Category: रायगड

raigad news and updates

 विधानसभा उमेदवारांना माथेरानचा विसर!

 मतांच्या राजकारणात माथेरान विकासात्मक दृष्ट्या पिछाडीवर   माथेरान : माथेरान या नगावाला विकसनशील क्षेत्र बनण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे आणि यापुढेही भावी पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी येथील आशावादी भूमिपुत्रांना आजही स्वप्नवत जीवन जगावे लागत आहे.इथली काही मोजकीच राजकीय पक्षांची मंडळी ज्यांना खरोखरच या गावासाठी काहीतरी नवीन करण्याची मनीषा आहे त्यांनाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कामे करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत.इथल्या एखाद्या पक्षाचे नेतृत्व विकासाची गंगा आणण्यासाठी कार्यक्षम असले तरीसुद्धा मुख्यमंत्री असोत किंवा अन्य खात्याच्या मंत्र्यांना ह्या गावाची कैफियत अथवा गार्हाणी कथन करावयाची झाल्यास तालुक्यातील आमदार किंवा जिल्ह्यातील खासदार याना विश्वासात घेऊन जाणे क्रमप्राप्तच आहे अन्यथा होणाऱ्या कामास देखील हेतूपूर्वक खोडा आणून कोणतीही विकास कामे पूर्णत्वास जाऊच शकत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिकांना आलेला आहे आणि ही येथील वस्तुस्थिती असल्याचेही स्थानिकांमधून बोलले जात आहे. काही दिवसांनी विधानसभा निवडणूका होणार असल्याने कर्जत खालापूर मतदार संघात उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू असून तालुक्यातील गल्लीबोळात प्रचाराची धामधूम सुरूच आहे, प्रत्येक पक्षात पक्षप्रवेश त्याचप्रमाणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू असून जल्लोषात वाढदिवस आणि उत्सव साजरे होताना शक्तिप्रदर्शन जोरात सुरू आहे. आपली बाजू भक्कम असल्याचा अविर्भाव इच्छुक उमेदवार आणताना दिसत आहेत. तालुक्यातील आदिवासी वाड्या असोत किंवा अन्य अडगळीच्या ठिकाणी कधी नव्हे ते तिथे जाऊन त्या भागातील लोकांची विचारपूस,त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, नादुरुस्त रस्ते, वीज,पाणी समस्या याबाबत जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. याच मतदार संघात जेमतेम तीन हजारांच्या आसपास मताधिक्य असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ सुध्दा समाविष्ट आहे. परंतु आजतागायत या स्थळाकडे संबंधित निवडून येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आजवर कानाडोळाच केलेला दिसत आहे.आपल्या पक्षाला साधारणपणे माथेरान मधून एक हजारांच्या आसपास मते मिळणार आहेत त्यामुळे निवडणूक काळात इकडे विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो सहसा कुणीही उमेदवार वेळ वाया घालवत नाहीत आपल्या काही कार्यकर्त्यांना पाठवून जे काही निवडणुकीचे मतांबाबतचे व्यवहार आहेत ते पूर्ण केले जातात.जणू काही या उमेदवारांना इथल्या मतांचे काहीएक स्वारस्य नसल्याप्रमाणे वागतात. आश्वासने ही नेहमीप्रमाणे दिली जातात पण मतांच्या राजकारणामुळे अल्प मतदान असल्याने इथली विकास कामे पूर्ण करण्याची विधानसभा उमेदवारांना माथेरानच्या विकासाबाबत इच्छाशक्ती नाही.निवडुन आल्यावर सुध्दा इकडे फारसे फिरकत नाहीत. माथेरान करांची काही मोठी मागणी नाही.फक्त याठिकाणी पर्यटन वाढीसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अन्य ठिकाणी जाण्यासाठी उत्तम प्रकारे पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी फिनिक्युलर रेल्वे,प्रलंबित असणारा रोपवे प्रकल्प तसेच चौक येथून मोटार वाहन रस्ता थेट रामबाग पॉईंट पर्यंत उपलब्ध होऊ शकतो ही होणारी कामे असून त्यासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कामे पूर्ण करणे बाकी आमची काहीच मागणी नाही असे जाणकार जेष्ठ मंडळी बोलत आहेत. स्वातंत्र्यानंतर सुध्दा आपल्या न्यायहक्कासाठी माथेरान सारख्या दुर्गम परंतु जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. काही प्रश्न असल्यास शासन दरबारी खेटे मारून कामे कशीबशी पूर्ण करून घ्यावी लागत आहेत आणि जी काही अशक्यप्राय कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमदार, खासदार यांना विनवण्या करून आशेवर राहावे लागत आहे मतांच्या  राजकारणात माथेरान पिछाडीवर पडले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे इथली अल्प मतदार संख्या त्यामुळे भविष्यात सुध्दा भूमिपुत्रांचे संघर्षमय जीवन राहणार की काय असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र उपस्थित करत आहेत.यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी किती धावपळ करावी हे त्यांनी स्वतःहून जाणले पाहिजे. 0000

संविधानामुळे स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित – प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी केले. युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. त्यानुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४२४ शाासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. यानिमित्ताने पनवेल येथील आयटीआयमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, अनंता गायकवाड, किशोर सुरते, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय टिकोले, प्रा. आकाश ठाकूर, संदीप वेले, गटनिदेशक नितिन देशमुख, अजय मयेकर, प्रभाकर नगरकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. पराग पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान आणि आपला अभिमान या विषयावर मार्गदर्शन केले.

प्रीतमदादा म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली उलवेमध्ये नवरात्र उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन

‘नवसाला पावणारी उलवेची महाराणी’चा भक्तिपूर्वक पाद्यपूजन सोहळा संपन्न राज भंडारी पनवेल : नवी मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने ६ वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे…

दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी १७ कोटी ३१ लाख; खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता

नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवर आणखी दोन मजले आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल : पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी…

माथेरानच्या कस्तुरबा रोडलगत वनखात्याच्या जागा व्यापल्या हॉटेल धारकांनी

माथेरान : ब्रिटिश राजवटीत १८५० मध्ये स्थापन झालेल्या टुमदार अशा माथेरान पर्यटनस्थळी रस्त्यालगत असणारी मुबलक जागा वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे.परंतु या जागांवर हॉटेल धारकांनी अतिक्रमणे करून जागा व्यापलेल्या आहेत. त्यामुळे…

गणेशोत्सव उत्कृष्ट सजावट स्पर्धेत स्वप्नील कळंबे प्रथम

माथेरान : स्व. संतोष पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्कृष्ट सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये स्वप्नील कळंबे यांनी वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनपटाची आकर्षक सजावट साकारली होती त्यास प्रथम क्रमांक मिळाला असून सागर जोशी यांनी प्रास्तावित रोपवे बाबत उत्तम देखावा सादर केला होता त्यास द्वितीय क्रमांक मिळाला असून पतसंस्थेचे माजी सभापती हेमंत पवार यांनी सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा देखावा सादर केला होता त्यासाठी त्यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. स्व.संतोष पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. येथील एका हॉटेलमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम तसेच सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले याचबरोबर विविध क्षेत्रात कामगिरी बजावणारे मान्यवर यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक योगेश जाधव आणि सुनील कदम यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ई रिक्षाचे जनक सुनील शिंदे,पुष्पा केरेकर आणि सह्याद्री मित्र आपत्कालीन सेवा संस्था यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांसह अन्य पत्रकार मित्र आदी उपस्थित होते.

शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करावे-प्रमोद जगताप

अशोक गायकवाड रायगड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभास आधार प्रमाणिकरणास मुदतवाढ देण्यात आली असून शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण तात्काळ करुन घ्यावे असे आवाहन जिल्हयाचे जिल्हा…

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती?

अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मधून रासायनिक कंपनीतून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास जाणवत होता. नेमकी या कंपन्यांनी गॅस सोडले होते की गॅस गळती झाली होती हे…

नगरपालिकेने वीज साहित्याचा ठेका काढून घ्यावा- स्थानिकांची मागणी

माथेरान : माथेरानमध्ये नगरपालिका मार्फत अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदाराला वीज साहित्याचा ठेका दिलेला आहे परंतु सदर ठेकेदार माथेरान मध्ये केव्हाच उपलब्ध होत नसून अनेक भागातील वीज पुरवठा त्याचप्रमाणे वीज साहित्य…

खारघरमध्ये कृत्रिम तलावाला पसंती

खारघर : खारघर वसाहतीत गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी गणेशभक्त कृत्रिम तलावाला अधिक पसंती देत आहेत. कृत्रिम तलावात दीड दिवसाचे दोन हजार ८४२; तर पाच दिवसांच्या एक हजार ५२२ गणेशमूर्तींचे विसर्जन…