Category: ठाणे

Thane news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत, क्रांतिकारक होऊन गेले, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहासच बदलून नव्याने इतिहास लिहून आधुनिक भारताचा नकाशा जगासमोर आणणार्‍या प्रकांड पंडिताचा ६ डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन. शोषित-वंचितांच्या हक्क आणि अधिकारांसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. बाबसाहेबांच्या निधनाची वार्ता देशासह जगभरात वाऱ्यासारखी पसरली होती. ही वार्ता ऐकून देशातील प्रत्येक नागरिकांना हंबरडा फुटला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव मुंबईत आल्यानंतर मुंबईत प्रचंड गर्दी झाली. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला असंख्य लोकं जमली. अक्षरशः मुंबई थांबली होती. बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. २५ कापड गिरण्या पूर्णपणे बंद, तर ५ गिरण्या अंशत: चालू होत्या. परळ, माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या गोदीतील सुमारे २५ हजार कामगार आले होते, अशी आठवण डॉ.जितेंद्र आव्हाड करुन देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी फक्त आचार्य अत्रे यांचे भाषण झाले. आचार्य अत्रे या भाषणात म्हणतात,असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही’ आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मराणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत..? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली..? “महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.“झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत..! भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हा तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अशी शब्दुसमनांची आदरांजलीआमदारडॉ.जितेंद्रआव्हाडयांनी वाहिली आहे.

खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत

ठाणे : ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासानाने गेल्या काही महिन्यांपासून पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडी किनारी भागातील…

 अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

 महेक पोकरची धुवाधार शतकी खेळी   ठाणे : सलामीला आलेल्या  महेक पोकरची कर्णधारपदाला साजेशी धडाकेबाज शतकी खेळी हे व्हिक्टरी क्रिकेट क्लबने स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबवर मिळवलेल्या मोठया विजयाचे वैशिष्ट्य ठरली. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हिक्टरी क्रिकेट क्लबने २९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबला ९१ धांवात गुंडाळत मोठा विजय साजरा केला. सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात महेक आणि अलीना मुल्ला या सलामीच्या जोडीने दिडशतकी भागीदारी रचत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३० चौकार आणि एक षटकारासह १५५ चेंडूत १८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अलिना ६१ धावांवर बाद झाल्यावर ही भागिदारी संपुष्टात आली. अलिनानाने अर्धशतकी खेळीत ११चौकार आणि एक षटकार ठोकला. महेकने १०१ चेंडूत २० चौकार मारत ११२ धावा केल्या. क्रितिका यादवने ४८ धावा केल्या. आकृती भोईरने  दोन, पलक धरमशी आणि दिपीका भारियाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना प्रियंका राठोड आणि पलक धरमशीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. प्रियंकाने ३१ आणि पलकने २९ धावा केल्या. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाना दडपणाखाली ठेवताना अलिनानाने तीन, प्रिशा देवरुखकर, विधी मथुरिया आणि  तन्वी परबने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. शतकविर महेक पोकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : व्हिक्टरी क्रिकेट क्लब : ४० षटकात ४ बाद २९३ ( महेक पोकर ११२, अलिना मुल्ला ६१, क्रितिका यादव ४८, आकृती भोईर ८-५९-२, पलक धरमशी ८-५९-१, दिपीका भारिया ३-२२-१) विजयी विरुद्ध स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब : ३०.१ षटकात ९१ ( प्रियंका राठोड ३१, पलक धरमशी २९, अलिना खान ८-१-२७-३, क्रितिका यादव ७-१-१८-१, प्रिशा देवरुखकर ६-१-२०-१, विधी मथुरिया २.१-३-१, तन्वी परब १-६-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : महेक पोकर (व्हिक्टरी क्रिकेट क्लब). 00000

Heading – ठाण्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये आता सर्वंकष स्वच्छता मोहीम

शनिवारपासून सिद्धेश्वर तलाव परिसरातून उपक्रमाला सुरुवात ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमधून या उपक्रमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात झोपडपट्टी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. तेव्हापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ठराविक दिवशी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. या मोहिमेत दैंनदिन साफसफाईबरोबरच मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. आयुक्त राव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, या उपक्रमात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय या भागातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. अशा ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात आज, शनिवारपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव भागातील वस्तीमधून होणार आहे. कोट शहरातील मुख्य रस्त्यांपाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छताविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका ००००

ठाण्यात रंगणार ४७ वे एकदिवसीय महानगर साहित्य संमेलन

ठाणे: तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि एक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवणाऱ्या ठाणे शहरात या वर्षाला निरोप देताना महानगरसाहित्य संमेलन साजरे होणार आहे. महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल.भावे यांनी…

ठाण्यात फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी रस्त्यांचे होणार सर्वेक्षण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच फेरिवाला…

महिला बचत गटातील उद्योजक महिलांनी यशस्विनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

ठाणे : महिलांचा आर्थिक विकास साध्य करण्याकरिता महिला बचत गटातील उद्योजक महिलांना बाजारपेठ उपलब्ध करण्याकरिता यशस्विनी हे ई कॉमर्स पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उद्योजक महिलांना आंतरराष्ट्रीय…

समाज कल्याण विभागांतर्गत दिव्यांग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

ठाणे : समाज कल्याण विभागांतर्गत ठाणे जिल्ह्यातील २६ दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानित्तम ३ डिसेंबर  ते १० डिसेंबरपर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांच्या…

 अविनाश फडतरे यांच्याहस्ते जिल्हा परिषदेत अभिवादन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सभागृहात ६ डिसेंबरला  उप मुख्य कार्यकारी (सा. प्र) अविनाश फडतरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिला असून आपले आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी खर्च केले आहे. आज जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य विषयक लाभ तसेच विविध योजना राबविण्याचे काम करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थ कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही यांची काळजी घ्यावी, असे उप मुख्य कार्यकारी (सा. प्र) अविनाश फडतरे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. बासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी दिवसातील १८ तास अभ्यास केला व कष्ट करून प्रत्येक घटकातील लोकांसाठी समाज कल्याणाची काम केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आणि त्यांनी घेतलेली मेहनत आपण सर्वांनी लक्षात घेऊन तशी वाटचाल आपण केली पाहिजे, असे मार्गदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रमिला सोनावणे यांनी भिम स्मृती गीत सादर केले तर सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोर शेजवळ यांनी बुध्द वंदना सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोर शेजवळ, कनिष्ठ सहाय्यक सुनिता वाकसे, माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रमिला सोनावणे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीना उजाळा दिला. 0000

मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील रहिवाशांसोबत झाली क्लस्टरबाबत सभा

ठाणे : मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील रहिवाशांसोबत नुकतीच क्लस्टरबाबत सभा संपन्न झाली. शहरातील बहुमजली इमारती व झोपडपट्टया इत्यादींचा एकत्रित विकास साध्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने…