Category: ठाणे

Thane news

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतून विधानसभेसाठी इच्छुकांना श्रीकांत शिंदे यांची तंबी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीतील विधानसभा मतदारसंघांमध्ये आपणच शिवसेनेचे उमेदवार, अशा अविर्भावात शहरात मिरविणाऱ्या आणि आपणास शिवसेना नेत्यांचा पाठिंबा आहे, असा आव आणाऱ्या कल्याण, डोंबिवलीतील शिवसेना इच्छुक उमेदवारांची खासदार डॉ. श्रीकांत…

 ‘क्लस्टर’च्या माध्यमातून होणार दौलत नगर सोसायटीचा विकास

 रहिवाशांना मिळणार सर्व सुखसोयींनी युक्त प्रशस्त घरे ठाणे : ठाणे पूर्व कोपरी येथील दौलत नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीचा विकास `क्लस्टर’च्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे.`क्लस्टर’ विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल  इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे. या अपप्रचाराला उर्वरित २०० सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत, असे स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले. पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश करणा, खजिनदार रमेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते. दौलत नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे. सोसायटीला 2002 पासून C 1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटीसा मिळाल्या आहेत. सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरुन धोकादायक इमारतीत राहत आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत. तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलेपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे. मे. यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमताने DDR च्या उपस्थितीत केली आहे. त्यांनतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिलेली आहे.  क्लस्टरला एकमताने  मान्यता दिली म्हणून मे यश अशोका यांनी LOI आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करुन ते कार्य करत आहेत. कमिटी आणि सभासादांचा मे. यश अशोका डेव्हलपरला दौलत नगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे आम्ही दौलत नगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे त्याचे पालन करुन कायदेशीर बाबी पूर्ण करुन काम करत आहोत. आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घर, रस्ते तसेच स्विमिंग पूल, उद्याने व इतर अनेक सुविघा मिळून संपूर्ण दौलत नगर रहिवाश्यांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी आम्ही मे. यश अशोकाचे आभारी आहोत, असे सचिव महेश करणा यांनी सांगितले. क्लस्टर योजने अंतर्गत बिल्डरने 25 टक्के वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे. परंतु मे. यश अशोका बिल्डरकडून 32 टक्के वाढीव क्षेत्र मंजूर करुन घेतले आहे. सध्याच्या परिस्थितीत दौलत नगर मधील सर्व इमारती निकसीत (रिकाम्या) केल्या नसताना मे. यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे फ्लॅटधारक फ्लॅट खाली करून गेले आहेत त्यांना भाडे देत आहे. आज काही मुठभर सभासद सदर डेव्हलेपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने इतर सभासदांना एका नामांकित बिर्ल्डरला अर्धवट व चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलत नगरचा डेव्हलपमेंटचे काम करण्यात इच्छुक आहेत, असे सांगत आहेत. पंरतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलत नगरच्या डेव्हलेपमेंटचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. काही रहिवांशानी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत व अश्याप्रकारे बऱ्याच बेकायदेशीर गोष्टीची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करुन निरर्थक कलह निर्माण करत आहेत. आज हे विरोध करणारे 5 ते 8 रहिवाशी क्लस्टरला 9 महिन्याआधी मिटींगला हजर होते. त्याच रहिवाशांनी इतर रहिवाश्यांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती. त्याचे पुरावे फोटोज आणि व्हिडीओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत. आज प्रसार माध्यमातून वैभव भोसले यांचे असे म्हणणे आहे की आमच्या सोसायटी चां पुनर्विकास क्लस्टरअंतर्गत होत आहे याची कल्पना आज आम्हाला मिळाली, पण  २६ नोव्हेबर २०२३ च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करणार आहोत असे व्यक्तव्य स्वतः भोसले यांनी सर्व सभासदासमोर सोसायटी च्या विशेष सर्वासधरण सभेत केले आहे सोसायटीच्या एसजीएममध्ये दौलत नगरची डेव्हलेपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झालेले आहेत. शोभा नारवानी यांनी विकासक मे. यश अशोका  यांचे स्वागत केले आणि सदर क्लस्टर डेव्हलेपमेंटसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच सोसायटीचे सभासद व प्राध्यापक श्री अल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीने सदर क्लस्टर योजना मान्य असल्याचे सांगितल्याचे  व्हिडीओ चित्रीकरणात दिसत आहे. याच मिंटीगमध्ये चेअरमन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केले असल्याचे घोषित केले व सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मिंटीगची सांगता केली, तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आले व तसेच व्हिडिओ चित्रीकरणात दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची व प्रसार माध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा व स्वतःचा हेतू साधण्याचा प्रयत्न हे विघ्नसंतोषी लोक करत आहेत. ०००००

 पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 महापालिका क्षेत्रात ६११ नळ जोडण्या केल्या खंडित, ३० मोटर पंप जप्त सुमारे ३३ कोटी रुपयांची पाणी बिल वसुली ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित केल्या असून ३० मोटर पंप जप्त केले आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. प्रभाग                        कारवाई        वसुली नौपाडा – कोपरी :          १५        –  ४,५४,२७,३२५ उथळसर :                    ५८        –  ३,४७,३२,४९७ माजिवडा मानपाडा :      ००        –  ६,२१,७५,४५९ वर्तकनगर :                  ३५        –  २,९४,२३,७१०…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

 जिल्ह्यात प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा, जलजीवन मिशन यशस्वी – डॉ. भरत बास्टेवाड

 ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन अशोक गायकवाड अलिबाग : प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात आली असून ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, या कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील १०० टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत. तालुका : कुटुंबे : नळ कनेक्शन दीलेली कुटुंबे : टक्के, अलिबाग : ७१ हजार ३६४ : ५६ हजार १३२ : ७८.६७, कर्जत : ५४ हजार ५०९ : ४१ हजार ७९९ : ७६.६८, खालापूर : ३६ हजार ४७ : ३६ हजार ४७ : १००, महाड : ४२ हजार ४९९ : ३६ हजार ९४१ : ८६.९२, म्हसळा : १४ हजार ५६५ : १४ हजार ५६५ : १००, मुरुड : १६ हजार ४२३ : १५ हजार २६५ : ९२.९५, पनवेल : ८१ हजार ८३० : ७२ हजार ६०५ : ८८.७३, पेण : ४५ हजार ६७ : २९ हजार १९५ : ६४.७८, पोलादपूर : १६ हजार ५०३ : १३ हजार २९७ : ८०.५७,सुधागड : १५ हजार ८६५ : १२ हजार ४४५ : ७८.४४, तळा : ११ हजार ४९१ : १० हजार ३९६ : ९०.४७, उरण : ३६ हजार ३०० : ३६ हजार ३०० : १००, रोहा : ४२ हजार ६७० : ३७ हजार १९१ : ८७.१६, माणगाव : ४२ हजार १०४ : ३९ हजार ८१० : ९४.५५, श्रीवर्धन : २१ हजार ३८३ : १९ हजार ८३८ : ९२.७७ ०००००

 छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, मीरा भाईंदरच्या इतिहासाचे शो !

म्युझिकल फाउंटनच्या ‘वॉटर स्क्रीन’वर दिसणार मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण, १६ कोटींच्या खर्चातून पूर्ण झाले तलाव सुशोभीकरण -प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी   भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील २ तलावांचे सुशोभीकरण करून त्यात ‘म्युझिकल फाउंटन’ बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी या म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण होणार आहे. मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात हे संगीत कारंजे बसवले गेले असून यामुळे तलावासोबतच परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नवघर येथील तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलाव या तलावात म्युझिकल फाउंटन ३० तारखेपासून सुरु होणार असून दररोज रात्री म्युझिकल फाउंटनचे येथे शो येथे होतील , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दोन्ही तलावातील या कामांवर सुमारे १६ कोटी खर्च करून हे भव्य – दिव्य आकर्षक काम पूर्ण केले गेले असून मीरा भाईंदर शहर सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामात मोठी भर पडली आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर , गोडदेव , काशिमीरा तलाव हे जुने तलाव असून येथे परिसरातील नागरिक फिरण्यासाठी , निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ – संध्याकाळी येत असतात. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसविण्यासाठी ५० कोटी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून याकामासाठी १०० टक्के निधी राज्य सरकार कडून आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणला होता. हा निधी राज्य सरकारने मीरा भाईंदर महापालिकेला दिला होता. त्यातून तिन्ही तलावात सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यातील दोन तलावातील कामे पूर्ण झाली आहेत. आमदार सरनाईक यांनी वेळोवेळी सुशोभीकरणाच्या कामाच्या साईटवर जाऊन आढावा घेतला, कामाला गती दिली. गेल्या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती देताना सांगितले की , नवघर येथील तलावाचे सुभोभिकारण करण्यात आले आहे आणि तलावात म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. नवघर तलावाच्या आत असलेल्या म्युझिकल फाउंटन म्हणजेच संगीत कारंजे उडतील त्यावर ‘वॉटर स्क्रीन’ बनेल. त्यावर ऑडिओ व्हिडीओ कन्टेन्ट म्हणजेच पाच – पाच मिनिटांचे शो दाखवले जातील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज , अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे मंदिर , मीरा भाईंदरचा इतिहास यावर हे म्युझिकल फाउंटन शो होणार आहेत व त्याची स्क्रिप्ट बनवली जात आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच नवघरच्या तलावात म्युझिकल फाउंटन सोबत ‘फायर नोझल’ लावला गेला आहे. फायर नोझल म्हणजे म्युझिकल फाउंटन सुरु असताना काही नोझल मधून फायर निघते …वॉटर आणि फायरचा संगम येथे पाहायला मिळेल. शिवाय नवघर तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावाच्या परिसरात अम्पी थियेटर बनवले असून तेथे ५०० लोक बसून हा म्युझिकल फाउंटन शो बघू शकतील. लहान मुलांना खेळण्यासाठीची जागा आहे , तलावाला ग्रील लावले आहेत व लॅन्ड स्केपिंग गार्डन केले गेले आहे. नवीन कुंपण भिंत, नागरिकांना चालण्यासाठी पाथ वे , बसायला वेगवेगळे कट्टे बनवले आहेत. नवघरच्या तलावात होणारा म्युझिकल फाउंटनचा शो हा लक्षवेधी , नयनरम्य आणि पाहण्यासारखा असेल , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दररोज रात्री ७ , ८ व ९ वाजता म्युझिकल फाउंटनचे शो होतील व संपूर्ण मीरा भाईंदर मधून लोक ते बघण्यासाठी येतील असेही ते म्हणाले. आकर्षक लाईट इफेक्ट्स विद्युत रोषणाई या म्युझिकल फाउंटच्या वेळी पाहायला मिळेल आणि लोक हे पाहताना आनंद व्यक्त करतील. काशिमीरा येथील जरीमरी तलाव येथेही म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. संगीतावर नाचणारे कारंजे येथे दिसतील. विशेष म्हणजे या संगीत कारंज्याची रंगसंगती दिवसाप्रमाणे व दिन विशेषांप्रमाणे बदलू शकणार आहे अशी त्यात व्यवस्था केली गेली आहे.  स्वातंत्र्य दिन , दिवाळी , श्री गणेशोत्सव असे जे जे महत्वाचे दिवस असतील त्या दिवशी त्या म्युझिकल फाउंटनचे रंग बदलतील आणि त्या रंगातील व त्या म्युझिकवर म्युझिकल फाउंटन बघायला मिळतील. देशभक्ती , भक्ती संगीत किंवा प्रत्येक दिवसाप्रमाणे म्युझिकल फाउंटन सुरु राहणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.  मीरा भाईंदरच्या दोन मोठ्या तलावांचे रूप पूर्णपणे या कामामुळे पालटले गेले असून परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे तलाव सुशोभीकरण करीत असताना तलावाचे पाणी कायम शुद्ध राहील याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरला भरभरून विकास निधी दिल्याने ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर शहर खूप विकसित आणि सुशोभित होत आहे. ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदरही सुशोभीकरणात पुढे चालले आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. ठाण्याच्या उपवन तलावात म्युझिकल फाउंटन लावला गेला आहे. त्याचप्रमाणे आता मीरा भाईंदरच्या दोन तलावात हे म्युझिक फाउंटन लावले गेले आहेत. नवघर तलावात तर म्युझिकल फाउंटनचे काम करताना फायर नोझल पहिल्यांदा लावला गेला आहे. आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडून निधी आणला. त्यांच्या संकल्पनेतून तलाव सुशोभीकरणासोबतच म्युझिकल फाउंटन लावले गेले. शिवाय आमदार सरनाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा , जागेवर येऊन वेळोवेळी घेतलेला कामाचा आढावा व दिलेल्या सूचना यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले आणि संपूर्ण मीरा भाईंदरकर नागरिकांच्या पसंतीस उतरेल , असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात नाका…

जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूट…

स्पर्धा युगात डिजिटल मीडिया प्रभावी साधन – संजय शर्मा

डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती द्या – एस. एम. देशमुख राज्यस्तरीय पहिल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत ४०० पेक्षा अधिक पत्रकारांचा सहभाग   पिंपरी, पुणे : डिजिटल च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील…

ठाणेकरांसाठी ध्यानमंदिर, अद्यावत ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्ययावत वास्तू या सुविधा उपलब्ध होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या या कामांची केली पाहणी   ठाणे : ठाणेकरांना ध्यानधारणा आणि योग…