Category: ठाणे

Thane news

चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव – राजन राजे

चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव – राजन राजे अनिल ठाणेकर ठाणे: अयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिक वर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित,  प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर!

ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर! जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे भव्य ‘शिवजयंती उत्सव २०२६’ चे आयोजन ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातील ‘जनस्वराज्य प्रतिष्ठान’ च्या वतीने गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती सोहळ्याचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून ऐतिहासिक संस्कृती, समाजप्रबोधन आणि जनसेवा यांचा त्रिवेणी संगम ९० फिट रोड, पारसिक नगर, खारीगांव, कळवा येथे ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर कृष्णा दादु पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. मुख्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  संजय केळकर उपस्थित राहणार असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. संदिप लेले (जिल्हाध्यक्ष, भाजपा), राजाराम साळवी (अध्यक्ष, आगरी सेना), दशरथ पाटील (उपनेते, शिवसेना) ,संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे (ज्येष्ठ नगरसेवक), विकास पाटील (नगरसेवक), अशोक भोईर (माजी उपमहापौर), सचिन मोरे (अध्यक्ष, के.बी.पी. कॉलेज) आणि विक्रम भोईर (सरचिटणीस, भाजपा) मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे. तसेच परिसरातील सर्व स्थानिक नगरसेवकांची देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात गायक नंदेश उमप यांचा ‘शिवगिते व पोवाड्यांचा नजराणा’. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून जिवंत केला जाईल. तसेच, प्रा. विशाल गरुड यांचे ओघवते व्याख्यान तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. शिवताल ढोल ताशा पथक (नाशिक) यांच्या कडकडाटात निघणारी मिरवणूक आणि वाद्यवादन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.. केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत जनस्वराज्य ही संस्था विविध उपक्रम राबवते आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “हा उत्सव केवळ एक सोहळा नसून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ठाणेकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील व त्यांचे विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता

ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील चौथे विशेष पोक्सो न्यायालय (मा. न्यायाधीश रुबी मालवणकर) यांनी विशेष सत्र प्रकरण क्र. ०९/२०२६…

 आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई

आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई बिल्डर मेहता यांच्या कंपनीविरुद्ध खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने मोठा निर्णय मिरा – भाईंदर/ अरविंद जोशी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण कोर्टाने सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित एका प्रकरणात खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने निकाल दिला. कंपनीचे प्रवर्तक आणि जबाबदार अधिकारी आमदार नरेंद्र एल. मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीला कडक शब्दांत फटकारले. कोर्टाने या प्रकरणाला सेवेतील कमतरता, फसवणूक आणि अनुचित व्यापार असल्याचे म्हटले आहे. मनोज दुबे यांनी १२ फेब्रुवारी २०१३ रोजी भाईंदर (पूर्व) येथील सेव्हन इलेव्हन रेसिडेन्सीच्या ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक डी/७०६ साठी नोंदणीकृत करार केला आणि मोठी रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्याने इंडियाबुल्स फायनान्सकडून गृहकर्जासाठी अर्ज केला, परंतु बिल्डरकडे ७ व्या मजल्याच्या बांधकामासाठी मंजूर आराखडा नव्हता, कारण परवानगी फक्त ४ थ्या मजल्यापर्यंतच देण्यात आली होती. या कारणास्तव, बँकेने कर्ज रद्द केले. नंतर, बिल्डरने सुधारित परवानगी घेतली, परंतु मेहता अँड कंपनीने तरीही भरीव व्याज आणि दंडाची मागणी केली, पेमेंटमध्ये विलंब झाल्याचे कारण खरेदीदाराला जबाबदार धरले. कंपनीच्या मागणीबाबत, कोर्टाने म्हटले की बिल्डर स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही, कारण परवानगीशिवाय ७ व्या मजल्याचा फ्लॅट विकण्याचा करार करणे हा गंभीर गुन्हा आहे. रद्द करणे आणि धमकावणे वृत्ती खरेदीदार मनोज दुबे यांनी दुसऱ्या बँकेकडून कर्जाची व्यवस्था करून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ९ जानेवारी २०१४ रोजी, बिल्डरने एकतर्फीपणे करार रद्द करणारे पत्र जारी केले आणि पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला. मेहताच्या वर्तनाबाबत, कोर्टाने म्हटले की नोंदणीकृत करार केवळ पत्राद्वारे रद्द करता येत नाही आणि बिल्डरचे वर्तन स्पष्टपणे अन्याय्य होते. कोर्टाला असेही आढळून आले की वाटप पत्रात क्षेत्रफळ ५९० चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे, तर करारात कार्पेट क्षेत्रफळ ४७२ चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे. ही तफावत देखील बेकायदेशीर आणि अस्पष्ट आहे. कोर्टाचा आदेश आयोगाने बिल्डर, प्रवर्तक नरेंद्र एल. मेहता आणि रजनीकांत सिंग यांना संयुक्तपणे जबाबदार धरले आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश दिले. त्यांनी खरेदीदाराला मानसिक छळासाठी भरपाई म्हणून ₹२.५ लाख, खटल्याचा खर्च म्हणून ₹५०,००० आणि प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत दररोज ₹१,००० देण्याचे आदेश दिले. आयोगाच्या या आदेशात स्पष्ट केले आहे की बांधकाम व्यावसायिक वैध परवानगीशिवाय करार करू शकत नाहीत आणि बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे होणाऱ्या विलंबासाठी खरेदीदारांना दंड आकारला जाऊ शकत नाही. रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आवश्यक आहे.…

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवासासाठी जाहीर केलेल्या डिजिटल ओळखपत्र योजनेतील अर्ज `महा ई सेवा’ केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व `टीएमटी’चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांना पत्र पाठवून संजय वाघुले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज दाखल करताना होणाऱ्या अतोनात हालाकडे लक्ष वेधले. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची आग्रही मागणी केली आहे. `टीएमटी’ बसमधून ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर, वागळे आगार, वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस आणि धर्मवीर चौक  येथे अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ओळखपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वत: उपस्थित राहण्याची अट आहे. त्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या ठाणे स्थानकातील केंद्रावर सर्वात जास्त गर्दी होत असून, एक ते दोन तास ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी `टीएमटी’चे डिजिटल ओळखपत्र काढण्याचे ठरविल्यास केंद्रांवर मोठी गर्दी होईल. सध्या या योजनेसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून परिवहन प्रशासनाने अर्ज स्विकारल्यास ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळू शकेल, याकडे लक्ष वेधून संजय वाघुले यांनी डिजिटल ओळखपत्र योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली आहे.

  दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी

शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला सर्कल परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भिवंडी–कल्याण महामार्गावरील दुर्गाडी पुलाच्या उतारालगतच हे खड्डे असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.  हजारो वाहने ये-जा करणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांचे जीव अक्षरशः धोक्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतच आणि शहराच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचे लक्षात येताच या परिस्थितीची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित विभागाला त्वरित सूचना देत युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश दिले. जागरूक नागरिकांनी याबाबत परदेशी यांना सूचित करून वस्तूस्थितीकडे लक्ष वेधले होते. परदेशी यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत पुलाच्या उतारालगत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवती असलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर गंभीर अपघात अटळ होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. वेळेवर आणि संवेदनशीलपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.

शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक

शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर,-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही, तर लाखो शिवसैनिकांसाठी एक ऊर्जास्त्रोत आणि सामान्यांसाठी आधारवड आहेत. त्यांच्या विचारांतील…

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगर पालिका हद्दीत ८.२४ किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, ही तोडलेली झाडे…

  महा अंनिसच्या ‘युवा संकल्प अभियाना’चा व्हॅलेंटाईन डेला डोंबिवलीत समारोप

अभिनेता सुव्रत जोशी-अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या उपस्थितीत महा अंनिसच्या ‘युवा संकल्प अभियाना’चा व्हॅलेंटाईन डेला डोंबिवलीत समारोप ठाणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड विभागा’तर्फे राबविण्यात आलेल्या ‘युवा संकल्प अभियाना’चा समारोप शनिवारी, १४ फेब्रुवारी , व्हॅलेंटाईन डेला सकाळी १० ते सायंकाळी ४ या धेळेत डोंबिवली पश्चिम येथील स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. या समारोप परिषदेला प्रसिद्ध अभिनेता, नाट्यकलाकार व निर्माता सुव्रत जोशी व  अभिनेत्री शर्मिला शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे असतील, तर उद्घाटन स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजचे सचिव देवेंद्र जोंधळे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत जोडीदाराची विवेकी निवड, प्रेम, लैंगिकता, सामाजिक दबाव, कायदे व समावेशकता या विषयांवर परिसंवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या परिसंवादात अनिल उकरंडे, आरती नाईक यांच्यासह तृतीयपंथी (Transgender) समुदायातील प्रतिनिधी वक्ता सहभागी होणार असून, युवक-युवतींसाठी हे सत्र मार्गदर्शक व प्रबोधनात्मक ठरणार आहे.समाजात विवाह, प्रेमसंबंध व सहजीवनाबाबत असलेले गैरसमज, अंधश्रद्धा व दबाव याविरोधात विवेकी भूमिका मांडणे, तसेच तरुण पिढीला स्वतंत्र, समतावादी व जबाबदार निर्णयक्षम बनवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जोडीदाराची निवड हा प्रत्येक युवक-युवतीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र या निर्णयाकडे अनेकदा पुरेशी पूर्वतयारी, समज आणि गंभीरतेने पाहिले जात नाही. परिणामी, वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. आज समाजात जोडीदार निवडीचे प्रामुख्याने दोनच मार्ग रूढ आहेत — पारंपरिक ‘कांदेपोहे’ पद्धतीतील अल्प वेळेचा परिचय कार्यक्रम किंवा प्रेमविवाह. या दोन्ही पर्यायांमध्ये अनेक मर्यादा असल्याचे समितीचे मत आहे. या पार्श्वभूमीवर समितीने ‘परिचयोत्तर विवाह’ हा अधिक समंजस आणि विवेकाधिष्ठित पर्याय पुढे आणला आहे. या उपक्रमांतर्गत लग्नाळू युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांसोबत संवादशाळा घेऊन विवेकपूर्ण निर्णय प्रक्रियेवर भर दिला जातो.समितीने या अभियानासाठी पाच सूत्रे निश्चित केली आहेत :१ प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणे, २ बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता तपासणे, ३ हुंडा, पत्रिका आणि व्यसनांना स्पष्ट नकार देणे, ४ लग्न साधेपणाने करणे, ५ आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाच्या शक्यता सकारात्मकतेने पडताळणे. अभियानादरम्यान युवक-युवतींची परस्पर संमती, जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता, आवडी-निवडी, स्वभाव, शारीरिक-मानसिक-आर्थिक सुदृढता, विचारसरणी आणि भविष्याविषयीची स्वप्ने या सर्व बाबींवर चर्चा केली जाणार आहे. विवाहातील अपयश आणि तणाव कमी करण्यासाठी हा एक सकारात्मक पर्याय असल्याचे समितीचे मत आहे. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी :रेश्मा खाडे: ९४२१११४८७९, कविता मते: ९५७९१०५०५८, डाॅ सुषमा बसवंत: ९८९२३८०४७३, अनिल ठाणेकर(पत्रकार) : ९५९४६७९९२६ यांना संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

 ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करा

ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करा उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना पत्र ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ‘ठाणे शहर विकास समिती’ नियुक्त करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवले आहे. पारदर्शक विकासासाठी समितीची गरज पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले की, ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटील होत आहेत. केवळ सिमेंट-काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणे ही काळाची गरज बनली आहे. समितीची प्रमुख उद्दिष्टे: उपमहापौरांनी या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून पाच प्रमुख उद्दिष्टे मांडली आहेत: विकास आराखडा (DP) नियंत्रण: शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे. जनहितकारी धोरणे: बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरण राबविणे. भ्रष्टाचार निर्मूलन: शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे. ज्वलंत प्रश्नांवर तोडगा: अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे. हॅपी इंडेक्समध्ये वाढ: नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे. राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून, शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत ठाणे मनपा आयुक्तांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.