Category: ठाणे

Thane news

मुसळधार पावसात कल्याण-डोंबिवलीत तीव्र पाणी टंचाई

कल्याण : मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात, एमआयडीसी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुबलक पाणी पुरवठा नागरिकांना करण्यात यावा, या मागणीसाठी…

संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ठाणे :संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने, मी होणार ठाण्याचा टॉपर या शैक्षणिक वर्ष २०२३-२४  या स्पर्धेतील  १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळेचा सत्कार सोहळा रविवार ७ जुलै ११ ते २ या वेळेत गडकरी रंगायतन येथे प्रमुख पाहुणे आमदार श्री. निरंजन डावखरे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी सरस्वती सेकंडरी स्कुलची अनन्या सुहास कुलकर्णी व आनंदीबाई केशव जोशी शाळेची अनुष्का वैभव जोशी यांनी १०० गुण टक्के मिळवत ठाणे शहरात पहिला क्रमांक पटकावला, तर १२ वी सायन्स मध्ये हेमांग राघवेंद्र कुलकर्णी ९४  टक्के गुण तर १२ वी कॉमर्स मध्ये सार्थक निशांत सुर्वे हे ठाणे शहरात प्रथम आले.१० वी चे १५  विद्यार्थी १२ वी च्या १० विद्यार्थ्यांचे ,शाळा , कॉलेज यांचा ट्रॉफी देऊन आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, जेष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, ठा. म. पा. परिवहन सदस्य विकास पाटील, कोचिंग क्लास संचालक संघटना अध्यक्ष सतीश देशमुख,  भाजपा ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंखे, सचिन केदारी, प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर, अंकित परब, आशिष थत्ते, शिवाजी मोरे, सुधाकर भोसले शेखर साळगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी दिली. 00000

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जागृती उपक्रमाचे आयोजन करा –  सौरभ राव

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले…

आफ्रोह्चे ठाण्यात आंदोलन अनुसूचित क्षेत्रातील ‘बोगस’ आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील

 कर्मचा-यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन         ठाणे :.सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या…

एकलव्यांसाठी संधींची खिडकी उघडली आहे तिचा उपयोग करा – अलका धुपकर

ठाणे : आपल्या आर्थिक परिस्थितीने खचून न जाता, विषमतेने भरलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीला न घाबरता समता विचार प्रसारक संस्थेने उघडून दिलेल्या खिडकीतून अनेक संधी तुम्हाला खुणावत आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी…

 राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

ठाणे : राज्यात राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सामजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध…

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणेबाबत जाहीर अवाहन

ठाणे : महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्य दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, यावर…

कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार श्री.निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक करून विजय मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा देताना  समाजसेवक व उपाध्यक्ष  म्युनिसिपल मजदूर युनियन  मुंबई महानगरपालिका सुनिल मोरे दिसत आहे.

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे वारकरी बांधवांसह विठू नामाच्या जयघोषात झाले दंग !

तरडगाव ते फलटण या मार्गावर वारीत घेतला सहभाग     कल्याण : लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असता. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग होत असतात. गेल्या वर्षी प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला. खासदार डॉ.शिंदे यांनी यांनी आज तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपायोजना राबविल्या आहेत. विशेष दिंड्यांना आर्थिक साहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. 00000.

डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा दाखल

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका अनिल ठाणेकर     ठाणे, उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला. रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (रा. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव व शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले. रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या साथीने उल्हासनगर पोलिसांंनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने, अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली. अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 00000