Category: रायगड

raigad news and updates

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा होणार कायापालट

अशोक गायकवाड   अलिबाग : आदिवासी बांधवांच्या विकासाच्या वाटचालीत मुख्य प्रवाहासोबत आणण्याच्या व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा या उद्देशाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा समावेश आहे. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबविण्यात येणा-या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मंत्रालय / विभाग पुढील ५ वर्षात उद्दीष्टे निश्चीत करून त्यांची कालबध्द पध्दतीने अंमलबजावणी करेल. या अभियाना अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी सक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ध्येय सामाविष्ट आहे. त्यासाठी आदिवासी बांधवांना पक्के घर देणे, बारमाही रस्ते बांधणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक आदिवासी वाड्या-पाड्या पर्यंत वीज सुविधा उपलब्ध करून देणे, जेथे जेथे शक्य आहे तेथे सौर विद्युत ऊर्जेद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देणे तसेच अंगणवाडी केंद्र उभारून याद्वारे पोषण अभियान राबविणे या व यासारख्या अनेक सुविधांचा सामावेश करण्यात आला आहे. आदिवासी भागातील पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि आदिवासी समुदायाला पर्यायी उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबाबरोवर राहणे) यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, वनक्षेत्रात राहणाऱ्या FRA पट्टाधारकांकडे मिशन अंतर्गत विशेष लक्ष पुरविले जाईल. या अभियानांतर्गत जिल्हयातील शासकीय आणि वसतीगृहांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराच्या निदानासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले क्षमता केंद्र स्थापन करण्यात येईल. या अभियानांतर्गत आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी आणि विपणन पायाभूत सुविधा, जागरूकता, ब्रेडींग, पॅकेजिंग आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आदिवासींकडून थेट खरेदी करता यावी यासाठी टीएमएमसी केंद्रांची स्थापना केली जाईल. हे अभियान जिल्ह्यातील असुरक्षित समुदायाच्या कल्याणासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचणारी सहकारी संघराज्य व्यवस्था आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनाचे आगळे वेगळे उदाहरण ठरेल. 00000

पार्किंगसाठी एमपी ९३ प्लॉट मिळेपर्यंत पर्यटकांची ससेहोलपट कायम ?

माथेरान : माथेरान बद्दल प्रचंड आत्मीयता आणि प्रेम असल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु इथे आल्यावर दस्तुरी वाहन पार्किंग मध्ये सुट्ट्यांच्या हंगामात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध…

 डॉ. अलका नाईक नक्षत्र गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित

‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंचाचा २५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई, :  मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री, साहित्यिक डॉ. अलका नाईक यांना नक्षत्र गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. नक्षत्राचं देणं काव्यमंच,…

 प्लास्टिक मुक्त माथेरान केव्हा होणार ?

 स्थानिकांसमोर यक्षप्रश्न !   माथेरान : माथेरान मध्ये बहुतेक ठिकाणी प्लास्टिकजन्य कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत दिसत असून स्वच्छ माथेरान, हरित माथेरान,सुंदर माथेरान ही बिरुदावली हळूहळू लोप पावत चाललेली असल्याने या…

निरुपयोगी, भंगार साहित्यविक्रीसाठी सिलबंद लिफाफे कार्यालयात जमा करा – एन.के.चौधरी

अशोक गायकवाड रायगड : औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल व यंत्रनिगराणी कार्यशाळा व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या संस्थेमधील निर्लेखित झालेले निरुपयोगी व भंगार साहित्याची दरपत्रके मागवून विक्री करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक जी.एस.टीधारक भंगार खरेदीदारांनी विहित नमुन्यातील नमुना अर्ज ङिडी.सह २७ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक संस्था, पनवेल एन.के.चौधरी यांनी केले आहे. सदरील भंगार साहित्य संबंधित विभागामध्ये ठेवण्यात आलेले असून सदरचे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने विक्री करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निरनिराळ्या व्यवसायामधील जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामुग्री तसेच भंगार व निरुपयोगी साहित्याचे एम.एस. स्क्रॅप, कॉपर स्क्रॅप, अॅल्युमिनियम स्क्रॅप, ट्युबपट्टी स्क्रॅप, कास्टिंग जॉब इत्यादी विविध प्रकारच्या बाबी समाविष्ट आहेत. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफापध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. (GST) नोंदणी धारक भंगार खरेदीदाराकडुन सिलबंद निविदा मागविण्यात येत असून ज्या खरेदीदाराचे दर कमाल असतील अशा पात्र जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदीकारास भंगार साहित्याची विक्री करण्यात येईल. विक्री करावयाच्या वस्तू संबंधित विभागामध्ये २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पहावयास मिळतील.या कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील अर्ज प्रति निविदारु. ३००/- (ना परतावा) संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येतील. सदर नमुन्यातील अर्जातील माहिती अचूकपणे निविदेसोबत रु. १०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार मात्र) अनामत रक्कम म्हणून जमा करणे अनिवार्य असेल. सदर रक्कमेचा धनाकर्ष, Registrar, Industrial Training Institute Panvel, Dist- Raigad. यांचे नावाने ङिडी. च्या स्वरुपात करावा. संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा व त्यामध्ये फेरबदल करण्याचा पुर्ण अधिकार प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल हे राखून ठेवीत आहेत. सिलबंद निविदा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता समिती सदस्यांमार्फत प्राचार्यांच्या दालनात उघडण्यात येतील.

 माथेरान-कर्जत मार्गावर नवीन मिनीबस केव्हा उपलब्ध होणार ?

स्थानिकांमध्ये नाराजी माथेरान  : माथेरान साठी २००८ मध्ये कर्जत नेरळ मार्गे माथेरान मिनीबस सेवा सुरू होऊन जवळपास पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी असणाऱ्या मिनीबस जुन्या झाल्याने अनेकदा घाटरस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडत असतात.त्यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात पायपीट करावी लागते. काही महिन्यांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी नवीन बस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप या कर्जत – माथेरान मार्गावर नवीन बस उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. स्थानिकांनी अनेकदा संघर्षाला सामोरे जाऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी कठोर परिश्रम घेऊन ही मिनीबसची सेवा उपलब्ध करून घेतली होती. या मार्गावर दोन बसेस देण्यात आल्या आहेत परंतु यातील एक बस कर्जत पनवेल अशी फेऱ्या मारत असून एक बस कर्जत नेरळ मार्गे माथेरान अशा फेऱ्या करत आहे. घाट रस्त्यात ही बस वारंवार बंद पडत असते यामुळे शालेय विद्यार्थी,व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे मिनीबसच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातून सर्वाधिक भरघोस उत्पन्न मिळत असताना देखील परिवहन महामंडळ इकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न अनेकांमधून उपस्थित केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या मिनीबस या मार्गावर सुरू व्हाव्यात यासाठी अनेकदा उपोषणे त्याचप्रमाणे स्थानिकांनी,विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवेदने कर्जत आगारात त्याचप्रमाणे वरिष्ठांना सुध्दा दिलेली आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत परंतु अद्याप इथे नव्याने बसेस सुरू केलेल्या नाहीत त्यामुळे स्थानिकांमधून याबाबत प्रचंड नाराजी दिसून येत आहे. नेरळ कर्जत अथवा बदलापूर या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिनीबस सेवा ही जीवनवाहिनी बनली आहे. आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी परिसरात जाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याने ही मुले विविध क्षेत्रात,व्यवसायात, नोकरीत चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत तर नियमितपणे प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला स्वस्त आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही सेवा खूपच सोयीस्कर बनलेली आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी ही एकमेव बस असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात कौशल्य संपन्न उपक्रमांचा शुभारंभ

राज्यातील १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ   वर्धा : पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या प्रयत्नांना यश

माथेरान : माथेरान मधील काही महत्वाच्या पॉईंट भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटकांच्या सुविधेसाठी रेडिमेड सुलभ शौचालय उभारले होते परंतु अनेक वर्षांपासून या वॉश रूम ( रेडिमेड सुलभ शौचालय ) मध्ये पाण्याची…

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा-राज्यपाल

अशोक गायकवाड अहमदनगर : जीवनात अनेक समस्यांना सामोरे जातांना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.* लोणी बु. येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, संस्थेचे विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. अरुण कुमार व्यास आदी उपस्थित होते. स्नातकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जीवनात आव्हानाचे प्रसंग आलेत, त्यांनी आत्मविश्वासाने त्यावर मात करून उद्दिष्ट गाठले. स्नातकांनी सेवा भावनेने कार्य करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. आपल्या यशासाठी आई-वडिलांनी परिश्रम घेतले आहेत हे न विसरता त्यांच्याविषयी कायम श्रद्धा मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.राधाकृष्णन पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याच्या बळावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठासारखी संस्था उभी राहू शकते हे संस्थेसाठी झटणाऱ्या स्व.विठ्ठलराव विखे पाटील आणि स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे विद्यापीठाचे कार्य इतरांना मार्गदर्शक आहे. वर्षभरात दहा लाख नागरिकांना उपचार देण्याचे संस्थेचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. सामान्य कुटुंबीयातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यापीठात देण्यात येते. सेवाभावनेने काम करणारे डॉक्टर्स येथून तयार होतात. विद्यापीठाने रुग्णावर उपचार करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या सुविधा इथे उभारण्यात येत आहेत. संस्थेची प्रगती खरोखर कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल म्हणाले. मंत्री विखे पाटील म्हणाले, प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यापीठाचे कार्य सुरू असून सामाजिक बांधिलकीने समाजाच्या प्रत्येक घटकाला सेवा देण्याचे कार्य होत आहे. समर्पण, सामाजिक उत्तरदायित्व, सेवा कार्याची परंपरा प्रवरा आरोग्य विद्यापीठ पुढे नेत आहे, असे त्यांनी सांगितले.वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना विद्यार्थ्यांनी नवीन संशोधनावर भर देऊन त्याचा समाजासाठी उपयोग करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन करून श्री.विखे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पद्मश्री सावजी ढोलकिया यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचेही ते म्हणाले.पद्मश्री ढोलकीया म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतात. विद्यार्थ्यांनी आपण सर्वोत्तम असल्याचा आत्मविश्वास बाळगावा. मी कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट गाठू शकतो, ईश्वर चांगले प्रयत्न करणाऱ्याच्या सोबत असतो, मी विजेता आहे हा विचार मनाशी बाळगा. मागचे अपयश विसरून वर्तमानात विजेत्याचा आत्मविश्वास बाळगून काम करा. नशिबावर अवलंबून न राहता विश्वासाने काम केल्यास यश संपादन करता येते. सेवा ही सर्वोत्तम गुंतवणूक असून त्याआधारे सर्वोत्तम यश मिळविता येईल, असा प्रेरक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मिळालेला सन्मान जबाबदारी म्हणून स्विकारत असून अधिक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील म्हणाले, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशा भागात सेवा देणारे कुशल वैद्यकीय अधिकारी घडविण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. ९४९ पदवी आणि पदव्युत्तर स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत संचलनाने झाली. कार्यक्रमाला कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 00000

राज्य तायक्वांदो अध्यक्षपदी संदीप ओंबासे यांची निवड

कल्याण : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप ओंबासे (ठाणे) तर सचिवपदी गफार पठाण (सातारा) यांची एकमताने निवड करण्यात आली. देशातील   शिखर संघटना इंडिया तायक्वांदो च्या मान्यतेने…