Category: मुंबई

Mumbai news

उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या

पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे. Slug – पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षणासाठी जनतेने सहकार्य करावे – सुप्रिया रॉय

अशोक गायकवाड नवी मुंबई : ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेने सहकार्य करावे’, असे आवाहन राष्ट्रीय…

नमुंमपा महिला कर्मचा-यांचा पाककला व रांगोळी स्पर्धेत उत्साही सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील विविध कला-क्रीडा गुणांच्या प्रदर्शनासाठी निरनिराळया स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामधील रांगोळी व पाककला स्पर्धा महापालिका मुख्यालयात…

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट मुंबई : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री…

प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला

शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री म्हणून मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांनी मंत्रालय येथील दालनात पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी…

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा; बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा…

हास्यजत्रा फेम गौरव मोरेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाकडून यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचा प्रथम मान प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव…

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी जागरण गोंधळ

तरीही सरकार पावले नाही रमेश औताडे मुंबई :अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या ८ वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आझाद…

हिंदुस्थान ‘कंपोजिटस’ च्या कामगारांना थकीत डिए मिळणार

मुंबई : घाटकोपर पश्चिममधील हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांना थकीत महागाई भत्ता- डिए मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला.गेली ३० वर्षे न्यायालयात चाललेल्या लढाईपुढे कामगार हतबल झाले.शेवटी कामगारांनीच कंपनी व्यवस्थापनाशी आऊट ऑफ कोर्ट…

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा

रमेश औताडे मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी बिड जिल्हाधिकारी…