Category: रायगड

raigad news and updates

 गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा लाटला

 शिधा विकण्यासाठी नेत असताना जप्त, दोघांवर गुन्हा अंबरनाथः राज्यातील गोरगरीब जनतेला सण उत्सवांच्या काळात मदत म्हणून अवघ्या शंभर रूपयात सहा जिन्नस असलेला एक अन्न धान्याचा संच दिला जातो. परंतु या संचातील शिधा काळाबाजारात विकण्यासाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. सामाजीक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा साठा पकडण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिधावाटप दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काही सण उत्सवांच्या काळात अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्यांना सहा अन्न धान्य असलेला एक संच सवलतीच्या दरात म्हणजे शंभर रूपयांत दिला जातो. त्यामुळे सण उत्सवांच्या काळात गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होता. आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यात हा शिधा देता आला नव्हता. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या तोंडावर हा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अंबरनाथ शहरातही अशाप्रकारे आनंदाचा शिधा आणि पंतप्रधान योजनेतील शिधा शिधावाटप दुकानांमध्ये देण्यासाठी आला होता. येथील पूर्वेतील महालक्ष्मी नगर येथील शिधावाटप दुकान क्रमांक ४६ एफ १ या दुकानातील हा शिधा एका टेम्पोमधून बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी हा टेम्पो अडवून हा गैरप्रकार उघडकीस आणला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी टेम्पो आणि त्यातील शिधा जप्त केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सुभाष भारती आणि कुदनकुमार गुप्ता या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी चार लाख ३५ हजार रूपयांचे विविध अन्न धान्य जप्त केले आहे. अपहार करण्यात आलेल्या अन्नधान्याच्या साठ्यात एक लाख १४ हजार रुपयांचा २ हजार ८७५ किलो तांदूळ, ५ हजार ५७० रुपये किमतीचे प्रधानमंत्री पिशवी ५५७ नग, अंत्योदय साखर १० किलो, साडी २ नग, ७०० रुपये, ७६,५०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा यात रवा, साखर, चनाडाळ, तेल प्रत्येकी एक किलो, २७ हजार रूपये किमतीचा आनंदाचा शिधा प्रकारातील २७० नग तेल अशा जिन्नसाचा समावेश आहे.

वाशीत विनोबा भावे यांची जयंती साजरी

तुर्भे : स्वातंत्र्यसेनानी तथा भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशी येथील शिवनेरी नगर सहकारी पतपेढीमध्ये अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी…

२७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील २६ कोटींची कामे घेण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. यात स्थानिक आणि नामवंत कंपन्या पालिकेने स्पर्धेतून काही कारणे देऊन बाहेर…

महाराष्ट्रात हे चाललय काय ?

 शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण… लहानमुलांनी टाहो फोडला तरी बेभानपणे मारहाण सुरु रायगड : महाराष्ट्रात नेमके चाललेय काय ? भाजपा प्रदेशाध्यक्षांची मुले दारूच्या नशेत कारने गाड्या उडवतात तरी त्यांच्यावर एफआयर नोंदविले…

माथेरान मध्ये बदलापूर घटनेचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

माथेरान : गणेशोत्सव मध्ये राजकीय व सामाजिक विषयांवरील देखावे हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात असाच एक देखावा माथेरानमध्ये साकारण्यात आला असून तो पाहण्याकरता भाविकांची एकच गर्दी होत आहे. माथेरान मध्ये…

विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पूर्व तयारीच्या कामाना गती द्या-किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्व तयारीच्या कामाना गति किशन . सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता…

खारघरकरांसाठी नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या-प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाखांच्या आसपास असून आज झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ हे एकमेव नाट्यगृह आहे, त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पध्दतीने विकसित होत असलेला विभाग असून, त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठया प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाटयगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी ५००० चौ. मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याच प्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छतेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे –  एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आुयक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर विविधि विभागांची बैठक आयोजित करावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांना सूचना द्या. वेगवेगळे नाविण्यपूर्ण उपक्रम करावेत, त्याचबरोबर त्याचे छायाचित्र पोर्टलवर अपलोड करावेत. समुद्र किनारी स्वच्छता बाबतही सर्वांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, सफाई मित्रांना लाभ द्यायचा आहे, त्याचबरोबर टाकाऊ पासून टिकाऊ यासाठी तसेच विविध स्पर्धांसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहकारी गृह संस्था, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक या सर्वांना सहभागी करुन उपक्रम करावेत. सफाई कामगारांच्या कल्याणांसाठीच्या योजनाही राबवाव्यात. जिल्हाधिकारी सिंह यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री जनमन, विश्वकर्मा अशा योजनांचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. वयोश्री योजनेमध्ये १० हजार अर्जांना मंजुरी देवून जिल्हाधिकारी म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेत आधार सिडींगची प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करावी. वयोश्री योजनेतील मंजूर अर्ज अपलोड करावेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन तीर्थ दर्शन योजनेबाबत यादी तयार करुन पाठवावी. युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यांनी अधिकाधिक उद्दिष्ट गाठून पूर्ण करावेत. पीएम जनमन योजनेत जनधन योजनेसाठी अग्रीण जिल्हा व्यवस्थापक यांना पत्र द्यावेत. किसान सन्मान योजना, मातृवंदना, शिधा पत्रिका वाटप अशा विविध योजनांचे लाभ वाढवावेत. तसेच विश्वकर्मा योजनेसाठी सरंपच स्तरावर प्रलंबित असणारी प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर फिशिंग नेट मेकर, क्वॉयर विव्हर, ब्रुम मेकर, बास्केट मेकर या क्षेत्रातील लाभार्थी यादी पाठवावी.

 महाडमध्ये आज होणार हुतात्म्यांचे स्मरण

 स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, रायगड जि. प.च्या वतीने हुतात्मादिनाचे आयोजन महाड : ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा एल्गार झालेला असतानाच महाडमध्येदेखील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर १९४२ ला ब्रिटिशांना चले जाव करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या किसान मोर्चावर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. या दिवसाचे स्मरण करण्याकरिता आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी महाडमध्ये १० सप्टेंबरला हुतात्मादिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ८२ व्या हुतात्मादिनाचे आज आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहरात स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या हुतात्मादिनाचे आयोजन करण्यात येते. महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिल्यानंतर त्याचे पडसाद महाडमध्येही उमटले. १० सप्टेंबर १९४२ ला महाडमध्ये महाड तहसील कचेरी ताब्यात घेण्यासाठी किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर शहरातील पिंपळपार या ठिकाणी तात्कालीन इंग्रज सरकारने अंधाधुंद असा गोळीबार केला. या बेछूट गोळीबारामध्ये कमलाकर दांडेकर या विद्यार्थ्यासह वसंत दाते, अर्जुन भोई कडू, विठ्ठल बिरवाडकर, नथू टेकावले या भारत मातेच्या पाच वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृती पुढील पिढीला स्मरणात रहाव्यात या उद्देशाने स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या दिनाचे आयोजन केले जाते. हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली मंगळवार सकाळी ८.३० वाजता शाळा क्रमांक चार येथे या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांच्या तसबिरीला पुष्पमालिका व श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे. या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले, म्हाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांसह विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांतील आप्तगण, तसेच महाडमधील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शाळा क्रमांक चार येथून मुख्य बाजारपेठेतील विविध चौकांमध्ये असलेल्या हुतात्म्यांच्या नामफलकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण केल्या जातील. या कार्यक्रमाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.    

अमित शहांची ‘पाठशाळा’

मुख्यमंत्री शिंदेनी बोलावली सेनेच्या मंत्र्याची तातडीची बैठक स्वाती घोसाळकर मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर व्युव्हरचना करण्यासाठी आणि महायुतीतील बेबनाव…