Category: ठाणे

Thane news

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली कल्याण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या असह्य दुःखद प्रसंगी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची, जनतेसाठी केलेल्या कार्याची आणि संघर्षमय वाटचालीची आठवण यावेळी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे दादा आपल्या आज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्ते वल्ली राजन यांनी दिली.

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याणतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याणतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप कल्याण :   कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टतर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडीच्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात. सोमवारी झालेल्या या उपक्राला दाता म्हणून अरविंद कपोते, दिपक पोपट व जतिन ठक्कर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात विषेश अतिथी म्हणून नगरसेवक जतिन प्रजापति व मेधा खेमा उपस्थित राहिल्या होत्या. संस्थेचे संचालक  जसू चंदाराणा व छबिल कारीया यांनी संस्थे तर्फे त्यांच्या सत्कार केला. ज्या कोणाला या अन्नक्षेत्राच्या सेवाकार्या मध्ये सहयोग द्यायचा असेल त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलनानंतर नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरावर गुन्हा दाखल

दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलनानंतर नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरावर गुन्हा दाखल कल्याण : कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर उल्हासनगर येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात साळवे गंभीर जखमी होऊन त्यांना कार्डियक अटॅक आला होता. याप्रकरणी एक वर्षाहून जास्त कालवधी उलटून देखील गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणी साळवे यांनी दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलन केल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. ९ जून २०२५ रोजी उल्हासनगर येथे एका वृद्ध सिंधी व्यक्तीला काही लोक मिळून मारत होते. सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले असताना त्यामधील एका अज्ञात व्यक्तीकडून साळवे यांच्या वर  प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात साळवे यांचा ब्लडप्रेशर स्ट्रोक झाला व त्यांना कार्डियक अटॅक आला होता. त्यानंतर साळवे यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात येऊन २४ दिवस दवाखान्यात उपचार घेत होते. या घटनेची माझ्या कुटुंबियांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या पोलिसांना माहिती देऊन सुद्धा त्यांनी त्यावेळेस कुठलीच ठोस कार्यवाही केली नाही. त्यावर आश्चर्याची गोष्ट अशी की पोलिसांनी साळवे यांचा जवाब न नोंदविता माझा केस दफ्तरी फाईल करून टाकले होते. झालेल्या ह्या अन्याय विरोधात राज्य सरकार कडून पाऊले उचलण्यासाठी साळवे यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री व  वरिष्ठ नेत्यांना निवेदन दिले होते, परंतु त्या निवेदनांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याकारणाने साळवे  ८ डिसेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनाला दीड महिन्याच्या वर वेळ झाल्यानंतर थोडा न्याय मिळाला आहे, उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस स्टेशन च्या पोलिस अधिकारयांनी मंगळवारी दोषींवर गुन्हा दाखल केला आहे.

कर्तव्यापलीकडचा त्याग

कर्तव्यापलीकडचा त्याग महाराष्ट्र पोलिस भावाने यकृतदान करून धाकट्या भावाला दिले नवे आयुष्य कल्याण : कर्तव्य, प्रेम आणि बंधुत्व यांचा विलक्षण संगम दाखवणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका…

 संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं

विधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं बाबासाहेबांनी सर्व घटकांना समान न्याय व हक्क देणारे संविधान दिले   – आनंद गायकवाड कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय सेंट वाय सी इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पाहता संस्थेने प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्याहस्ते तिरंगी ध्वजारोहण केले. आनंद गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून सतत्याहत्तर वर्षे झाली. शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा अद्यापही मिळत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व घटकांना समान न्याय व  हक्क देणारे संविधान दिले  परंतु आजही देशात गरिबी आणि दारिद्र्य आहे. बिनविरोध निवडणूक करून नागरिकांचा मतांचा अधिकारच काढून घेत आहेत हे लोकशाहीला घातक आहे. संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझा सन्मान केला मी धन्य झालो. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर आकर्षक कवायतीच्या माध्यमातून देशभावना जागृत केल्या.आर. एस. पी. आणि एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी झेंड्यास सलामी दिली. महापुरुषांच्या वेशभूषेवर आलेली लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले.

हा निव्वळ अपघात, राजकारण नको- शरद पवार

हा निव्वळ अपघात, राजकारण नको– शरद पवार बारामती : “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ…

माझा मोठा भाऊ हरपला- एकनाथ शिंदे

माझा मोठा भाऊ हरपला- एकनाथ शिंदे ठाणे : “आज माझा मोठा भाऊ हरपला आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत…

 ठाण्यात “गांधींहत्या आणि आपण” या विषयावर व्याख्यान

ठाण्यात “गांधींहत्या आणि आपण” या विषयावर व्याख्यान धर्मराज्य पक्षाचे आयोजन, डॉ. सतीश कोर्डे व कॉ. आनंद तेलतुंबडे प्रमुख वक्ते अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, ३० जानेवारीला…

२ फेब्रुवारीला मलंगबाबा वार्षिक पालखी सोहळा

२ फेब्रुवारीला मलंगबाबा वार्षिक पालखी सोहळा भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – गोपाळ लांडगे डोंबिवली, दि. 28 जानेवारी (आरती परब) : २७ जानेवारीला, श्री मलंगड यात्रा निमित्त कल्याण पश्चिमेतील ९ नेक्स्ट बैंक्वेट हॉल, साई पार्क स्ट्रीट कमर्शियल संकुल, येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, हे उपस्थित होते. या वेळी बोलताना गोपाल लांडगे यांनी सांगितले की, मलंग स्थान हे रिवाजा प्रमाणे बघता संपूर्ण स्थान हिंदूंच आहे. यावर अतिक्रमण केलेले आहे. कारण येथिल मानकरी हा हिंदूच आहे, पुजारी हिंदू आहे, पालखीचे भोई हिंदू आहे, मशाल धरणारे हिंदू आहेत, पालखी बरोबर डोक्यावर दिवे घेऊन जाणारे हिंदू आहेत, दरवर्षी येथे श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, ललित पंचमी, कृष्ण जन्मोत्सव, दिवाळी पाडवा, वर्षाच्या साऱ्या पोर्णिमा साजऱ्या केल्या जातात. मात्र देवस्थानाची नोंदणी करताना “पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट” नावाने नोंदवले गेले आहे. या प्रकरणातील दावे हायकोर्टात न्याय प्रविष्ट असून तेथे, ॲड. नितीन प्रधान हे कामकाज पाहतात, तर ठाणे कोर्ट येथे १९८२ पासून केस सुरू आहे. धर्मदाय आयुक्त येथील कामकाज ॲड. मुधोळकर व पुण्याचे व पुण्याचे मदन बलखवडे हे पाहतात. त्याचप्रमाणे वफबोर्ड मध्ये झालेला वाद सुटला आहे. मात्र विरोधक आपिलात गेल्यामुळे तेथील वाद संभाजीनगर येथे ॲड. देशपांडे पाहतात. या यात्रेचे नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे, तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षीप्रमाणे मलंग बाबा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. १९७८ सालापासून सुरू झालेला हि यात्रा विशेषतः १९८६ पासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मलंग मुक्तीचा लढा सुरू आहे. जसा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्याच प्रमाणात जनजागृती करून हिंदूंची वहिवाट तीच मलंग मुक्तीची पहाट या घोषणेप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार सुरू झालेल्या या कार्यक्रमला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गोपाळ लांडगे यांनी सांगितले. तर जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी २ फेब्रुवारीला या यात्रेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मलंगबाबाच्या समाधीची आरती करण्यात येणार आहे. तर रात्री ७ वाजता जोशी बाग (मलंगडच्या पायथ्याशी) शिवसेना बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जमून मलंग गडावर होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी जातील. रात्रीचा पालखी सोहळा सकाळी गंधलेपण व ६ फेब्रुवारी श्री मलंग बाबाचे वार्षिक स्नान सोहळा होईल. या स्नान सोहळ्यात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी. सर्व हिंदू विधी प्रमाणे हिंदू प्रतिनिधी पूजा करून उत्साह साजरा केला जाईल. भाविकांना मलंग गडावर जाण्यासाठी फॅनिक्युलरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे मलंग गडावर येण्या जाण्यासाठी सोप होणार आहे.

जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन महोत्सव संपन्न

जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन महोत्सव संपन्न कल्याण: विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना तसेच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याला चालना देण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरा जपण्याच्या हेतूने स्पंदन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे पूर्णपणे नियोजन व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनीच केले होते. महाविद्यालयात नृत्य, गायन, मेहंदी, एकपात्री, रांगोळी, फॅशन शो, फोटोग्राफी इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सुरुवात ही गणरायाच्या चरणी दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घेतला. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष. रविंद्र घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्रा. शिवाजी वाघमारे मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी यांनी लोककलेचा नजराणा सर्वांसमोर सादर केला. यामध्ये माझी मैना गावाकडे राहिली, संत जनाबाईंचे प्रबोधनपर गीत, भारुड इत्यादी गोष्टी त्यांनी सादरीकरण केल्या व विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले. प्रा. महेश थोरात या  कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, संचालक .प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य. हरेंद्र सोष्टे, व्यवस्थापन शाखाप्रमुख. उल्हास गायकर,प्रा. निकिता घोडविंदे, प्रा. सचिन कांबळे, प्रा. शैलेजा मिश्रा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे एकत्रित सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.