रमाणात आला आहे. त्यातही युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘कॅनिंग’च्या आंब्याची मागणी कमालीची घटली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 3० टक्के आंबाच  ‘कॅनिंग’ उद्योगाला गेला आहे.त्यातही फळमाशीचा प्रादुर्भाव, आंब्याची  हाताळणी करताना होणारे फळांचे नुकसान यामुळे प्रक्रिया उद्योगाकडे गेलेला सुमारे २० टक्के आंबा हा फेकून द्यावा लागला. याचाही परिणाम ‘कॅनिंग’चे दर घसरण्यावर झाला आहे. परिणामी प्रक्रिया  उद्योगांनीही सावधगिरी बाळगत खरेदीचे प्रमाण कमी केले आहेत. शिवाय दरही  पडला आहे. त्यामुळे शेतकरी- बागायतदारांची चिंता आणखी वाढली आहे.

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावूनही संबंधितांनी त्याची दखल न घेतल्याने ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.…

आंबिवलीत पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन

‘बेकायदेशीर नळ जोडण्या तोडा, नियमित पाणी द्या’ची जोरदार मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त महिला आणि नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “बेकायदेशीर नळ जोडण्या बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंबिवलीतील अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ, साईकृपा चाळ, धर्मात्मा नगर, ज्योतिर्लिंग चाळ आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत असून घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे. सकाळपासून पाण्याच्या प्रतीक्षेत राहूनही नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर नळ जोडण्या झाल्याचे सांगितले. काही अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महिलांनी केला. “आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र बेकायदेशीर जोडण्यांमुळे पाण्याचा दाब कमी होत असून आमच्या भागात पाणीच पोहोचत नाही,” असे रेशमा बोत्रे आणि जयश्री ढेकळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश देत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. ००००००