Category: ठाणे

Thane news

जागर निष्ठेचा

कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांनी वाहिली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांना आदरांजली कल्याण : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांनी आज सकाळी काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. बासरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. हे स्मारक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतीक म्हणून उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, भारतातील बाळासाहेबांचे पहिले स्मारक म्हणून याचे महत्त्व अधिक आहे. बासरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्मारक उभारले गेले…

हर्षित बोबडेची शतकी खेळी व्यर्थ

ठाणे : हर्षित बोबडेच्या दमदार शतकी खेळीनंतरही पहिल्या डावात अवघ्या एका धावेने पिछाडीवर पडल्यामुळे यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीला १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पर्धेतील प्रवास आटोपता घ्यावा लागला. सनराईझ क्रिकेट क्लबच्या पहिल्या डावातील २३५ धावांना उत्तर देताना स्पोर्टिंग क्लब कमिटीने २३४ धावापर्यत मजल मारली होती. प्रथम फलंदाजी करताना अर्णव मिरगेच्या ७६ धावांच्या अर्धशतकी खेळीने सनराईझ क्रिकेट क्लबने द्विशतकी धावसंख्या उभारली. तन्मय मालुसरेने चार आणि आर्यन राजने तीन बळी मिळवले. उत्तरादाखल हर्षितने १२३ आणि स्पर्धेत फलंदाजीत छाप पाडणाऱ्या विवान हजारेच्या ४६ धावांच्या खेळीनंतरही स्पोर्टिंग क्लब कमिटीला पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शौर्य नवलेने चार फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावात सनराईझ क्रिकेट क्लबने २ बाद १०७ धावापर्यत मजल मारली होती. संक्षिप्त धावफलक : सनराईझ क्रिकेट क्लब : (पहिला डाव) : सर्वबाद २३५ ( अर्णव मिरगे ७६,तन्मय मालुसरे २०-६-६६-४,आर्यन राज १४-६-२२-३). दुसरा डाव : ३६ षटकात २ बाद १०७.…

मिरा-भाईंदरच्या विकासात नरेंद्र मेहतांची महत्त्वाची भूमिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मीरा-भाईंदर : मिरा भाईंदरचा चेहरा मागील दहा वर्षात बदलला  आहे. मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना व इतर अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ह्यामुळे एक प्रकारे शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत असल्याचे…

जेव्हा गद्दारी झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड हेच पवारांसोबत पहाड बनून उभे राहिले – कन्हैय्या कुमार

 महाविकास आघाडीचे सरकार आले तर देशाचे राजकारण बदलेल – अजय राय अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. यावेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना पाच वर्ष मागे जाऊन पहा, जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार यांच्यासोबतडॉ..जितेंद्र आव्हाड हेच पहाड बनून उभे राहिले होते, अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्र्याच्या एमएप व्हॅली येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत कन्हैय्या कुमार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित  होते. आपल्या भाषणात कन्हैय्या कुमार यांनी देशभरातील विविध मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या २० तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाहि की तुम्हाला काही शिकवायला आलो आहे. पण, धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्याडॉ..जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. आपण देश आणा राज्यातील सत्ताधाऱ्यांना पहात आहात. मी स्वतः विविध राज्यांमध्ये फिरत आहे. पण, गडबड करणे हेच भाजपचे काम आहे. हरयाणामध्ये आपण जिंकत होतो. मात्र, भाजपने गडबडी केली. म्हणूनच प्रत्येक मत महत्वाचे आहे. प्रत्येकाने जितेंद्र आव्हाड यांना मत देऊन सेक्युलर आवाज बुलंद केला पाहिजे. अजित पवारांबाबत बोलताना कन्हैय्या कुमार यांनी, खरी राष्ट्रवादी आणि डॉ..जितेंद्र आव्हाड हे हिमतीने लढत आहेत. म्हणूनच अजित पवारांनी घड्याळ चोरून नेले. पण, आता त्यांचे घड्याळ बंद पडले आहे. तरीही, हे बंद घड्याळ पुढे करून अजित पवार हे जनतेला ‘गुमराह’ करीत आहेत. पण, त्यांनी हे लक्षात ठेवावे; त्यांचा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्याने आमच्या निश्चिततेला फरक पडणार नाही, असे सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेवर कोणाचा विश्वास आहे, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आपणाला आता ५० कोटी घेऊन गद्दारी केलेल्यांशी लढायचे आहे. कारण, गद्दारीचा पाया रचणारे उपमुख्यमंत्री धर्म…

इथे फक्तडॉ.. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन, कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक !

अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, यासाठी  प्रवेशद्वारांवर भला मोठा फलकच लावला आहे. वाय जंक्शन येथे ग्लोबल पार्क ही प्रचंड मोठी आणि कौसा येथील नुराणी हाॅटेलशेजारी आमीर नामक तीन विंगची सोसायटी आहे. या दोन्ही सोसायट्यांमध्ये शेकडो कुटुंबिय वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांनी एकमुखी ठराव करूनडॉ..जितेंद्र आव्हाड यांना मते देण्याचा निर्धार केला आहे. १५ वर्षांपूर्वी मुंब्रा – कौसा हा परिसर अविकसित होता. सन 2009 मध्येडॉ..जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर परिसराचा विकास होऊ लागला. आज शहरातील रस्ते, पाणी,  वीज या सर्व समस्या…

महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच उद्धव ठाकरेंसोबत – राजन राजे

‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे पक्षाध्यक्ष  राजन राजे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे,…

 काँग्रेस आघाडीची आश्वासने खोटी – केंद्रीय मंत्री शेखावत

  अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडीतील काँग्रेसने यापूर्वी जेवढी आश्वासने दिली त्यापैकी एकाचीही पुर्तता केलेली नाही.जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे प्रलोभन दाखवुन काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेशात सत्ता हस्तगत केली,…

गद्दार विरुद्ध खुद्दार हाच या निवडणुकीतील मुद्दा – नरेश मणेरा

अनिल ठाणेकर ठाणे : गद्दार विरुद्ध खुद्दार हाच या विधानसभा निवडणुकीतील मुद्दा आहे. यामुळेच प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील या लढाईत निष्ठावंत म्हणून मतदार मलाच निवडून देतील, असा दावा ओवळा माजीवडा विधानसभा…

राजदत्त यांच्या हस्ते विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

गंधार बालकलाकार पुरस्काराची मानकरी स्पृहा दळी  ठाणे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्पृहा दळी हिला  गंधार बालकलाकार…

पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी

ठाणे : विधानसभा निडणूकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी मतदानाच्या दिवशी तसेच त्यापूर्वीच्या दोन दिवसांत ड्रोनद्वारे पाहाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या मतदारसंघात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी जाऊन तात्काळ पाहाणी करणे शक्य होणार आहे. आयुक्तालय क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी ड्रोन उपलब्ध असतील. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सर्वाधिक १४ मतदारसंघ हे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात आहेत. ठाणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दररोज पायी गस्ती घातले जात आहे. तसेच ठिकठिकाणी रुट मार्च देखील काढण्यात आले आहेत. निवडणूकीच्या कालावधीत अनेकदा मतदान केंद्र किंवा एखाद्या ठिकाणी गोंधळ उडत असतो. आयुक्तालय क्षेत्रात तब्बल १४ मतदारसंघाचा भाग असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकड्या देखील पाचारण करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पोलिसांचाही बंदोबस्त असतो. सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असले तरी काही ठिकाणी गोंधळाची किंवा कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्याचे चित्रीकरण ठाणे, भिवंडी आणि उल्हासनगर येथील नियंत्रण कक्षामध्ये संलग्न केले जाणर आहे. एखाद्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलिसांकडून तात्काळ त्या ठिकाणी पाहणी करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत ड्रोनचा वापर झाला नव्हता. परंतु या निवडणूकीत ड्रोनचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ड्रोनचा वापर केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून ड्रोनचा वापर करून आमच्या कर्मचाऱ्यांनी कारवाया देखील केल्या आहेत. तसेच संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. – ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस. 0000