Category: ठाणे

Thane news

मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदे द्या, अन्यथा विधानसभेच्या 30 जागा लढवणार – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे :  पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच, विधानसभा निवडणुकीत  आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत तर आम्ही ३० जागा लढू, असे पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पीआरपीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते. त्यावेळेस ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपील लिंगायत, एन. डी. सोनकांबळे, अनिल तुरूकमारे, विजय वाघमारे,  आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर,  रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी,  शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित  होते. प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. या सरकारने शोषित,  पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात, याचे  भान ठेवून कुणीही दुखावणार नाही, याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे म्हणत, आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे; आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात; अन्यथा, आम्ही ३० जागांवर निवडणूक लढवू, असे सांगितले. दरम्यान, संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती. त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. 000000

ग्रीन स्कूल, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, जुनी पेन्शन योजना लागू करणार – निरंजन डावखरे

कल्याणमधील शाळा-कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा अनिल ठाणेकर   ठाणे : कोकणातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करणार, स्पर्धा परिक्षेसाठी उत्तम व नेमके मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रयत्‍न करणार, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, असे वचन कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना दिले. व्हिजन डाॅक्युमेंट अंतर्गत मिशन एज्युकेशनुसार नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ग्रीन स्कूल, डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब सुरु करणार, जिल्हानिहाय स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय, संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार, राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. तसेच मतदान करताना बॅलेटपेपरवर होणाऱ्या मतदानात, ‘डावखरे निरंजन वसंत’ या नावासमोरील व छायाचित्रासमोरील रिकाम्या चौकटीत, चौकटीला स्पर्श न करता एक उभी रेष (౹) मारुन बॅलेटपेपरला उभी घडी मारावी, असे आवाहन आ. निरंजन डावखरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाला केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी कल्याण शहरातील, श्री वाणी विद्यालय-कल्याण पश्चिम, गुरुनानक स्कूल-कल्याण पश्चिम, नूतन हायस्कूल-कल्याण पश्चिम, ओक हायस्कूल- कल्याण पश्चिम अचीवर्स कॉलेज-कल्याण पश्चिम, नूतन ज्ञान मंदिर-कल्याण पूर्व, आयडियल स्कूल अँड कॉलेज-कल्याण पूर्व आदी शाळा-काॅलेजमधून प्रचार दौरा केला. या दोऱ्याच्या निमित्ताने झालेल्या सभांमध्ये मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने आपला पाठींबा निरंजन डावखरे यांना व्यक्त केला. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, कल्याण पुर्व भाजपा शहराध्यक्ष संजय मोरे,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन.एम.भामरे, शिक्षक आघाडी कल्याण डोंबिवली महानगर संयोजक सुभाष सरोदे, सहसंयोजक अनिरुद्ध चव्हाण, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष प्रशांत भामरे, देसले, अर्जुन उगलमुगले, चंद्रकांत ठाकूर, भास्कर नारखडे, बाळकृष्ण जगे, दीपक राजपूत, सुधाकर ठोके, प्रमोद चौधरी, गोकुळ गवळे, सचिन निकम, तेजनारायान सिंह, वीरेंद्र तिवारी, नितीन मुंडे आदी भाजप शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरूज ढासळला

कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या प्रवेशव्दारावरील दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूज गुरूवारी रात्री ढासळला. रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला. कोणीतीही हानी यात झाली नाही. गुरुवारी पडलेल्या पावसाच्या माऱ्याने बुरूजाचा काही भाग खचून हा बुरूज ढासळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील डाव्या बाजुला हा बुरूज आहे. शुक्रवारी पहाटे नागरिक दुर्गाडी किल्ल्यावर येऊ लागले. त्यावेळी त्यांना बुरूजाचा दर्शनी भाग कोसळला असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ कल्याण, डोंबिवली शहरात वाऱ्यासारखी पसरली. दुर्गाडी किल्ला हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत येत असला तरी त्यावर नियंत्रण पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. पाच वर्षापूर्वी दुर्गाडी किल्ल्याचे दोन बुरूज ढासळले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बुरूजांची डागडुजी करून ते सुस्थितीत केले होते. बुरूजावरील नवीन कामाला भेगा पडल्या आहेत. आता या नादुरुस्त भागाची देखभाल केली नाहीतर पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती इतिहासप्रेमींंनी व्यक्त केली. दुर्गाडी किल्ला हा निव्वळ दगडावर उभा नसून या किल्ल्याचा काही भाग मातीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती खचू लागली की असे प्रकार होऊ शकतात, असे एका जाणकाराने सांगितले. दुर्गाडी किल्ल्याच्या दोन्ही बाजुने २४ तास जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचे दणके अप्रत्यक्षपणे किल्ल्याला बसत असतात. त्याचाही हा परिणाम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निधी पडून दुर्गाडी किल्ला सुस्थितीत आणि देखणा असावा म्हणून शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ला नुतनीकरण कामासाठी २५ कोटीचा निधी गेल्या वर्षी मंजूर केला आहे. या निधीतील साडे सात कोटीचा निधी शासनाने प्रत्यक्ष कामासाठी मंजूर केला आहे. परंतु, या निधीतून वर्ष उलटले तरी दुर्गाडी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले नाही, असे दुर्गप्रेमींनी सांंगितले. शिवाजी महाराजांनी पहिल्या आरामाराची स्थापना कल्याणमध्ये केल्याचे इतिहासकार सांगतात. या आरामाराच्या किनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हे ऐतिहासिक वैभव टिकून ठेवण्यासाठी शासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरण, संंवर्धनाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचीन बासरे यांनी केली. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ, सभोवताली बुरूज आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पातून दुर्गाडी किल्ल्याच्या बाजुला खाडी किनारी नौदल आरमार उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रेक्षणिय आणि प्रदर्शनीय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष ना. का. आहेर यांच्या कार्यकाळात दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. बुरूज सुस्थिती करण्यात आले होते. आता बराच काळ लोटला असल्याने दुर्गाडी किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची आहे ते अस्तित्व कायम ठेऊन नव्याने बांधणी होणे आवश्यक आहे. अन्यथा असे पडझडीचे प्रकार सुरूच राहतील. – श्रीनिवास साठे, कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक. 0000000

 करंजाडेतील पाणी प्रश्न लागणार मार्गी

सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश राज भंडारी पनवेल : सन २०१९ पासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्नाने ग्रासले होते. त्यातच करंजाडे ग्रामपंचायतीत दीड वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. सरपंच मंगेश शेलार हे मुळातच पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊनच निवडणुकीला सामोरे गेले होते. अखेर करंजाडेचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या आठवडाभरात करंजाडेकरांना उच्चदाबाने मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. गेली अनेक वर्षे सतावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा दिला असल्याची माहिती करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी गुरुवारी (दि.१३ जून) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह जेष्ठ नेते कर्णा शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. करंजाडेचा पाणी प्रश्न निकालात न निघाल्यास पावसाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर सिडकोचे एमडी श्री.सिंगल व पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांनी येत्या चार दिवसांत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नवीन जलवाहिनीतून करंजाडेचा पाणीपुरवठा सुरू करतो, जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी एमजेपीच्या अधिकार्‍यांनीसुद्धा नवीन लाईनवरून पाणीपुरवठा सुरु करण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच करंजाडे व पुनर्वसन नोडमधील रहिवाशांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मंगेश शेलार यांनी माहिती दिली. तसेच यावेळी नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करीत नागरिकांचे आभार मानले. 00000

कल्याण-डोंबिवलीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे. मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्पादनावर भर द्यावा आणि भाविकांनी अशा मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पालिका हद्दीत गणेश मूर्तींचे उत्पादन, विक्री करण्यासाठी मूर्तिकार, कारागिर, विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जे मूर्तिकार, विक्रेते, कारागिर पालिकेकडे नोंदणी करणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विकण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० च्या सुधारित नवीन मार्गदर्शक कायद्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याचे काटेकोर पालन कल्याण डोंबिवली पालिकेकडून केले जाणार आहे. मूर्तिकार, उत्पादक, कारागिर, विक्रेते यांना मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू करणे, मूर्ती विक्रीसाठी मंच लावणे यासाठी परवानगी देण्यासाठी पालिका प्रभाग कार्यालयांमध्ये नियोजन केले जाणार आहे. जे अशाप्रकारची परवानगी घेणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कारवाई करतील, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले आहे. पालिका परवानगीची प्रत प्रत्येक मूर्तिकार, कलाकार, विक्रेत्यांनी कारखाना, दुकानाच्या दर्शनी भागात लावावी. पर्यावरणपूरक, शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून सहज पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांना भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. जे या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिला आहे. मूर्तिकार बैठक कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उत्पादनावर भर देण्यात यावा. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची असलेली बंदी, तसेच पीओपीच्या वापराचे दुष्परिणाम याविषयावर मूर्तिकार, कारखानदार, विक्रेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शुक्रवार, १४ जून रोजी,दुपारी चार वाजता अत्रे रंगमंदिरातील सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले आहे. 000000

रस्त्यावरील सुमारे 450 मुले यावर्षी जाणार शाळेत

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील 450-500 बालकांना यंदाच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम येत्या गुरुवारी, दि.20 जून 2024 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. रस्त्यावरील बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. साधारणतः 170 रस्त्यावरील बालकांना सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले 6 ते 7 महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. सदर बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या सर्वांना परिपाक म्हणून साधारणतः यावर्षी सन 2024 – 2025 च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी 450 ते 500 बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत. या बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र  महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास आयुक्त उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच सन 2023-24 या वर्षात 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील 50 मुलांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे. 000000

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरूज ढासळला

कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या प्रवेशव्दारावरील दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूज गुरूवारी रात्री ढासळला. रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला. कोणीतीही हानी यात झाली नाही. गुरुवारी पडलेल्या पावसाच्या माऱ्याने बुरूजाचा काही भाग खचून हा बुरूज ढासळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील डाव्या बाजुला हा बुरूज आहे. शुक्रवारी पहाटे नागरिक दुर्गाडी किल्ल्यावर येऊ लागले. त्यावेळी त्यांना बुरूजाचा दर्शनी भाग कोसळला असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ कल्याण, डोंबिवली शहरात वाऱ्यासारखी पसरली. दुर्गाडी किल्ला हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत येत असला तरी त्यावर नियंत्रण पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. पाच वर्षापूर्वी दुर्गाडी किल्ल्याचे दोन बुरूज ढासळले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बुरूजांची डागडुजी करून ते सुस्थितीत केले होते. बुरूजावरील नवीन कामाला भेगा पडल्या आहेत. आता या नादुरुस्त भागाची देखभाल केली नाहीतर पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती इतिहासप्रेमींंनी व्यक्त केली. दुर्गाडी किल्ला हा निव्वळ दगडावर उभा नसून या किल्ल्याचा काही भाग मातीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती खचू लागली की असे प्रकार होऊ शकतात, असे एका जाणकाराने सांगितले. दुर्गाडी किल्ल्याच्या दोन्ही बाजुने २४ तास जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचे दणके अप्रत्यक्षपणे किल्ल्याला बसत असतात. त्याचाही हा परिणाम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निधी पडून दुर्गाडी किल्ला सुस्थितीत आणि देखणा असावा म्हणून शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ला नुतनीकरण कामासाठी २५ कोटीचा निधी गेल्या वर्षी मंजूर केला आहे. या निधीतील साडे सात कोटीचा निधी शासनाने प्रत्यक्ष कामासाठी मंजूर केला आहे. परंतु, या निधीतून वर्ष उलटले तरी दुर्गाडी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले नाही, असे दुर्गप्रेमींनी सांंगितले. शिवाजी महाराजांनी पहिल्या आरामाराची स्थापना कल्याणमध्ये केल्याचे इतिहासकार सांगतात. या आरामाराच्या किनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हे ऐतिहासिक वैभव टिकून ठेवण्यासाठी शासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरण, संंवर्धनाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचीन बासरे यांनी केली. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ, सभोवताली बुरूज आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पातून दुर्गाडी किल्ल्याच्या बाजुला खाडी किनारी नौदल आरमार उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रेक्षणिय आणि प्रदर्शनीय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष ना. का. आहेर यांच्या कार्यकाळात दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. बुरूज सुस्थिती करण्यात आले होते. आता बराच काळ लोटला असल्याने दुर्गाडी किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची आहे ते अस्तित्व कायम ठेऊन नव्याने बांधणी होणे आवश्यक आहे. अन्यथा असे पडझडीचे प्रकार सुरूच राहतील. – श्रीनिवास साठे, कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक. 0000000

फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत नोंदणी करावी

कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने ठाणे : कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये चिकू हे फळपीक मृग बहरासाठी अधिसूचित आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या १२ जून २०२४…

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पेरणीच्या कामास सुरूवात झाले असून शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 व बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली. गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.बनावट अथवा भेसळयुक्त बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर बियाणांचा संपूर्ण तपशील उदा. पिकाचे नाव, वाण, संपूर्ण लॉट नं., बियाणे उत्पादक कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे नाव व पत्ता इत्यादी बाबींचा उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.  खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठीच आहे याची खात्री करावी.भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे, पिशव्या सिलबंद अथवा मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची, लेबलवरील अंतिम मुदत पाहून बियाणे खरेदी करावे. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमंतीने विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याकरिता 7039944689 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे निरसन तालुकास्तरीय कृषि विभागाचे अधिकारी करतील. 0000

उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई

उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, महात्माफुले कॉलनी, नालंदा शाळापरिसर, भिमशक्तीनगर, आम्रपालीनगर, पंचशीलनगर, साईबाबानगर, कानसई रोड, भारतनगर, राजपूत लाईन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी द्या त्यानंतरच पाणी बिल पाठवा, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला मनसेने याबाबत आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले आहे. उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी नेहमी पाणीटंचाईग्रस्त परिसर राहिला आहे. सुरवातीला अनियमित व कधीही पाणी पुरवठा होत होता. तर काही दिवसांपासून मध्यरात्री अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. असा आरोप स्थानिकांनी केला असून मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबत आवाज उठवून महापालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले. तसेच खडी मशीनपासून कुर्ला कॅम्प जलकुंभापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी निश्चित पाणी योजना राबविण्याची मागणी होत आहे. अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे, उंच जलकुंभ बांधले. मात्र त्याचा पुरेसा उपयोग होत नाही. आयुक्त अजीज शेख यांना मनसेचे अध्यक्ष अध्यक्ष बंडू देशमुख, शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी पाणी टंचाई बाबत निवेदन दिले. यावेळी सचिन बेंडके, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, प्रकाश कारंडे, सुहास बनसोडे यांच्यासह सुनील रोहिडा, अमित सिंग, विक्की जिप्पसन, सचिन सिरसाठ, रमेश जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 00000