Category: ठाणे

Thane news

परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान

परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे-  मंगळवारपासून राज्यात बारावीच्या तर 20 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, यासाठी रिक्षा चालकांनी कोणतेही भाडे नाकारू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक – मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केले आहे. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद् गाठणे परीक्षार्थीना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करणार आहेत. मात्र, आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत, परीक्षार्थीना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावे, असे आवाहन प्रधान यांनी केले आहे. यासंदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंती केली आहे. चौकट राष्ट्रवादी (श.प.) चे कार्यकर्ते सज्ज वाहतूक कोंडी अथवा इतर कोणत्याही अडचणीमुळे विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मदतीला उभे राहणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजीत पवार, कार्याध्यक्ष राजेश कदम,  श्रीकांत भोईर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहू पाटील ( +918424004747) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते अनुक्रमे कळवा, ठाणे आणि घोडबंदर पट्ट्यात दुचाकीवरून विद्यार्थ्यांना अडचणीच्यावेळी परीक्षा केंद्रावर पोहोचवतील, असेही मनोज प्रधान यांनी सांगितले.

 ठाणे महापालिका आयोजित पर्यावरणपूरक प्रशिक्षणास महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे महापालिका आयोजित पर्यावरणपूरक प्रशिक्षणास महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे : महिला सक्षमीकरणासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी कचरा व्यवस्थापन तसेच सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड या विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शहरी उपजीविका केंद्र, तत्वज्ञान विद्यापीठ येथे करण्यात आले. ठाणे महानगरपालिका गेल्या दहा वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्था (NGO) व महिला बचत गटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे राबवत आहे. समाज विकास विभागामार्फत बचत गटांना अधिकृत मान्यता देण्यात येते. त्यांना ओळखपत्रे, घंटागाड्या, वर्गीकरण शेड आदी सुविधा पुरवण्यात येतात. या माध्यमातून कचरा वेचक महिलांना घराघरातून कचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व प्रशिक्षण देण्यासारख्या विविध रोजगार संधी उपलब्ध होत असल्याचे उपपर्यावरण अध‍िकारी वैशाली पालकर यांनी नमूद केले. उपक्रमात परिसर विकास भगिनी संस्था, स्त्री मुक्ती संघटना, अँटी प्लास्टिक ब्रिगेड, समर्थ भारत व्यासपीठ आदी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. भविष्यात  वृक्षलागवड व संगोपन, कापडी पिशव्या तयार करणे यांसारखी अन्य पर्यावरणपूरक कामेही महिला बचत गटांमार्फत करता येतील, असेही त्यांनी नमूद केले.यानंतर स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर यांनी आपल्या प्रभावी व सोप्या शब्दांत तसेच गीतांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंब व समाजाच्या विकासासाठी महिलांनी अर्थार्जन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत महिलांना प्रेरित केले.कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत ओला व सुका कचरा वर्गीकरणाची आवश्यकता व त्याची योग्य पद्धत उपस्थित महिलांना  परिसर भगिनी विकास मंडळाच्या  कल्पना अंधारे यांनी समजावून सांगितली. तसेच परिसर भगिनी विकास मंडळाच्या निर्मला सावंत यांनी कडधान्ये, तृणधान्ये व गळीत धान्यांपासून सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड कशी करावी, याची सविस्तर माहिती दिली. भाज्या घरच्या घरी तयार करून कुटुंबाला रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) पासून वाचवता येते, असे त्यांनी सांगितले. शिवाय, या लागवडीच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहजपणे उत्पन्नाचे साधन निर्माण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव-संजय केळकर

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव-संजय केळकर ठाणे : ठाणेकरांनी गेली २७ वर्षे उचलुन धरलेल्या या मालवणी महोत्सवातुन केवळ खवय्यांनाच नाही तर, कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक अग्नीहोत्र तसेच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे. असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी ८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी, शिवाईनगर उन्नती मैदान येथे “मालवणी महोत्सव-२०२६” भव्य आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी, ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, उषा वाघ,सुरेश कांबळे, अनिता ठाकुर, दिपक जाधव, अनिता यादव,विमल भोईर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, हरी मेजार, हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, हिंदुराव गळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.आ. केळकर आणि आ. डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच, यंदा प्रथमच उभारलेल्या स्व. कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचेही उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आ. केळकर यांनी, कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कलासंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतुने गेली २७ वर्षे सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असुन आता ते आयोजकावरून नगरसेवक बनल्याचे सांगितले. केवळ खवय्यांसाठी नाही तर, ह्या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचे आ. केळकर म्हणाले. तर,आ.निरंजन डावखरे यांनी, सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातुन गेली २७ वर्षे कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असुन एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुकोद्गार काढले.

सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – रणजित यादव

सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन ७ व ८ फेब्रुवारी लोधा वर्ल्ड स्कूल, ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा सिटी, कल्याण येथे उत्साहात पार पडले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव व आरोग्य विभागातील युवा खेळाडू दशरथ शिंगळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले. या दोन दिवसांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाच्या धावपळीतून वेळ काढून शारीरिक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.क्रीडा महोत्सवात सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीबद्दल शहापूर तालुक्याला सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळाला. विविध स्पर्धांमधील विजेते पुढीलप्रमाणे –कबड्डी पुरुष – शहापूर तालुका, कबड्डी महिला – कल्याण तालुका, खो-खो पुरुष – भिवंडी तालुका, खो-खो महिला – शहापूर तालुका, क्रिकेट पुरुष – मुरबाड तालुका, बॉक्स क्रिकेट महिला – भिवंडी तालुका, लंगडी – शहापूर तालुका, रस्सी खेच पुरुष – शहापूर तालुका, रस्सी खेच महिला – अंबरनाथ तालुका, व्हॉलीबॉल – शहापूर तालुका.विजेते संघांनी हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. या क्रीडा महोत्सवाचे नियोजन पंजाब नॅशनल बँक यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पद्माकर लहाने, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडीत राठोड, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सीखेच, हॉकी, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह महिला व पुरुषांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अधिनस्त जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्या शिर्के व मनोहर मडके यांनी प्रभावीपणे केले. क्रीडा महोत्सवामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 खोणी पलावा परिसरात भटक्या कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर हल्ला

खोणी पलावा परिसरात भटक्या कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर हल्ला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कल्याण: कल्याण–शीळ रोडवरील खोणी पलावा येथील आर्केड सोसायटीमध्ये सकाळी धक्कादायक घटना घडली. शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे मुलीचा जीव वाचला. या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. घडलेला हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये कुत्र्यांचा ४ ते ५ कळप मुलीच्या दिशेने धावत येताना दिसत असून सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने निर्बिजीकरण मोहीम, कुत्र्यांचे स्थलांतर व नियंत्रणासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन

पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन कल्याण: मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या पाटील बालमंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “संस्कृती, परंपरा आणि इतिहास” या विषयावर त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, पारंपरिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यछटा, गीत, वेशभूषा व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. विद्यार्थ्यांनी भारतीय सण-उत्सव, सामाजिक परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून संस्कृती जपण्याचा आणि इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पाटील बालमंदिर शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली. या कार्यक्रमासाठी केडीएमसीच्या महापौर  हर्षाली चौधरी थविल, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक गणेश कोट, रोहन कोट, राहुल कोट, नगरसेविका  तेजश्री गायकवाड, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील,  दशरथ तरे,सामाजिक कार्यकर्ते  सुरेश सोनार, जेसी कटारिया, रामा कांबळे, वैभव पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे  पदाधिकारी एस जे पाटील, जी एल पाटील, प्राचार्य बी एन पाटील, संध्या पाटील, सुदर्शन पाटील, आशिष पाटील, स्वप्निल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी.पी. निचिते, व्हि.डी. चौथे, रुपाली   सावदेकर, लिजी नांबियार, वरिष्ठ शिक्षिका संगिता पाटील, वरिष्ठ शिक्षक विकास पाटील, समस्त शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट

केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट रुग्णांची केली आपुलकीने विचारपूस कल्याण:  कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शनिवारी सकाळी साडेआठ वाजता डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दैनंदिन स्वरूपात केली जाणारी स्वच्छता, उपलब्ध औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेतला तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूसही केली. यावेळी त्यांनी नवजात अतिदक्षता विभाग, बालरोग अति दक्षता विभाग या विभागांची तसेच इतर विभागांची देखील  पाहणी केली त्याचप्रमाणे रुग्णालयात चालू असलेल्या दुरुस्ती कामाची देखील पाहणी केली.  महापालिका रुग्णालयातील रुग्ण काही वेळेस तातडीने इतर रुग्णालयात संदर्भित करावे लागतात यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांस दिल्या. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये केस पेपर काढण्यासाठी त्याचप्रमाणे अपघात कक्षात  रोकड रक्कम देऊन केस पेपर काढण्याच्या प्रक्रियेस लागणारा वेळ पाहता, केस पेपर काढण्यासाठी क्यूआर कोड आधारित  प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय काय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना दिले. यावेळी शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी  डॉ.सादिया पिंजारी, डॉ. विनोद दौंड, बालरोगतज्ञ डॉ. हेमराज देवरे उपस्थित होते.

  ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन

ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन नृत्य, कला, संगीताची पर्वणी असणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात – मंत्री प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन  दिमाखात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त  सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिव्हल हा ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभा यात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठुमाउलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिव्हलमध्ये कलादालनाला त्यांचे नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकली. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगली. ९ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याच बरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाचा मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवडा, अभंग आदींचा सुंदर मिलाफ फेस्टिव्हल मध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

 केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज

केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक आगळावेगळा उद्यान प्रकल्प कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक आगळा वेगळा प्रकल्प साकारला जात असून यामध्ये आता महापालिका क्षेत्रातील बारावे रिंग रोड लगत  परिसरात ऑटिजम व्हिलेज साकारले जात आहे. हे ऑटिजम व्हिलेज व्हिलेज सुमारे   १२७७२ चौ मी इतक्या परिसरात तयार होत असून ऑटिजम व्हिलेज अंतर्भूत असलेल्या उद्यानात एका बाजूस ऑटिजमग्रस्त मुलांसाठी ऑटिजम व्हिलेज आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यान साकारले जात आहे. या ऑटिजम व्हिलेज मध्ये स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठी  संवेदी उद्यान, संवेदी मार्ग, संवेदी खेळाची उपकरणे, ध्यान केंद्र, उपचार केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आहेत. यामुळे महापालिका आणि एमएमआर रिजन मधील ऑटिजम रुग्णांना थेरेपी सुविधा उपलब्ध होणार आहे . उर्वरित भागात भव्य उद्यान , आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट ,एम्म्पोथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग,  जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया , टॉयलेट, सोलर सिस्टम अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हे ऑटिझम व्हिलेज मेरी रियालिटी या  विकासकांमार्फत अमिनिटी टीडीआर मधून तयार होत असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी याठिकाणी पाहणी करून २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाला   या  ऑटिझम व्हिलेजचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण करण्याबत संबंधितांना निर्देश दिले. तसेच दर सप्ताहात स्थळपाहणी करून आढावा घेतला जाईल असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सहा संचालक  नगररचना संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव व विकासक सुदेश मोर्यांनी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे व कन्सल्टंट सूरज पाटील उपस्थित होते.

ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’!

ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’! सुयश व्याख्यानमालेत उलगडला ५० वर्षांच्या कारकि‍र्दीचा प्रवास ठाणे : चित्रपट व संगीत क्षेत्रातील तब्बल ५० वर्षांहून अधिक समृद्ध कारकि‍र्दीत १९ पार्श्वगायक व २८ अभिनेत्यांचे…