Category: पालघर

palghar news

दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस…

जिल्हा निर्मितीचे दशक; तरी प्रश्नांचे शतक कायम

सागरी, नागरी, डोंगरी, शहरी जिल्ह्याच्या विकासाचा बोजवारा योगेश चांदेकर पालघरः वसई, विरार, पालघर, बोईसर यांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. कोकणपासून कोची अन् कोलकाता आसाममधून रोजगाराच्या शोधातील कष्टकऱ्यांचे लोंढे पालघर जिल्ह्यात…

प्रवाशांचा उन, पावसात उभे राहण्याचा त्रास संपणार

  डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवर छताच्या उभारणीस प्रारंभ   डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागात छत उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले…

 जिल्हा निर्मितीचे दशक; तरी प्रश्नांचे शतक कायम

सागरी, नागरी, डोंगरी, शहरी जिल्ह्याच्या विकासाचा बोजवारा   योगेश चांदेकर पालघरः वसई, विरार, पालघर, बोईसर यांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. कोकणपासून कोची अन् कोलकाता आसाममधून रोजगाराच्या शोधातील कष्टकऱ्यांचे लोंढे पालघर…

कोकणातील ‘परशुराम’ही ठाकरेंच्या शिवसेनेत

राजन चव्हाण रत्नागिरी : कोकणात शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून त्यात आज सावंतवाडी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपकरांची भर पडली. कोकणातील फायरब्रँड नेता अशी ओळख असणारे परशुराम उपरकर यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत…

ऍड. वैशाली घरत यांना बळीराजा सेनेतून उमेदवारी जाहीर

राजीव चंदने मुरबाड : ऍड. वैशाली घरत मुरबाड विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बळीराजा सेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मुरबाड विधानसभा निवडणुकीत सध्या कोण उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणुका लढवणार हे चित्र स्पष्ट नसले तरी काही पक्षानी उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. यात अपक्ष उमेदवारही मागे राहिलेले नाहीत. ऍड. वैशाली घरत गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे,  त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. ऍड. घरत ह्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रिय आणि अग्रेसर आहेत.याचा फायदा हा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो असा अंदाज आहे. कोट पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करेन. आतापर्यन्तच्या राजकीय इतिहासात मुरबाडमध्ये विधानसभा निवडणुकीत महिलांना कुणीही न्याय दिला नाही. माझ्या पक्षाने मला उमेदवारी देऊन समस्त नारीशक्तीचा सन्मान केला आहे. शेतकरी, महिला, विदयार्थी यांच्या न्याय हक्कासाठी आमचा पक्ष पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला आहे. ऍड. वैशाली घरत

 विक्रमगड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

प्रकाश निकम यांच्यासाठी कार्यकर्ते आग्रही   योगेश चांदेकर पालघरः विक्रमगड- विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी व्हायचा असेल, तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह पदाधिकाऱ्यांतून केला जात आहे. त्यासाठी दबाव गटही तयार झाला आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  भाजपच्या विष्णु सवरा यांच्याकडून युती नसताना निकम यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. तर विक्रमगड मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे सुनील भुसारा आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभेत  डॉ हेमंत सवरा यांचा युती असताना  २१ हजार पेक्षा जास्त  मतांनी सुनील भुसारा यांनी पराभव केला होता, महायुतीच्या विजयासाठी निकमच हवेत गेल्या दोन निवडणुकीचा अनुभव तसेच त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निकम यांनी केलेली गावनिहाय कामे आणि गावोगाव त्यांचा असलेला संपर्क यामुळे या मतदारसंघातून महायुतीला विजय मिळवायचा असेल, तर निकम यांच्यासारख्या नेतृत्वाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. नगरपंचायत, पंचायतसमिती,ग्रामपंचायतीत वर्चस्व या आग्रहासाठी त्यांनी जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यातील कोणकोणती सत्तास्थाने कोणा कोणाच्या ताब्यात आहेत, याचा संदर्भ दिला आहे. मोखाडा तालुक्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समीती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, तर सुमारे ८०% ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सरपंच आहेत. याशिवाय जव्हार तालुक्यात तीन जिल्हा परिषद गटापैकी १ गट शिंदेच्या शिवसेनेकडे तर १ गट भाजपकडे तर  १ गट अजितपवार गटाकडे आहे. तर जव्हार नगरपरिषद ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत तर बऱ्याच ग्रामपंचायतीही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे तसेच विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा १ गट पंचायत समितीचा १ गण  शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, आणि  विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊचा झेंडा असला तरी १ नगरसेवक तसेच नंबर २ च्या मतांची संख्या   शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. या तालुक्यातही बऱ्याच  ग्रामपंचायतीही ताब्यात आहेत. मतदारसंघ न सोडल्यास पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत सवरा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते; परंतु त्या वेळी ते त्यांचा पराभव झाला , असे शिंदे गट निदर्शनास आणतो. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्व कसे आहे आणि शिंदे गटाला डावलून हा मतदार संघ महायुतीतील अन्य पक्षाकडे गेल्यास पराभवाची पुनरावृत्ती कशी होऊ शकते, याचे दाखले कार्यकर्त्यांनी दिले आहेत. महायुतीत दबावाचे राजकारण शिवसेनेचा शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडणे कसे आवश्यक आहे, यासाठी आणि प्रकाश निकम हेच या मतदारसंघातून महायुतीला कसा विजय मिळवून देऊ शकतात, हे पटवून देण्यासाठी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यास जाणार असून महायुतीच्या जागावाटपत हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटालाच कसा सोडला जावा, यासाठी आग्रह राहणार आहे. महायुतीत अनेक मतदारसंघासाठी दबावाचे राजकारण सुरू असते तसेच दबावाचे राजकारण आता विक्रमगड विधानसभा  मतदारसंघातही सुरू झाले आहे. निकम यांच्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ मिळाला पाहिजे, यावर आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भर आहे. हा मतदारसंघ केवळ प्रकाश निकम यांच्यासाठी सोडला जावा आणि त्यांनी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील केलेल्या विकासकामांची परिणती विजयात व्हावी, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे होता; परंतु ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडून काढून घेऊन तो भाजपने ताब्यात गेला. त्या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असता, तर निकम हे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; परंतु हा मतदारसंघ त्या वेळी भाजपला गेल्याने निकम यांना थांबावे लागले. या परिस्थितीत किमान आता तरी त्याच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा असा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे. निकम यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध निकम यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याने तसेच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस असल्याने या परिस्थितीत विक्रमगड  विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यातून महायुतीकडे आणण्यासाठी प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कोट जव्हर्स‘मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची मोठी ताकद आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गट सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे शिंदे गटाकडे असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला आणि त्यातही उमेदवार म्हणून प्रकाश निकम यांना सोडावा, अशी आमची सर्वांची आग्रही मागणी आहे. -रिकी रत्नाकर, युवासेना लोकसभा प्रमुख पालघर 00000

आमदार निकोले यांना डहाणूतून पुन्हा उमेदवारी

 पालघर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर प्रचार नियोजनही ठरले योगेश चांदेकर   पालघरः जनसामान्यांचा नेता आणि राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख असलेल्या आ. विनोद निकोले यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची डहाणू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघर जिल्ह्यात उमेदवारी जाहीर झालेले निकोले हे पहिलेच उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी आत्तापासूनच प्रचाराचे नियोजन ठरले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पाच दिवस झाले असले, तरी अद्याप अन्य कुठल्याच पक्षाने अधिकृतपणे कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली नाही; परंतु आ. निकोले यांना मात्र अगोदरच उमेदवारी जाहीर झाली आहे. अतिशय छोट्या घरात राहत असलेल्या आणि अजूनही प्रत्यक्षात परसबागेत आणि छोट्या शेतीत काम करत असलेल्या आ. निकोले यांचे पाय कायम जमिनीवर आहेत. जनतेचा आमदार जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने प्रशासन आणि सरकारची संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी गेल्या; मात्र त्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अशा प्रकरणात थेट प्रशासनाशी दोन हात करून संबंधितांना योग्य ती मदत मिळण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कामाची दखल म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पास्कल धनारे यांचा पराभव करून निकोले निवडून आले होते. प्रश्न मांडण्यातही आघाडीवर वर्षानुवर्ष जनसामान्यात राहून चळवळ उभी करणाऱ्या आणि अतिशय कमी खर्चात निवडणूक लढवून ती जिंकणाऱ्या आमदार निकोले यांचे आकर्षण केवळ पालघर जिल्ह्यालाच आहे, असे नाही, तर संपूर्ण राज्यात त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. केवळ साधा, गरीब आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे, असे नाही, तर सामान्यांचे प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडणारा आणि सातत्याने विधानसभेतील चर्चेत गांभीर्याने भाग घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणारे आणि राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक असलेले आ. निकोले धोरणात्मक चर्चेतही तेवढ्याच हिरीरीने भाग घेत असतात. महाविकास आघाडीमुळे पारडे जड टँकरमध्ये बसून सामान्यांपर्यंत पाणी पोहोचवणारा हा आमदार विकासासाठी सातत्याने धडपडतो आहे. त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून राज्यात अन्य मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या, याचा निर्णय महाविकासाकडे घेऊ शकली नसली, तरी डहाणू विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र महाविकास आघाडीमध्ये त्याबाबत कोणताच संदेह नसल्याने त्यांची उमेदवारी अगोदरच जाहीर करण्यात आली. यापूर्वीच पालघर जिल्हा कमिटीने तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन येथे कार्यशाळा घेऊन या कार्यशाळेत विधानसभा निवडणुकीसाठीची प्रचार यंत्रणा कशी राबवायची याची आखणी केली. त्यात ३६५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांचाही त्यात सहभाग होता. माकप आणि महाविकास आघाडीच्या समन्वयामुळे आता डहाणूतील निवडणूक अधिक रंगतदार होणार असून आमदार निकोले यांचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी कोण एवढीच उत्सुकता डहाणू विधानसभा मतदारसंघात वाढवण बंदर होत असून या बंदराचा पुरस्कार भाजप आणि महायुतीने केला असला, तरी महाविकास आघाडी, मच्छीमार संघटना तसेच स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीतही हाच मुद्दा चर्चेला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यात होत असलेले विविध प्रकल्प, त्यासाठी जमिनीचे संपादन आणि त्यात शेतकऱ्याची होत असलेली फसवणूक तसेच विकासाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी अद्यापही आदिवासी व अन्य समाज घटकांपर्यंत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नसल्याने त्याबाबत माकप आणि महाविकास आघाडीने उठवलेला आवाज, आदिवासी उपाययोजनातील निधी अन्य घटकांकडे वळवण्याचे प्रकार यावर आता भर असून आमदार निकोले यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असला, तरी आमदार निकोले यांच्या विजयासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान उठवले असल्याने निश्चितच निकोले यांचे पारडे जड राहणार आहे.

 सगे -सोयरे अध्यादेशाला कुणबी समाजासह सर्व ओबीसी संघटनांचा विरोध

कुणबी समाजोन्नती मंडळाकडून मुरबाड तहसीलदार यांना निवेदन राजीव चंदने मुरबाड : राज्यातील  महायुतीचे सरकार  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल याचे लाड पुरवत असून त्याने केलेल्या मागण्या सरकार पूर्ण करत आहे. हा एक प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय असून शासनाने सगे – सोयरे या काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास ओबीसी समाजाचा राज्यात ठिक ठिकाणी प्रखर विरोध होत आहे,  सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देणे बंद करावे अन्यथा सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल . मराठा समाजाच्या हितासाठी काढलेल्या सगे -सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर नको व‌ मराठ्यांना कुणबी दाखले देणे बंद करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन आज मुरबाड तहसीलदार यांना मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे, सरचिटणीस अरविंद विशे, माजी खजिनदार सदानंद मोरे, समाज सेविका योगिता शिर्के, ओबीसी युवा नेते मिलिंद मडके, पत्रकार दिलीप पवार, माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर वडवले, संजय हंडोरे (पाटील), संतोष राऊत उपस्थित होते, यावेळी तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी निवेदन स्विकारून समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

नवनिर्वाचित तालुका प्रमुख संतोष जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला हल्लाबोल !

राजीव चंदने   मुरबाड: मुरबाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखपदी संतोष परशुराम जाधव यांची करण्यात आलेल्या निवडी विरोधात पक्षाच्या नाराज गटाने शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचे भिवंडी लोकसभा…