Category: पालघर

palghar news

‘तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही’

 मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन   पालघर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच तिकीटावरून विविध पक्षांमध्ये झालेले वाद सर्वांनी पाहिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक उमेदवारांची नावे जाहीर झाली नव्हती. तिकीटावरून एवढा वाद सुरू असताना अनेक नेत्यांची तिकिटे कापली जाणार हे निश्चित होते. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा “कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधीकधी गणितं असतात. परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. म्हणून मी दिलेला शब्द पाहणारा माणूस आहे. काही लोकांना लोकसभेला उमेदवारी देऊ शकलो नाही पण त्यांना मी ताबडतोब विधान परिषदेमध्ये सदस्य बनवलं आणि आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आहे. श्रीनिवास माझ्यासोबत होता. मी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला त्याने काहीही विचारलं नाही. मुलाचा वाढदिवस देखील त्याने बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास राजेंद्र गावित यांच्यासाठी स्टेजवर आला आहे. श्रीनिवास यांचे चांगले होणार आहे कल्याण होणार आहे. त्याला कुठे बघण्याची गरज लागणार नाही,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त

 उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई   योगेश चांदेकर पालघरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागातील भरारी पथकाने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तलासरी तालुक्यात केलेल्या तपासणीत विदेशी मद्याच्या मोठया आकाराच्या ३६४ बाटल्या जप्त केल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक तालूके हा गुजरात, दीव दमण  तसेच दादरा-नगर हवेलीला लागून असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्य  महाराष्ट्रात येत असते. विधानसभेच्या निवडणुकीत पालघर जिल्ह्यातही अशा मद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो. पाठलाग करून साडेदहा लाखांचा ऐवज जप्त गेल्या दोन महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारच्या अवैध मद्याची वाहतूक, साठा व विक्री प्रकरणी कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे  तलासरी तालुक्यात अशा प्रकारची मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनांची तपासणी केली. वाहन तपासणी होत असल्याने दादरा नगर हवेली पासिंग असलेल्या डीएन ०९/४७३ क्रमांकाच्या स्विफ्ट मारुती कारचालकाने वेगात गाडी नेली. तिचा पाठलाग करून पोलिसांनी मारुती मोटारीसह दहा लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यात साडेतीन लाख रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. यामधील आरोपी मात्र फरार झाला आहे. यांनी केली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक ए. एस चव्हाण, विश्वजीत आभाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विकास आबनावे, ए. एम. शेख, कमलेश पेंदाम आदींनी तलासरी तालुक्यातील ठाकरपाडा रोड, कुर्झे डॅम जवळ ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुद्ध विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे अधीक्षक सुधाकर कदम,  बी. एन. भुतकर आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे हे करीत आहेत. 00000

एक संधी देऊन मुरबाडच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवू या

महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांचे आवाहन राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला एक संधी देऊन मुरबाड तालुका, बदलापूर शहर व ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण परिसराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवू या, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आज येथे केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड मतदारसंघातील उमेदवार सुभाष पवार यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात दौरा करुन मतदारांबरोबर संवाद साधला जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी एक संधी देऊन सर्वांगीण व परिपूर्ण विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे आवाहन केले जात आहे. वाकीची वाडी, कारंद, मोऱ्याचा पाडा, आघणवाडी, चोण गावांना सुभाष पवार यांनी भेट दिली. तसेच मतदारांना महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, आरपीआय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेली १५ वर्षे आपण एका चुकीची शिक्षा भोगत आहोत. ती चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे. केवळ कागदावर झालेल्या  विकासाची जाहिरात केली जात आहे. विकास झाला असेल, तर ग्रामस्थ समाधानी का नाहीत, असा सवाल सुभाष पवार यांनी केला. तसेच मला केवळ एकदा आशीर्वाद द्या, मी संधीचं सोने करीन, असे आश्वासन दिले. आपल्या भागातील पाणी व रस्त्यांची अवस्था बिकट असून, दररोज संघर्ष करावा लागतो. राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामे झालेली नाहीत. लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही. आता अडचणी मांडायच्या कोणाकडे? असा सवाल ग्रामस्थांनी केला. त्यावर निवडून आल्यानंतर गावांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही सुभाष पवार यांनी दिली. संपूर्ण मतदारसंघात महाविकास आघाडीला पसंती मिळत आहे. जनशक्तीच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी तुमचे एक मत महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन सुभाष पवार यांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

मोदी सरकारचा अहंकार महाराष्ट्राने मोडला आणि आताही जनता त्यांना धडा शिकवणार : बाळासाहेब थोरात

अरविंद जोशी मीरा-भाईंदर : मीरा भाईंदर मतदारसंघातील माविआचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्याच्या कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,  2024 मध्ये महाराष्ट्राने मोदी सरकारचा अहंकार मोडून काढला.…

कामांचा डोंगर, स्वप्नांचा पाऊस राजेंद्र गावित यांचा महासंकल्प

 रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी आदींवर संकल्प पत्रात भर योगेश चांदेकर पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार माजी खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना भविष्यात काय करणार, याचे स्वप्न आपल्या संकल्प पत्राच्या माध्यमातून पालघर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दाखवले आहे. लायन्स क्लब हॉल पालघर येथे महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण व्यवस्था अशा सर्वच बाबींना स्पर्श करत पुढच्या काळात आपण काय करणार आहोत याचे चित्र त्यांनी मतदारांसमोर उभे केले आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे शिवसेना प्रवक्ते केदार काळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गावित यापूर्वी आमदार, खासदार, मंत्री होते. प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. आपल्या काळात त्यांनी काय काय कामे पालघर जिल्ह्यात केली, याचा विस्तृत आढावा आपल्या संकल्प पत्रात घेतला असून भावी काळात पालघर विधानसभा मतदारसंघासाठी आपण काय करणार आहोत आणि नागरिकांचे जीवन कसे सुसह्य करणार आहोत, त्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. वचननाम्यात स्थानिकांना रोजगार गावित यांच्या वचननाम्यात प्रामुख्याने स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य, स्वयंरोजगार, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करणार, शेतकरी व मच्छीमार बांधवांच्या मागण्या पूर्ण करणार, डायमेकर तसेच अन्य व्यावसायिकांना लघुउद्योगांचा दर्जा देणार, पालघर स्वावलंबी व नावीन्यपूर्ण बनवणार अशी पाच वचने मतदारांना दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी काय काय करणार याचा आढावाही त्यांनी घेतला आहे. आपली विकास नीती कशी असेल यावर त्यांनी भर दिला आहे. आधी केले, मग सांगितले मुंबई, अहमदाबाद महामार्गालगतच्या ७६ गावांना पाणी योजना, मीरा-भाईंदर ते वसई विरार पर्यंत टप्पा क्रमांक १३ अंतर्गत मेट्रो सेवा, पालघर जिल्ह्यातील सहा मोठ्या योजनांसाठी १२४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर, वसई येथे पासपोर्ट कार्यालय, वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १००१ कोटी रुपयांचा निधी मंजूर, रेल्वे चौपदरीकरणासाठी बाधितांना दुप्पट सानुग्रह अनुदान, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री तसेच वैयक्तिक सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांची प्रकरणे मंजूर, बिरसा मुंडा ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील २५० न जोडलेल्या गावांची रस्त्यांची कामे, सातपाटी मासेमारी बंदर विकास केंद्रासाठी २८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर अशा कामांचा आढावा घेताना यापुढे काय करणार आहोत, हे त्यांनी मतदारांना सांगितले. विरार-डहाणूसाठी ३६०० कोटींचा निधी विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करून लवकरच विरार डहाणू रेल्वे सेवांची संख्या व वारंवारिता वाढवणार असल्याचे सांगून गावित म्हणाले, की मुला-मुलींच्या वसतिगृहाराहतील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे, तसेच घरकुल, वनपट्ट्यांचे दावे मंजूर करणे या कामांना प्राधान्य देणार आहोत. जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असून त्यासाठी ९५ कोटी रुपये दिले आहेत. पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असून लवकरच एक मॉडेल हॉस्पिटल म्हणून ते उदयास येणार आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत पालघर रेल्वे स्थानकाचे अद्ययावत रेल्वे स्थानकामध्ये रूपांतर होणार असून पालघर-विरार आता अर्ध्या तासावर आले आहे. वैतरणा ते सफाळे खाडीवर पुलासाठी ८६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून हे कामही लवकरच सुरू होईल असे त्यांनी सांगितले. पाणीयोजनांना प्राधान्य रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करून त्यासाठी विविध शासकीय संस्थांचा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. वाडा-पोखरण पाणी योजना, पालघर व २६ गावे पाणी योजना तसेच पालघर नगरपालिकेसाठी पाण्याची स्वतंत्र योजना आणि उर्वरित गावांसाठी पाण्याची वेगळी योजना माहीम-केळवेपर्यंत नेण्याचे त्यांनी जाहीर केले. वेती वरोती व साखरा धरणाचे पाणी स्थानिक भूमिपुत्रांना उपलब्ध करून देण्यासाठी वेगळी योजना आखणार असल्याचे गावित यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात डायमेकर व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यासाठी क्लस्टर स्थापन करण्यात येईल तसेच या व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे या उद्योगाला बँका सहजपणे कर्ज देऊ शकतील. पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करणार पालघर विधानसभा मतदारसंघात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. अनेक धार्मिक पर्यटन क्षेत्रेही या मतदारसंघात आहेत. त्यांच्या विकासासाठी निधी आणून पालघर हे पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श ठरवणार असल्याचा संकल्प त्यांनी केला. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे अद्ययावत मत्स्य मार्केट, शीतगृहाची व्यवस्था केली जाईल. एमआयडीसीमध्ये तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन कंपन्यांना परवानगी देताना रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी कायदा आणण्याचा मनोदय गावित यांनी व्यक्त केला; याशिवाय जुन्या कंपन्यात नवीन भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपण आग्रह धरू, असे ते म्हणाले. पालघरला कामगार रुग्णालय राष्ट्रीय हित लक्षात घेऊन या ठिकाणी मोठे प्रकल्प सुरू व्हावेत व हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे गावांमध्ये जाणारे रस्ते खराब होऊ नयेत, म्हणून हे रस्ते नवीन करण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्पांच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायट्यांना एका महिन्यात मिळण्यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करू तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र वसई-विरार भागात सुरू करणार आहे. त्याचा फायदा तलासरी भागातील शेतकऱ्यांना होईल. पालघर येथे कामगार विमा रुग्णालय सुरू करणार असल्याचे गावित यांनी सांगितले.

बोर्डी ग्रामपंचायतीची वाळू तस्करी

तहसीलदारांनी बजावली स्वामित्व शुल्क भरण्याची नोटीस  ग्रामसेवकाचा नो रिस्पॉन्स! योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायत खुट खाडी येथील पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम करीत असून, या कामासाठी समुद्राची वाळू उचलण्यात आली. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच स्वामित्व परवानगी व शुल्क न भरता ही वाळू उचलण्यात आल्याने तहसीलदारांनी या ग्रामपंचायतीला तसेच सरपंचांना बाजारभावाच्या पाचपट दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायत अथवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कामासाठी वाळू, मुरूम, दगड आदी वापरायचे असेल, तर त्याचे स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असते तसेच लिलावात भाग घेऊन वाळू उचलता येते. बोर्डी ही ग्रामपंचायत समुद्रकिनारी आहे. येथे अतिशय शांत, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. बोर्डी हे चित्रपट शूटिंगसाठी तसेच पर्यटकांसाठी ही महत्त्वाचे  ठिकाण आहे. पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणाहूनच वाळू तस्करी बोर्डीचा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. अशा पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी पर्यटक…

विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

डोंबिवली : उन्हाळा, पावसाळा असो सण उत्सव असो डोंबिवलीकर आवाज उठवून उठवून शांत झाले पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. मात्र विधानसभा निवडणूका लागताच अनेक रस्त्यांची कामे एमएमआरडीएने हाती घेत…

१० नोव्हेंबरची शिक्षक पात्रता परिक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न- डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवारी शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ केंद्रांवर परीक्षा पार पडेल. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी आढावा घेण्यात आला. रायगड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा पनवेल तालुक्यातील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकुर विद्यालय या तीन केंद्रांवर पार पडेल. सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. परिक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि तेलगू माध्यमाचे परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

‘उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय’

शिंदेंनी तिकीट कापलं म्हणून आमदार ढसाढसा रडला पालघर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. पालघर विधानसभेची जागा महाराष्ट्रातील 288 जागांपैकी एक आहे आणि शिवसेनेसाठी ती…

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील समस्या सोडवणार- डॉ हेमंत सवरा

  योगेश चांदेकर पालघरः मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर पडलेले खड्डे, काँक्रीटीकरणाचे निकृष्ट काम, उड्डाणपुलाची अपूर्ण कामे यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. वाहतुक कोंडी तर रोजची असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत सवरा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करून त्यांना कामासंबंधी सूचना केल्या. लोकांना दिवाळीला तरी व्यवस्थित घरी जाता यावे, यासाठी काय नियोजन करायचे ते करा, असे त्यांनी बजावले. मुंबई-अहामदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे. नांदगाव, जव्हार फाटा आणि सातिवली येथील निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे नांदगाव फाटा ते सातिवली दरम्यानच्या सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. गुजरात मार्गिकेवर ढेकाळे वाघोबा खिंड, तर मुंबई मार्गीकेवर चिल्हार फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट मस्तान नाका,जव्हार, टेन नाका, वरई फाटा आदी वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला बसतो. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या कामात महामार्ग वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि मनोर पोलिस यांच्याशी याबाबत सवरा यांनी चर्चा केली. ठेकेदाराचे दुर्लक्ष नांदगाव फाटा आणि जव्हार फाटा उड्डाणपुलांचे काम करणाऱ्या आर. सी. पटेल या ठेकेदारांकडून वाहतूक नियमन करण्यासाठी ट्राफिक वार्डन नेमले जात नाहीत तसेच सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण, विद्यार्थी आणि कामगारांना बसत आहे.त्यामुळे पंधरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवासाला तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात असून इंधनाच्या खर्चात वाढ झाली आहे. अंतर्गत रस्त्यांचा श्वासही कोंडलेला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर-विक्रमगड रस्ता, वाडा-मनोर रस्ता, मनोर-पालघर रस्ता आणि वरई-पारगाव रस्त्यासह वरई फाट्यावरून पालघर जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या तसेच दहिसर-बहाडोली दरम्यानच्या अरुंद पुलावर वाहतूक मोठी कोंडी होत आहे. पुलाच्या दहिसर बाजूला वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रांगा लागतात. सिग्नल यंत्रणा कोलमडून पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या वाहन चालकांवर स्वतः वाहतूक नियंत्रणाची वेळ येते. पुलाला भगदाड मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कायम वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या पूलाच्या दुरुस्तीची होत होती; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.   कोट ‘खानिवडे पथकर नाका येथे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी, महामार्ग अधिकारी, ठेकेदार तसेच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन  जनतेला दिलासा देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. -डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर