Category: पालघर

palghar news

 डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई

    फेरीवाल्यांच्या ठेले, मंचकाची तोडफोड       डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ आणि ग प्रभागाने सोमवारपासून संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत वर्दळीच्या…

 उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून रस्त्यातील खड्ड्याची पाहणी

    अधिकाऱ्यांना धरले धारेवर       उल्हासनगर : शहरातील रस्त्यातील खड्ड्याची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी खड्याबाबत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी स्थायी समिती सभागृहात याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन,…

 डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

     लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गातून उड्या       डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक ते…

डोंबिवलीतील आजदेपाड्यात तलवारी घेऊन तरुणांची दहशत

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील आजदेपाडा भागात शनिवारी मध्यरात्री तीन तरुण तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याचा प्रकार समाज माध्यमातील चित्रफितीमधून उघडकीला आला आहे. आजदेपाडा भागातील काही घरांसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या…

डोंबिवलीतील सागाव येथील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

डोंबिवली : ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सागाव भागातील चेरानगर परिसरात राहत असलेल्या एका ३२ वर्षाच्या नोकरदाराची एका भामट्याने १७ लाख १३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन महिन्याच्या काळात…

 सरकारने केली मुरबाडच्या शेतकऱ्यांची फसवणूक

खरीप हंगामसाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोनस पासून शेतकरी वंचित राजीव चंदने     मुरबाड : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक वर्ष कार्यान्वीत असलेल्या आधारभुत किंमत धानखरेदी योजने अंतर्गत सब एजंट म्हणून नियुक्त केलेल्या मुरबाड तालुका शेतकरी संघाने २०२० -२१ मध्ये  ३१ मार्च पर्यन्त ३८२२ शेतकऱ्यांचे ९३ ३३५ . ७२ क्विंटल भात खरेदी करून पावत्या दिल्या . मात्र सततचा विज पुरवठा खंडीत होणे, इंटरनेट सेवा बंद होणे, या बाबीमुळे ५९६ तालुक्यातील शेतकऱ्यांची ऑन लाईन नोंदणी ३१ मार्च पर्यंत झाली नाही. त्यांच्या नोंदणी नंतर केली. यामुळे तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रती क्विंटल ५oo रु बोनस पासुन वंचीत राहीले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा दोष नसतांना त्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी सतत पाठपुरावा केला असून नागपुर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी,अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपणांस बोनस देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला ५ महिने होऊन ही आश्वसनाची पुर्तता होत नसल्याने त्यांनी २८ . ६ २४ रोजी . आझाद मैदान येथे उपोषण केले असता सचीव अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी सर व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच शेतकरी संघ व आदिवासी सेवा सोसायटी वरील ताण कमी व्हावा म्हणुन शासनाने . सर्व सेवा सोसायट्यांना भात खरेदी करण्यास परवानगी द्यावी . अशी मागणी सुद्धा केली आहे. नुकतीच अंमलात आणलेल्या  लाडक्या बहिणी साठी योजना राबवणाऱ्या सरकारने दुर्लक्षीत राहिलेल्या शेतकरी  वर्गाचे ५ ९६ शेतकऱ्यांचे १४ १७५ . २७ क्विंटलचे रू ५०० रू प्रमाणे बोनसची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी लोकमित्र रमेश हिंदुराव . सभासद मुरबाड तालुका शेतकरी संघ .यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री . व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या कडे लेखीपत्रा द्वारे केली आहे. ००००

 ‘मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची हकालपट्टी करा’

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी राजीव चंदने       मुरबाड : राज्यभरात गाजलेल्या “झोळी” प्रकरणाचे रोहित पवार यांनी ट्विट केले होते.त्या अनुषंगाने मुरबाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्यास सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. असा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची या तालुक्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. मागील तीन महिन्यांपुर्वी तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात कागदोपत्री श्रेणी अ वर्गाच्या निवासी डॉक्टर असूनही ते निवासी नसल्याने एका शिक्षकाचा उपचारा अभावी बळी गेला. म्हसा यात्रेदरम्यान म्हाडस या एकाच गावात डेंग्यूचे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. याच कालावधीत देवपे व सासणे येथे प्रत्येकी एक बालमृत्यू झाले होते.हे प्रकरण खुप गंभीर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. धसई जवळील ओजिवले कातकरी वाडीतील महिलेला दि.23 जून रोजी रात्रभर डॉक्टर निवासी नसल्याने प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या.डॉक्टर दुसऱ्या दिवशी आल्याने तिची 24 रोजी प्रसूती झाली. मुळात माहेरघर नावाची योजना सुरू असताना ऐन प्रसूतीवेळी गर्भवतींना रुग्णालयात दाखल होण्याची गरज का पडते? मुरबाड तालुक्यात आजमितीस माहेरघर योजनेचा एकही लाभार्थी नाही.या माहेरघर योजनेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.यास सर्वस्वी तालुका आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत. वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षाच्या बालकाला सर्पदंश झाला.त्या बालकाला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणले.मोरोशी येथील गट अ वर्गाच्या डॉक्टर तेथे निवासी नसतात हे परिसरात सर्वश्रुत आहे.त्यामुळे या बालकाला टोकावडे येथे नेले.आणि त्याचा जीव गेला. जांभूर्डे येथील गर्भवतीला म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्र असताना याठिकाणी डॉक्टर निवासी नसल्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणले.येथेही हे बाळ दगावले. सार्वजनिक आरोग्यसेवेची पुरती वाट तालुका आरोग्य अधिकारी यांनी लावल्याने तालुक्यात दररोज बळी जात आहेत.याचमुळे तालुक्यात दररोज नव्याने खासगी हॉस्पिटल निर्माण होत आहेत.हे सार्वजनिक शासकीय आरोग्य सेवेचे अपयश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कारभारावर तसेच याठिकाणी निवासी डॉक्टर नसल्या कारणाने तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत.असा आरोप त्यांनी बनसोडे यांच्यावर या निवेदनात करण्यात आला आहे.मुरबाडच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून या बाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.त्यामुळे या एकूण कारभाराची काय चौकशी होते,व कुणावर काय कारवाई होते याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.दरम्यान कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिपक वाघचौडे यांनी दिला आहे. ०००००

 उल्हासनगर मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कारवाई

उल्हासनगर शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात सुनिल इंगळे       उल्हासनगर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिक बनवणाऱ्या कारखाने आणि त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर उल्हासनगर मनपा प्रशासन, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाने  धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. प्लास्टिकमुळे ठिकठिकाणी नाले तुंबलेले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे दिसून येत आहे . उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्मिती केली जात असून त्याची विक्रीही खुलेआमपणे केली जात आहे या संदर्भात शहरातील अनेक सामाजिक संघटनांच्या मनपा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उल्हासनगर मनपा आयुक्त अजीज  शेख, आयुक्त यांच्या मार्गदर्शखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस,  उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, तसेच प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख  व प्रदूषण मंडळाचे अधिकारी सीमा दळवी व राजेश नदगावकर यांच्या सयुक्त विद्यमानाने  उल्हासनगर शहरात कॅम्प नं. 02 व कॅम्प नं. 03 मधील पेलूमल कंपाऊंड येथील एकल प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेऊन मंगळवारी अचानक पणे धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सदर कंपन्यांचा 365 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून  10,000 रु. दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.  प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदार व अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध  5000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे. पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक  पिशव्या अडकून तुंबण्याच्या घटना शहरात होत आहेत या संदर्भात मनपा आयुक्त अजीज शेख आयुक्त यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन  पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुषगाने  स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्या अस्वच्छता करणाऱ्या  251 व्यक्तींविरुद्ध 98, 550/- व  एकल प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्री करणाऱ्या विक्रीते विरुद्ध  55000  हजार रु. व 502 kg जप्ती 10 व्यक्तींविरुद्ध एकूण 1,48,550 /- रु. दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे . शहरातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, नाले यांची विषेश सफाई व स्वच्छता करुन नागरीकांना स्वच्छतेबाबत संदेश देवुन जनजागृती केली जात आहे. नागरीकांना शिस्त लागावी या करीता अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरीकांना सूचना/नोटीसा  देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या आशा नागरिकांविरुद्ध ही कार्यवाही सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांनी दिली आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. ०००००

 ‘ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मेहनत केल्यास निश्चित यश मिळते’

गुणगौरव समारंभात कपिल पाटलांचा विद्यार्थीना सल्ला राजीव चंदने     मुरबाड : ध्येय डोळ्या समोर ठेऊन मेहनत घेतल्यास निश्चित पणे यश मिळते असा कानमंत्र माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड येथिल विध्यार्थी गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांना दिला. भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी बारावी, पदवी व कला क्रीडा क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ मुरबाड मधील माऊली गार्डन येथे मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी पाटील हे बोलत होते. याप्रसंगी,माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, हरेश खापरे,नारायण गोंधळी,उल्हास बांगर, सुभाष घरत,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, दिपक खाटेघरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल तोंडलीकर,संजय हंडोरे,महेंद्र पवार, आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना पाटील म्हणाले की ठाणे जिल्ह्या सारख्या ग्रामीण भागातही विदयार्थ्यां मध्ये प्रचंड प्रमाणात गुणवत्त्ता आहे, मात्र विदयार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाणे गरजेचे आहे, डॉक्टर, ईजींनीयर, यासारख्या तत्सम पदव्या घेऊन ही विदयार्थ्यांनी त्यावरच अवलंबून न राहता यु पी एस सी, एम पी एस सी, यासारख्या परीक्षा देऊन लोकसेवा करावी, यावेळी विदयार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात करियर कसे उज्वल करावे याबाबत पुणे येथील करियर व्याख्यात्या ऍड.अदिती निटूरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यावेळी शेकडो विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, यावेळी गुणवंत विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्न देऊन गौरविण्यात आले. 0000

मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आयएएसचा ध्यास घ्यावा

माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव     मुरबाड : मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सकारात्मक भावना व संपूर्ण आत्मविश्वासाने आयएएस, आयपीएस होण्याचा ध्यास घ्यावा. तसेच प्रत्येक शिक्षकाने आईच्या भूमिकेत…