वसई : आज मतदानाच्या दिवशी कै.सौ. सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वसई पश्चिम येथील श्री साईधाम मंदिर, विद्यामंदिर मार्ग येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात बहुसंख्य मतदार यांनी मतदान झाल्यावर रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. निवडणुकीच्या धामधुमीत रक्तदान शिबिर न झाल्याने रक्तसाठा कमी होऊन गरजु रुग्णांना त्यामुळे बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागत होते.मतदानाच्या दिवशी रक्तदान करण्याचा अभिनव संकल्प सर्वामध्ये रुजवावा, या हेतूने लोकशाही संवर्धन करण्यासाठी जसे मतदान आवश्यक आहे तसे रुग्णांच्या संवर्धनासाठी रक्तदान आवश्यक असल्याचे आयोजक मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी छोटू आनंद, उमेश शिखरे, सुशांत धुळप, मूतूजा मिठाईवाला, हरीश बिष्ट, विकास दुबे, अली असगर यांनी विशेष सहकार्य केले.