महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024 मुंबई : शाबाज खानने सर्वोत्तम खेळाच्या जोरावर सुमेर मगोचे आव्हान 4-3 (85-32, 64-32, 25-68, 42-74, 70-62, 57-60, 78-41) असे मोडून काढताना महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये त्याच्यासमोर रायन राझमीचे आव्हान आहे. मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्यात सामन्यात, राझमीने अनुभवी क्यूईस्ट आदित्य मेहताचा 4-2 (15-68, 76-28, 66-13, 70-53, 48-73, 71-33) असा पराभव केला. निकाल: स्नूकर 15-रेड – उपांत्य फेरी: शाबाज खान विजयी वि. सुमेर मगो 4-3(85(83)-32, 64-32, 25-68, 42-74, 70-62, 57-60, 78-41); रायन राझमी विजयी वि. आदित्य मेहता ४-२(१५-६८, ७६-२८, ६६-१३, ७०-५३, ४८-७३(७३), ७१-३३). 0000