Category: रायगड

raigad news and updates

माथेरानला एकदेशी व्यवस्थेमुळेच विकासाला चालना अशक्य

माथेरान : अतिदुर्गम भागात वसलेल्या माथेरान सारख्या टुमदार पर्यटनस्थळाला निसर्गाने भरभरून ओतप्रोत सुंदरता दिलेली असून नैसर्गिक वरदहस्त लाभलेला आहे.राज्यातील एकमेव प्रदूषण मुक्त स्थळ असल्यामुळेच इथे बाराही महिने पर्यटकांची रेलचेल मोठया…

पनवेलमध्ये ८३ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प येणार-उदय सामंत

अशोक गायकवाड   रायगड : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या दोन्ही कामाचे लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि…

माथेरानच्या गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार

माथेरान : दोनच दिवसांवर गणेशोत्सव आल्याने माथेरान मध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आपल्या लाडक्या बाप्पाला दस्तुरी टॅक्सी स्टँड पासून गावात आणण्यासाठी गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण…

तळा येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने कार्यान्वित करावे-आदिती तटकरे

अशोक गायकवाड   रायगड : रायगड जिल्हयातील तळा तालुक्याच्या मुख्यालयी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापनेस राज्यशासनाने मान्यता दिलेली आहे.त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही आणि देखभाल दुरुस्ती करून हे रुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता महाड महेश नामदे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्राप्त असून मुख्य इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. आंतररुग्ण विभागास नव्याने प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे तातडीने बांधकाम आदेश देण्याचे निर्देश कु. तटकरे यांनी यावेळी बांधकाम विभागास दिले. या रुग्णालयात बाह्यरुग्ण व इमर्जन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरीचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी तसेच एक्सरे मशीन व इतर रुग्ण संबधी अत्यावश्यक साहित्य, साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले होते. त्यानुसार सर्व साधन सामग्री आणि मनुष्यबळ या रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी यावेळी सांगितले. या रुग्णालयात आय सी यु बेड्स आणि आवश्यक तो औषधंसाठा आणि रुग्ण वाहिका सुविधा प्राधान्याने उपलब्ध राहतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या. तळा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील रस्ते आणि पथदिवे बसविण्याची कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने करावी तसेच रुग्णालयासाठी सफाई कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या. तळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काही प्रमाणांत पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये रुग्णसेवेसाठी एक आठवड्यामध्ये बाहयरुग्ण विभाग व ईमरजन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यांत यावी असेही कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

 बेकायदेशीर वृक्षतोड, पावसाळी वृक्ष पडझडीमुळे वातावरणात बदल!

माथेरानच्या थंडाव्याची प्रतिमा पुसली जाण्याची स्थानिकांना भीती   माथेरान : काही वर्षांपासून माथेरान मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली दिसत आहे. तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सुध्दा जुनी झालेली झाडे मुळासहित उन्मळून पडत आहेत त्यामुळे इथल्या वातावरणात बदल झाला असून पावसाळ्यात सुध्दा याठिकाणी पंखा लावल्याशिवाय चैन पडत नसून पर्यटक सुध्दा हॉटेल तसेच घरगुती लॉज मध्ये नेहमीच एसीची मागणी करताना दिसत आहेत. दोन दशकांपासून येथील व्यवसायात मंदीचे सावट दिसत असल्यामुळे काही हॉटेल धारकांनी तसेच बंगले मालकांनी आपले जुने बंगले विकले आहेत. याच जुन्या बंगल्याच्या जागी अलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी अनेकदा येथील राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सर्रासपणे वृक्षतोड करण्यात आलेली असून वनखात्याच्या जागा सुध्दा बळकावण्यात आल्या आहेत. तर परिसरातून पोट भरण्यासाठी आलेल्या मंडळीनी आता इथेच आपले कायमचे बस्तान मांडल्यामुळे त्यानी सुध्दा जागा मिळेल त्याठिकाणी भरमसाठ वृक्षतोड करून एकमजली घरे उभारली आहेत. नव्याने सुध्दा हॉटेल बांधण्यात येत असून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल केली जात आहे. स्विमिंग पूल बांधण्यासाठी अडसर ठरणारी मोठमोठी जुनी झाडे कुऱ्हाडीचा आवाज होऊ नये यासाठी करवतीच्या साहाय्याने मुळासहित कापत आहेत.दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या ठिकाणी असंख्य झाडे कशामुळे सुकून गेली आहेत यावर वनखात्याने, वन समितीने लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे. या सर्व बाबींवर संबंधित अधिकारी वर्ग तसेच नेमून दिलेल्या समितीच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. नुकताच मेघदूत हॉटेलमध्ये सुध्दा अशाचप्रकारे झाड पाडण्यात आले आहे याबाबत येथील वनखात्याच्या अधिकारी वर्गास विचारणा केली असता आम्ही वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे तर वन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सुध्दा अशाचप्रकारे उत्तर देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. माथेरान परिसरातील वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात ३८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आले आहे याबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली असून वृक्षतोड वर काहीतरी उपाययोजना करावी यासाठी पर्यावरण प्रेमी नागरिक राकेश कोकळे यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेतली होती. सदर झाड सुकलेले असून ते तोडल्या प्रकरणी वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार वृक्षतोड करणाऱ्या मालकावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. उमेश जंगम–वन क्षेत्रपाल

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. 0000

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार – देवेंद्र फडणवीस

अशोक गायकवाड   रायगड : रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी १५३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून, हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उरण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत, सावित्रीबाई फुले फुल मार्केट आणि विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, उरण टाऊन हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन,उरण चारफाटा येथील मच्छिमार्केटचे उदघाटन यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी उरण येथे झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, महेश बालदी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्हावा – शिवडी अटल सेतूमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे. यामुळे जिल्ह्यात मोठया संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे जी डी पी मध्ये १ टक्के वाढ होणार आहे. डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. या दोन भागांमधून मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत असून देशपातळीवर डेटा सेंटर्सची ६० टक्के क्षमता ही रायगड आणि नवी मुंबईत आहे.त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा होत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आ. महेश बालदी हे अतिशय अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय कल्पकतेने मतदार संघात दर्जेदार व उत्कृष्ट विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासकामासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उरणच्या विकासासाठी सर्वोतॊपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. महेश बालदी सातत्याने आग्रही आहेत. उरण मध्ये सर्वसमावेशक विकास कामाना प्राधान्य देण्यात आले आहे. उरणच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम आ. बालदी यांनी केले आहे. उरणच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रीरंग बारणे यांचे मनोगत झाले.  महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनःरूच्चार आपल्या प्रास्तविकात केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 00000

ई रिक्षाच्या सेवेचा लाभ आम्हाला अगोदर द्या !

पर्यटकांची मागणी थेरान : पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी ई रिक्षा मैलाचा दगड ठरत असताना ह्या सेवेचा लाभ अगोदर आम्हा पर्यटकांना देण्यात यावा अशी मागणी खुद्द पर्यटकांकडून केली जात आहे. गेल्यावर्षा…

 डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून जिल्ह्यात

 महावाचन उत्सव २०२४ उत्सव संपन्न  अशोक गायकवाड   अलिबाग :समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला.…

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात कर्जत तालुक्यात माथेरानच्या प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक

माथेरान : अत्यंत चिकाटीने आणि मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात कर्जत तालुक्यात माथेरानच्या प्राथमिक शाळेचा…