Category: रायगड

raigad news and updates

वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या

अर्णव जाधव आणि गार्गी राऊत यांची चमकदार कामगिरी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केले सन्मानित अशोक गायकवाड खालापूर : वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या अर्णव दिपाली शैलेश…

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

अशोक गायकवाड अलिबाग : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या नेतृत्वाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पाच पुरुष व एक महिला या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हद्दीमध्ये गेले दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत होती. त्याअनुषंगाने १२ जानेवारीला महाड एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथे काही बांगलादेशी कामगार त्यांचे अस्तित्व लपवून अवैधरीत्या घुसखोरी करून वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करीत आहे. त्या अनुषंगाने महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी येथे चंद्रकांत शिंदे याचे घरात छापा टाकला असता त्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांना अवैधरीत्या वास्तव्यास असलेले ०६ बांगलादेशी नागरिक मिळून आले. त्यांना मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बांगलादेशी नागरिकांना पी.डी.आय.पी.एल या बांधकाम कंपनीने कामावर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बांगलादेशी नागरीकांकडे पोलिसांनी बांगलादेशातून भारतात येण्याकरिता वैध प्रवासी कागदपत्राची मागणी केली असता त्या इसमांनी आमच्या कडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. आम्ही बांगलादेशातील गरिबी व उपासमारीस कंटाळून रोजगाराकरिता सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केलेला आहे. अशी माहिती दिल्याने सदर इसमांनविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०६/२०२५ कलम ३ (१) (अ ) परकीय नागरिक आदेश १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ ) ६(अ ) प्रमाणे बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहे. १) माणिक तुफेझेल विशष वय ३२ वर्ष धंदा सेंट्रिंग चे काम सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. सुबोधपुर बडतळा बाजार, पो. ठाणे दश्शोना, जि. चौंडगा जोषारे खुलना, देश -बांगलादेश, २) नूर इस्माल बिस वास उर्फ सिकंदर रोने मानेरूलखान वय ३० वर्ष सध्या रा. वरंध ता. महाड जि. रायगड मूळ रा. बासग्रॅम, पोलीस ठाणे कालिया, विभाग खुलना जि. नोडाई, देश बांगलादेश, ३) सागर मिराज शेख वय ३० वर्ष रा. पिंपळदरी ता.महाड जि. रायगड मूळ रा.उत्तर शिंगे, पोलीस ठाणा नोडल, जि. नोडल विभाग खुलना, देश बांगलादेश, ४) शांतु शकुरअली शेख वय-१९ वर्ष सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. पुरुलिया, पोलीस ठाणा कालिया, जि. नाडाई विभाग खुलना, देश- बांगलादेश., ५) शिलीम हामशेर परामणी वय-४० वर्ष, सध्या राहणार पिंपळदरी तालुका महाड जिल्हा रायगड, मूळ रा अब्दुलपुर ठाणा-लालपुर जिल्हा नाटोर विभाग रासई देश बांगलादेश असे पाच पुरुष व एक महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव विभाग पुष्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी प्रभारी सपोनि/जीवन माने व पोसई/संजय मुंडे, पोसई/समेळ सुर्वे. सफौ/हनुमंत पवार, सफौ/दीपक ढेपे, पोह/राजेश गोरेगावकर, पोह/चनप्पा अंबरगे, पोह/सिद्धेश मोरे, पोना/राजेश माने, पोना/सतीश बोटे,पोना/गणेश भैलुमे,पोशी/सुनील पाटील, पोशी/सुनीलकांजर, पोशी/शीतल, बंडगर, पोशी/निखीलबळे, पोशी/अमोल कुंभार, पोशी/शुभम पवार, पोशी/सुजील गोंधळी, पोशी/सागर गुलींग, पोशी/विजय दळवे मपोशी/ तेजश्री भोईर, यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करा – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला सोयी सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात येत आहे. तसेच कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीला गैरहजर राहणारे वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. बैठकीला विनापरवानगी गैरहजर राहण्यासोबत भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.१०) महाड, पोलादपुर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, १५वा वित्त आयोग १०० टक्के खर्च करणे, स्वच्छ भारत अभियानातंर्गत करण्यात आलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या.सदर आढावा सभेस महाड तालुक्यातील वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे हे विनापरवानगी गैरहजर राहिले होते. तसेच मोतिसिंग लहानुजी भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना निलंबीत करण्यात आले आहे. सदर आढावा सभेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महाडच्या गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पोलादपुरच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट, सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव आण्णा कटरे तसेच सर्व विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.

मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव

अशोक गायकवाड रायगड : मे.इझिनॉक्स स्टिल्स लि.कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा तहसील कार्यालय, खालापूर येथे सोमवार, २३ डिसेंबरला जाहीर लिलाव होणार आहे. लिलाव घेण्यास कोणीही न आल्यास किंवा योग्य बोली न लागल्यास सचिन किर्दत, तलाठी सजा सावरोली यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रु. १/- नाममात्र बोलीवर लिलाव घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.अशी माहिती खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे. मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. तर्फे डायरेक्टर सुधीर गुप्ता, रा. आनंदवाडी-सावरोली, ता. खालापूर, यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी, विनिर्दिष्टी केलेल्या मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असून विक्रीसाठी यामध्ये निश्चित केलेल्या दिवसापूर्वी तलाठी सजा सावरोली यांना, देय रक्कम दिली नसेल तर, उक्त मालमत्ता, तिच्यावर बसविण्यात आलेल्या सर्व भारापासून व तिच्या संबंधात करण्यात आलेली सर्व अनुदाने व संविदा यांपासून मुक्त, अशी मालमत्ता तहसिल कार्यालय, खालापूर येथे सोमवार,दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येणार आहे, असे खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी कळविले आहे. गाव आनंदवाडी भू- मापन क्रमांक व पोट-विभाग सं. नंबर क्रमांक ५/१, क्षेत्र (चौमी) ४ हजार ७००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार संबंधीत क्षेत्रासाठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार क्षेत्र रु.३८१० चौमी साठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, देय असलेल्या जमीन महसूलीची थकबाकी १ कोटी ०२ लाख २२ हजार ७६०.

रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने उज्ज्वल परंपरा कायम राखली – सखाराम पवार

अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे कौतुगोद्गार रा.जि.प.…

५०व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – हरिद्वार, उत्तर प्रदेश – २०२५.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी साखळीत दोन विजयाने बाद फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा केला.   मुंबई:- महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी “५० व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळवीत…

माथेरान नगर परिषदेकडून मच्छरदाणीचे वाटप

माथेरान : माथेरानचा संपूर्ण भाग हा जंगलाने व्यापलेला असून यामध्ये काही प्रमाणात विषारी सापांचे प्रमाण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे साप कधी कधी चुकून घरामध्ये शिरतात. आणि या विषारी सापांपासून कुणालाही…

अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेण्यात येणार – मंत्री नितेश राणे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेण्यात येणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या…

लोकशाही दिनात ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करा – किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : तालुकास्तरीय लोकशाही दिनात ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे. लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने आपल्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे…

 ई रिक्षा चालू ठेऊन बिनधास्तपणे उपोषण करा!

पर्यटकांसह पालकांची मागणी   माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित…