Category: ठाणे

Thane news

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण हटाव भूमिकेवरून रोहिदास मुंडे यांना अनेक ग्रामस्थांचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण हटाव भूमिकेवरून रोहिदास मुंडे यांना अनेक ग्रामस्थांचा पाठिंबा प्रचारादरम्यान रोहिदास मुंडे यांना ज्येष्ठ नागरिक व महिलांचे आशीर्वाद दिवा:- प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

 विकास होईल अफाट, विरोधक होतील भुईसपाट – एकनाथ शिंदे

विकास होईल अफाट, विरोधक होतील भुईसपाट – एकनाथ शिंदे यावेळी मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार अरविंद जोशी मिरा-भाईंदर: मिरा -भाईंदर विकासाची नवी उड्डाणे घेण्यास सज्ज आहे. हे शहर आपले आहे…

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या पवार पब्लिक शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या पवार पब्लिक शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६चे कामकाज पारदर्शक रितीने व सुरळीतपणे व विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा…

प्रभाग २८ च्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गटाचे १५ कलमी ‘गॅरंटी कार्ड’ जाहीर

प्रभाग २८ च्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गटाचे १५ कलमी ‘गॅरंटी कार्ड’ जाहीर शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित…

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश दिवा : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश…

एकनाथ शिंदेंंचा ठाण्यात बाईक रॅली…

ठाणे पूर्व, पश्चिम, आनंद नगर, कशीश पार्क, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, इंदिरा नगर यांसारख्या प्रमुख मार्गांवर एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅली करी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रचार केला.…

डोंबिवलीत भाजपाच्या लक्ष्मीदर्शनचा शिंदेंच्या शिवसेनेकडून पर्दापाश

ठाणे : भाजपने  सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली  महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेन उघडकीस आणल आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात ३००० रुपये म्हणजे ५०० रुपयांच्या ६ नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात होते. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत होते अशी माहीती मिळताच येथील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. भाजपाचे विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेचे हा व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत आहेत.

महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशीर्वाद देण्यासाठी नागरिक रस्त्यावर दिवा, दि. ११ डिसेंबर : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत शिवसेना–भाजपा– आर.पी.आय. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक २७ च्या शैलेश पाटील, स्नेहा पाटील, दिपाली भगत आणि ऍड. आदेश भगत या चारही उमेदवारांच्या महाप्रचार रॅलीला दिवा परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सायंकाळी आयोजित या रॅलीदरम्यान उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, घोषणा देत उमेदवारांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून आला. नागरिकांची गर्दी एवढी वाढली की काही काळासाठी मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला, त्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. “काम करत आलो… काम करत राहू…” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीमुळे दिवा शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते. या महाप्रचार रॅलीने महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

 अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग

अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी दिवा: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा प्रभाग क्रमांक २७ (क) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सीमा गणेश भगत यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. सीमा गणेश भगत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाही, त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचार पत्रिकेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीराज यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नसताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडून सीमा भगत यांना “हेलिकॉप्टर” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरण्यात येत आहे. सदर प्रकार हा निवडणूक आचारसंहिता व निवडणूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित प्रचार साहित्य जप्त करावे, आचारसंहितेचा भंग सिद्ध झाल्यास सीमा गणेश भगत यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा प्रचार त्वरित थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान

निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान नवी मुंबई : (अशोक गायकवाड ) नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता पॅम्पेलेट्स, पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ, व्हिडीओ, डिजीटल तसेच सोशल मिडीया अशा विविध माध्यमांतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्वरुपात प्रचार प्रसार करतांनाच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठया संख्येने निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणा-या शासकीय – निमशासकीय कर्मचारी यांचा मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रे कार्यरत करण्यात आलेली आहेत. १५ जानेवारी रोजी होणा-या नमुंमपा निवडणूकीमध्ये कर्तव्यासाठी नेमणूक झालेल्या १३९ महिला व २९१ पुरुष अशा ४३० कर्मचा-यांनी शनिवार १० जानेवारी रोजी पहिल्या दिवशी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपआयुक्त तथा पोस्टल मतदान नोडल अधिकारी स्मिता काळे यांनी दिली. मतदान केल्यानंतर या कर्मचा-यांनी “आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा” असे आवाहन सेल्फी काढत सर्व मतदार नागरिकांना केले. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर कार्यरत असल्याने मतदान करण्याची संधी उपलब्ध होणार नसल्याने महानगरपालिकेने पोस्टल मतदानाची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली आहे. त्यासाठी आठही विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये टपाली मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्राधान्याने रायगड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच नवी मुंबईतील सिडको व इतर शासकीय – निमशासकीय कार्यालये, खाजगी शाळा तसेच पोलीस विभाग येथील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांकरिता तसेच जे कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदार आहेत मात्र त्यांची नेमणूक इतर शहरांमध्ये निवडणूक कर्तव्यावर झालेली आहे अशा कर्मचा-यांना मतदान करता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या या विशेष टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घेऊन निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदान करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.