Category: ठाणे

Thane news

 घोडबंदर रोडचा घेतला महपालिकेने आढावा

‘रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने सर्व यंत्रणांनी काम करावे- आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश     ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत:  घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत, ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. आनंद नगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला.…

 सर्व प्रभारी पदावरील अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणा

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी     ठाणे : ठाणे महानगर पालिकेत सध्या सर्वच विभागांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची चलती निर्माण झाली आहे. लिपीकांना थेट सहाय्यक आयुक्त ते उपायुक्तपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे नुकसानच होत आहे. त्यामुळे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणून त्यांच्याकडून अतिरिक्त वेतनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी ते स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी या संदर्भात ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उदाहरण दिले असून या ठिकाणी नियुक्त असलेल्या अधिकारी लिपीक या संवर्गातील आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना ही बढती दिली आहे, असा आरोप केला आहे. ठामपातील अनेक अधिकारी हे लिपीक असून त्यांना सहाय्यक आयुक्त तसेच प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षा न देता हे अधिकारी मोक्याच्या जागांवर बसलेले असल्याने धोरणात्मक निर्णय घेणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी ठाणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याने त्या प्रभारींना मूळ पदावर आणावे. अन्यथा, येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा शिंदे यांनी दिला.

“स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” अभियान – रोहन घुगे

ठाणे, “स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” अभियान राबवण्‍यात येत असून ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे तसेच प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन अतुल पारसकर यांनी केले आहे. आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार, दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबवण्‍यात येत आहे. या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत, त्‍यानुसार जिल्ह्यातील प्रत्‍येक गावात “स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” या नावाने अभियान राबवण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे जिल्हा (ग्रा) हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रत्‍येक गावात 5 संवादकाची निवड करण्‍यात येणार असून हे संवादक गृहभेटीतून माहिती देण्‍यात येणार आहे. यासाठी  सरपंच,  उपसरंपच,  ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती,  ग्रामसेवक,  आशावर्कर,  अंगणवाडी सेविका,  स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी आपल्‍या तालुक्‍यातील गावांचे प्रती कुटूंब पाच या प्रमाणे संवादक तयार करून गृहभेटीचे आयोजन तसेच तालुक्‍यातील सर्व अधिकारी, विस्‍तार अधिकारी यांनी संनियंत्रण करून अंमलबजावणी करत आहेत. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्‍यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय व त्याचा नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती देण्‍यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्‍या गुगल लिंकव्‍दारे  कुटुंबांची फोटोसह माहिती भरण्‍यात येणार आहे.

महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे-आयुक्त सौरभ राव

ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची…

मुरबाड तालुक्यात ४० गावे  टँकरमुक्त – रोहन घुगे

ठाणे :  २०२० ते २०२४ या पाच वर्षात ८६ टंचाईग्रस्त गाव- पाडे होते. यावर्षी जल जीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकूण ४० गाव- पाडे कायमस्वरुपी टँकरमुक्त करण्यात आले आहेत.  प्रगतीपथावरील…

आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांनी केले पारसिक टेकडी येथे वृक्षारोपण

ठाणे : आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांच्या मदतीने संस्थेच्या ७ व्या  वर्धापनाचे औचित्य साधत पारसिक टेकडी कळवा, ठाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण २५ करंजाची रोपटे लावण्यात आली. त्याचे कारण असे की, आपल्या भागातील हवामानात करंज झाडाची वाढ चांगली होते तसेच या झाडाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व स्थान आहे. शासनाचा देखील वन महोत्सव आता चालू आहे. तापमान वाढ व पाणीटंचाई यामुळे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप वर्षभर पारसिक टेकडीवर झाडे लावून त्यांचे संगोपन देखील करत असते. चांगलं काम करणाऱ्या संस्था बरोबर आनंदवाटा प्रतिष्ठान नेहमी स्वतःला त्यांच्याशी जोडून घेऊन वर्षभर पर्यावरण व शैक्षणिक उपक्रम राबवितात. या वेळेच्या उपक्रमात तरुण मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.  पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप व उपस्थित तरुण मुलांचे आनंदवाटा  तर्फे कृतज्ञता व्यक्त  करून “साथी हात बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर पेड लगाना “हे  गाणे सर्वांनी सामूहिक रित्या गाऊन वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती संस्थेचे सभासद रवींद्र निर्मला तानाजी ह्यांनी दिली.

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. या प्रचंड धावपळीतही विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. जितेंद्र भोळे यांची ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ  पत्रकार श्री. विलास मुकादम…

कल्याण डोंबिवली पालिकेत जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास विलंब

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या जन्म, मृत्यू दाखले ऑनलाईन माध्यमातून देण्याच्या कार्य प्रणालीमध्ये शासन निर्देशानुसार बदल केले जात आहेत. या बदलाच्या कार्य प्रणालीची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत पालिकेकडून देण्यात येणारे जन्म,…

कल्याणमधील गांधारी नदीत गाळात अडकलेल्या वृध्द महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचविले

कल्याण – कल्याणमधील गांधारी नदी पात्रात घरातील निर्माल्य टाकण्यासाठी गेलेली महिला रविवारी नदीला आलेल्या पुरातील चिखलात अडकली होती. ही माहिती नदी काठाने चाललेल्या एका नागरिकाला समजात त्याने हा विषय गांधारी…

 कल्याण-डोंबिवलीत समुह विकास योजना राबविण्यास सर्वाधिक प्राधान्य

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती     कल्याण : ठाणे महापालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन सर्वाधिक प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न विचारात घेऊन समुह विकास योजनेच्या माध्यमातून शहराचे वेगवेगळे भाग विकसित करण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाचा पुनर्रचना आराखडा तयार करताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी नगररचना विभागाच्या प्रमुख साहाय्यक संचालक नगररचना यांना केवळ इमारत बांधकाम परवानग्या, भोगवटा प्रमाणपत्र या विषयांपुरतेच मर्यादित न ठेवता त्यांना चार हजार चौरस मीटर भौगोलिक क्षेत्रापुढील इमारत बांधकाम परवानगीचे अधिकार आणि चार हजार चौरस मीटर खालील अधिकार नगररचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या या विकेंद्रीकरणामुळे साहाय्यक संचालक नगररचना यांना नगररचना विभागाशी संबंधित भूसंपादन, समुह विकास, विकास आराखड्यातील रस्ते आणि इतर प्रकल्प विकासाकडे लक्ष देणे यापुढे शक्य होणार आहे. साहाय्यक संचालक नगररचना अधिकारी यांना समुह विकासाची पूर्णवेळाची जबाबदारी देण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले. विकास आराखड्याचा पूर्ण क्षमतेने विकास, प्रकल्पासाठी भूसंपादन हेही नगररचना विभागाचे काम आहे. आतापर्यंत नगररचना अधिकाऱ्यांनी इमारत बांधकाम परवानग्यांच्या चौकटीत राहुनच आपल्या पुरते काम केले. त्यामुळे या विभागाशी संबंंधित भूसंपादन, विकास आराखड्याचा विकास हे विषय वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिले, अशी माहिती आयुक्त डॉ. जाखड यांनी दिली. पालिका हद्दीत धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. या इमारतींचा समुह विकास (क्लस्टर योजना) योजनेतून विकास करण्यासाठी प्रशासन गंभीर आहे. हा विषय साहाय्यक संचालक नगररचना यांच्या अखत्यारित पूर्ण क्षमतेने देऊन ठाणे पालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे डॉ. जाखड यांनी सांगितले. ४१ समुह विकास अडचणीचे कल्याण डोंबिवली पालिकेा हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी यांचा विचार करून पालिकेने समुह विकास योजना राबवावी म्हणून आपण मागील सहा ते सात वर्षापासून शासनाकडे प्रयत्नशील आहोत. या तगाद्यामुळे पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांचे एकूण ४१ समुह विकास योजनेसाठी भाग केले आहेत. हे भाग २५ हेक्टर भौगोलिक क्षेत्राचे आहेत. एवढे क्षेत्र कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उपलब्ध होणार नाही. पालिकेत समुह विकास योजना अंमलात येण्यास प्रस्तावित भौगोलिक क्षेत्र अडथळा आहे. हे क्षेत्र पाच ते सात हेक्टर ठेवले तरच ही योजना पालिका हद्दीत यशस्वी होऊ शकते आणि २५ हेक्टर या एका मुद्द्यावर हा प्रकल्प कधीही आकाराला येणार नाही, असे आपण शासनाला कळविले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. 00000