Category: ठाणे

Thane news

शहापूर तालुक्यातील धबधबे बंद

खर्डी : चार ते पाच वर्षांपासून शहापूर तालुक्यातील धबधब्याच्या पाण्यात ठिकठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या वर्षी खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील धबधब्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना…

दहीहंडी उत्सवाची राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख होण्यासाठी ‘प्रो गोविंदा सीझन’ – पुर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर     ठाणे : दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रो गोविंदा सीझन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते, अशा भावना प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळामधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते असे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले. प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी २० लीग चेअरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियावाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील स्व. बाबुराव जिम्नॅस्टिक सेंटर येथेप्रो गोविंदा सीझन २  ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी, राज्यभरातील ३२ संघांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. श्री आगरेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मरीआई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदु एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलदेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी शनिवारी, २७ जुलै व उर्वरित १६ संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी, २८ जुलै रोजी संपन्न झाली. या फेरीतून अंतिम फेरीसाठी १६ संघ निवडण्यात आले. अंतिम फेरी १८ ऑगस्टला वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली. ००००

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुरारोग्यासाठी बोरीवली येथे आदिशक्ती महायज्ञ

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे उद्धवजी ठाकरे यांच्या उत्तम, निरोगी…

मुंबईत ‘बीकेसी’मध्ये ८ फुटाची मगर

मुंबई : मुंबईतील बीकेसीमध्य तब्बल ८ फुटाची मगर सापडली. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी देखील साचलं. मुंबईतील मिठी नदीच्या पात्रात बीकेसी येथे एक ८ फुटांची…

भाजपाच्या माजी आमदाराचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे यांची आज घरवापसी केली.यापुर्वी ते १९९५ व १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून…

डोंबिवलीतील बेकायदा ‘राधाई’ बिल्डींग जमीनदोस्त करा

मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश   कल्याण – डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील बेकायदा राधाई इमारत येत्या १२ ऑगस्टपर्यंत जमीनदोस्त करा. या कारवाईसाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी कल्याण डोंबिवली पालिकेला अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध…

ठामपातर्फे आजपासून ठाण्यात सुरू होणार पर्यावरणस्नेही गणेशोत्सव प्रदर्शन

ठाणे : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 प्रदर्शन शनिवार दिनांक 27 जुलैपासून ठामपा शाळा क्र. 19 विष्णुनगर, ठाणे येथे सुरू होत आहे.…

पोलिसांच्या ३१६ घरांची योजना लवकरच कार्यान्वित होणार !

संजय केळकर यांच्याहस्ते पोलीस वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा शुभारंभ अनिल ठाणेकर       ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कर्तव्य रात्रंदिवस बजावणाऱ्या पोलिसांच्या सुमारे ६०० घरांच्या वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या…

 घोडबंदर किल्ला मनपाच्या मालकीचा नसताना भाड्याने देण्याचा ठराव केलाच कसा?

शिवप्रेमींच्या संतापानंतर पालिकेची दिलगिरी     ठाणे : घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला कसा ? असा संताप…

अखेर अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द

पनवेल- कळंबोली येथील अमर रुग्णालयावर गर्भपात आणि गर्भवती मातेच्या मृत्यूचे आरोप झाल्यानंतर रुग्णालयातील कारभाराविषयी संशय निर्माण झाला होता. मावळ येथील तिहेरी हत्याकांडामधील महिलेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल पालिकेच्या आरोग्य…