Category: ठाणे

Thane news

कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम – डॉ.डी.एल.कराड

ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व विचारवंत कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीचे, श्रमिकांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. देशाच्या कम्युनिस्ट चळवळीतील ते सर्वात लोकप्रिय…

नितेश राणेंचा नवा गेम हिंदू मुस्लिम दंगा घडविण्याचा – हाजी शाहनवाज खान

पनवेल : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नितेश राणे आले…

राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्यावर भाजपाचे `कॉंग्रेस हटाओ, आरक्षण बचाओ’

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन ठाणे : दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणे शहर…

विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

ठाणे : गणरायाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. ठाण्यात विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे पाच हजार पोलिसांचा…

क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन सेवांचा लाभ

भाईंदर : नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेकांना या सेवांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची लिंक कशी मिळवायची याची माहिती नसते. यासाठी महापालिकीन एक…

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी

पनवेल : लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू…

ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

ठाणे : मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी संच जनजागृतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी संच जनजागृती कार्यक्रमाचा 11 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ईव्हीएम प्रात्यक्षिक…

 वसई विरारमध्ये पाच दिवसीय गणपतीचे भावपूर्ण विसर्जन

 ६६ टक्के विसर्जन महापालिकेच्या कृत्रिम तलावात   विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी शहरात ५ दिवसीय गणपती विसर्जनात एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी ४ हजार ९८१ गणेश मूर्तीचे म्हणजेच ६६.३४ टक्के विसर्जन कृत्रिम तलावात झाले. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेली जनजागृती, ठिकठिकाणी उभारलेले १०५ कृत्रिम तलाव, विसर्जनासाठी केलेल्या सोयी सुविधा यामुळे गणेश भक्तांचा कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून मागील २ वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बुधवारी वसई विरार शहरात बुधवारी ५ दिवसीय एकूण विसर्जनापैकी कृत्रिम तलावात ४ हजार ८७१ घरगुती गणेशमूर्तीचे तर ११० सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन झाले. उर्वरित २ हजार ५२७ मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक तलाव आणि समुद्रात झाले शहरातील पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाकरिता, प्रत्येक कृत्रिम तलाव विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप, फिरते शौचालय उभारून दिवाबत्तींची सोय करण्यात आली होती. तसेच पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक गणेशभक्तांच्या मदतीसाठी तैनात होते. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी वर्ग आपापल्या प्रभागातील विसर्जन स्थळावर हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. विसर्जन शांततेत संप्पन्न झाले आणि गणेशभक्तांची कुठलीही गैरसोय झाली नाही. तसेच यंदा विसर्जनात शाडू मातीच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामुळे नैसर्गिक तलावांचे प्रदूषण रोखले गेले आहे. महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विसर्जन नियोजनाची प्रत्यक्ष पाहाणी केली आणि गणेशभक्तांशी संवाद साधला. तसेच नियोजनाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. कोट वसई विरार मधील सुजाण नागरिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागरुक आणि संवेदनशील असल्याने कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे प्रमाण वाढत आहे. गणेश भक्तांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो. येणाऱ्या सात दिवसीय, अनंत चतुर्दशी आदी विसर्जनावेळी देखील नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे आणि निसर्गाची हानी टाळावी. – अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका

यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी

 विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल ठाणे : गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाई, हाताने बनविलेल्या फुलांच्या टोपल्या यांसह विविध खाद्य पदार्थांची यंदा महिला बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांकडूनही घरगुती वस्तूंनाच प्राधान्य दिले गेले असल्याने बचत गटांना यंदाचा गणेशोत्सव आर्थिक दृष्ट्या फलदायी ठरला असून जिल्ह्यातील महिला बचत गटांची सुमारे या वस्तू विक्रीतून १५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत गट कार्यरत आहेत. जिल्ह्यातील बचत गटांची संख्या सुमारे दहा हजार इतकी असून यामध्ये एक लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातील या बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग, मध्यमउद्योग सुरू करण्यात आले आहेत. यातून बचत गटातील महिलांनाही एक सक्षम रोजगार उपलब्ध झाला आहे. तर या महिलांनी मिळून सुरू केलेल्या लघु आणि मध्यम उद्योगातून त्यांच्या आसपासच्या परिसरातील महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या उत्सवांच्या काळात या बचत गटांनी बनवलेल्या विविध वस्तूंना तसेच खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. गतवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात देखील या बचत गटांनी तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. उपहारगृहांमध्ये भेसळयुक्त मिठाईची भीती, मिठाईचे वाढलेले दर, तसेच फराळाच्या वाढलेल्या किंमती यामुळे यंदा अनेक भाविकांनी आणि मंडळांनी घरगुती पद्धतीने बनविलेल्या फराळ आणि मिठाईला पसंती दिली आहे. यामध्ये बचत गटाने तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा अधिकतर समावेश आहे. त्याचबरोबर बांबूसह इतर पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेल्या शोभेच्या वस्तूंची ही यंदा बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. तसेच गणेशोत्सव सुरू होऊन अद्याप दोनच दिवस झाले आहेत. या कालावधीत महिला बचत गटांकडून वस्तू आणि खाद्य पदार्थांच्या विक्रीतून तब्बल १५ लाख रुपयांहून अधिकची आर्थिक उलाढाल करण्यात आली आहे. तर या महिलांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थाना अद्यापही मागणी सुरूच असल्याची माहिती अंबरनाथ तसेच कल्याण येथील बचत गटांच्या महिलांनी सांगितले. यामध्ये विधवा आणि निराधार बचत गटांच्या देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व बचत गटांकडून मखर, कागदी फुलांच्या माळा, फुलांच्या टोपल्या, दिव्याचा वाती, तेल, अगरबत्ती, धूप, तूप यांसह विविध खाद्यपदार्थ यांची विक्री केली जात आहे. खेळते भांडवल मोलाचे राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना जिल्हा परिषदेच्या वतीने खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. बचत गटांना झालेल्या या पतपुरवठ्यामुळे सर्व महिलांना त्यांचे लघु आणि मध्यम उद्योग अधिक सक्षम करण्यास मोठा हातभार लागला. त्यामुळे आज शेकडो बचत गट विविध उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली आहे. कोट गणपती स्थापनेच्या दिवशी अनेक मंडळ आणि नागरिकांच्या दिवशी घरी पूजेचे आयोजन करण्यात येते. यावेळी आमच्याकडुन मोठ्या प्रमाणात मोदक, लाडू, खापरा वरच्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक यांची उत्तम विक्री झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने लाभदायी ठरला आहे. मयुरी अमृतकर, स्नेहबंध महिला बचत गट, अंबरनाथ

२७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील २६ कोटींची कामे घेण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. यात स्थानिक आणि नामवंत कंपन्या पालिकेने स्पर्धेतून काही कारणे देऊन बाहेर…