Category: ठाणे

Thane news

प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव नवी मुंबई : (अशोक गायकवाड )–भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ७७ वा वर्धापन दिनाचा कोकण विभाग स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-१७, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आणि शालेय विद्यार्थी आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परेड कमांडर श्रीमती प्रेरणा कट्टे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाने राखीव पोलीस मुख्यालय नवी मुंबई, एस.आर.पी.एफ,ग्रुप नं.११ प्लाटून, क्यु .आर.टी.पथक, नवी मुंबई, आर.सी.पी.पथक, नवी मुंबई, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई वाहतूक पोलीस पथक, डॉग स्कॉड बॉम्ब शोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुन वाहन, वज्रवाहन, निर्भया पथक इरटिगा, फायर बुलेट, निर्भया पथक ॲक्टीव्हा, अग्निशामक रेस्क्यु व्हॅन सिडको आदीनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागतर्फे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.३६ कोपरखैरणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.११२ करावे गांव, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१५ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.९३ सीवुड, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०२ नेरुळ, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०१ शिरवणे या सहा शाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग सिध्दाराम सालीमठ, सहआयुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, उपर आयुक्त (विकास) डॉ.माणिक दिवे, सहआयुक्त (पुर्नवसन) रवि पाटील, सहआयुक्त (करमणूक व शुल्क) रविंद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचलन केल्याबद्दल शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांना विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

धागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी खुला

धागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी खुला ट्रेक क्षितिज संस्थेची श्रमदान मोहीम यशस्वी कल्याण : ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनाच्या उद्देशाने ‘ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली’च्या शिलेदारांनी सुधागड दुर्गावरील दुर्लक्षित असलेल्या ‘पूर्व बुरुज’ परिसरात श्रमदानाची विशेष मोहीम यशस्वीरीत्या राबवली. २४ व २५ जानेवारी रोजी झालेल्या या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे झाडीने बुजलेला मार्ग मोकळा झाला असून, आता गडप्रेमी व पर्यटकांना या ऐतिहासिक बुरुजापर्यंत सहज व सुरक्षितपणे पोहोचता येणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या पाहणीत पूर्व बुरुजाकडे जाणारी वाट दाट गवत, काटेरी झुडपे आणि दगडधोंड्यांमुळे पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी केवळ स्थानिक गाईडच्या मदतीनेच हा मार्ग पार करता येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ट्रेक क्षितिजच्या सदस्यांनी २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून श्रमदानास सुरुवात केली. सलग मेहनतीने दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे एक किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करण्यात आला. मूळ वाट काही ठिकाणी अत्यंत धोकादायक व उघडी (एक्स्पोज्ड) असल्याने, संस्थेच्या सदस्यांनी श्रमदानातून एक सुरक्षित पर्यायी मार्गही तयार केला. तसेच बुरुजावर उतरणाऱ्या पायऱ्यांवर साचलेले दगड, माती, गवत व काटेरी झुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. दुपारचे जेवण लांबणीवर टाकून सलग दोन तास कष्टाचे काम करत हा ऐतिहासिक वारसा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. सुधागडच्या संरक्षण व्यवस्थेत पूर्व बुरुजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोरप्याची नाळ व घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या बुरुजाची रचना मोक्याची ठरली होती. हा बुरुज जिंकला गेला असता तर शत्रूस थेट महादरवाजापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते. त्यामुळे या बुरुजाचे संवर्धन ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. या संदर्भात मोहीम प्रमुख शुभम सावंत यांनी सांगितले, “मांडवीकोटावरील सलग पाच मोहिमांनंतर आम्ही सुधागडचा पूर्व बुरुज मोकळा करण्याचा संकल्प केला होता. संघातील सर्व सदस्यांच्या चिकाटीमुळे आज हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा सर्वांसमोर आला आहे. दुर्गसंवर्धनाचे हे कार्य भविष्यातही असेच सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.” या मोहिमेत प्रशांत राबांडे, महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम, प्रिया कराडकर, संदेश मुठे, कपिल कुलकर्णी, शैलजा धनगर, प्रणाली नारकर, सुजल राबांडे, अथर्व गावकर, तृप्ती मांजरेकर, प्राची कोकाटे, सागर रासम, प्रशांत साठे, स्नेहल झोपे, सोनाली मांजरेकर व निकिता पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

हे असंस्कृत वर्तन कोण सहन करेल ?

हे असंस्कृत वर्तन कोण सहन करेल ? अमृता फडणवीस यांच्या विरोधातील चिथावणीचा शत:दा निषेध !  दिवाकर शेजवळ बेताल गायिका अंजली भारती हीची द्वेषपूर्ण गीते, बीभत्स अभिनय, चिथावणीखोर वक्तव्ये ही प्रबुद्ध आंबेडकरी समाजाची अभिरुची, संस्कृती, भूमिका कदापिही असू…

ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार

ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार सिद्धेश शिगवण ठाणे : ठाण्याला येत्या ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार आहे. ठाणए महापौर पदासाठी येत्य ३० जानेवारीला अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर, ३ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक…

मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच

मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच स्वाती घोसाळकर मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीने काठावरचे बहुमत मिळवले. बहुमताचा हाँ आकडा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं पक्षाने स्वतंत्र…

मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन; चार पदरी पुलाचे दोन पदर गायब

मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन; चार पदरी पुलाचे दोन पदर गायब अरविंद जोशी मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रिजमध्ये फोर टू का वन करण्यात…

शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याची  परवानगी द्याच… आम्ही तयार आहोत

शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याची परवानगी द्याच… आम्ही तयार आहोत नरेश म्हस्केंचा भाजप प्रदेशाध्यक्षांवर ‘लेटर बॉम्ब’ ठाणे :   भाजपाने परवानगी दिली तर, यांचे नामोनिशाण मिटवून टाकीन, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसापूर्वी केले होते. याचा खरपूस समाचार…

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी, याच दिवशी, अहिंसेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुजाऱ्याची, एका अधम वृत्तीच्या माथेफिरुकरवी कट रचून निर्घृण हत्या करविली गेली.बरोबर ७८ वर्षांपूर्वी ‘गांधी’ नावाच्या महात्म्याची हत्या झाली खरी; पण, ‘गांधीवाद आणि गांधीविचार’ कधिच मेले नाहीत, कधिच मरणार नव्हते…कारण, आजच्या जागतिक-तापमानवाढीसारख्या महासंकटामुळे भयग्रस्त झालेल्या व भांडवली-नववसाहतवादी दुष्प्रृत्तींमुळे, अशांत-अस्वस्थ झालेल्या जगाला.केवळ, ‘गांधीविचार’च तारु शकतो; हे एव्हाना, या समरप्रसंगी, अवघ्या जगाच्या चांगलंच ध्यानी आलंय, असे मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले. आपल्या याच, विश्ववंदनीय महात्म्याचे, हेच वैश्विक-विचार पुढे नेण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ या समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने, ३० जानेवारी-२०२६ रोजी, सायंकाळी ठीक ५ वा. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे, हे दोघे मान्यवर प्रभावी वक्ते ‘गांधी-विचारविश्वावर’ प्रकाशझोत टाकताना, आपल्यातील समाजघातकी, राष्ट्रद्रोही व अतिरेकी अशा उजव्याशक्तिंचा यथोचित समाचार घेतील.  सर्वसामान्यांना अज्ञात असलेल्या ‘गांधींची ओळख’, या व्याख्यानातून होईलच; पण, त्याचबरोबर गांधीहत्येचं नेमकं ‘सत्य’ही, या व्याख्यानातून पुढे येईल. आजपर्यंत ढोंगी व जात्यंध्य हिंदुत्ववाद्यांकडून, आपल्या महात्म्याबद्दल आणि त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक अफवा बेमालुमपणे प्रसारित केल्या गेल्या; त्या सप्रमाण, पुराव्यांसह खोडून काढण्याचं महान कार्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, ही अपेक्षा आहे. आपल्या राष्ट्रपित्याचं कळीकाळाला पुरुन उरणारं महान कार्य व त्याचा संदेश…जनसामान्यांपर्यंत साद्यंत पोहोचावा; तसेच, त्याच्या ‘हौतात्म्या’तून अंशतः का होईना, पण उतराई होता यावे, यासाठीच,”गांधीहत्या आणि आपण…” या व्याख्यानाचं प्रयोजन आहे आणि त्यासाठीच, आपली उपस्थिती आवर्जून प्रार्थनीय आहे, असे आवाहन राजन राजे यांनी केले.

 फ्लेक्सो लिंग संघाला विजेतेपद

आंतर कार्यालयीन नोबल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा फ्लेक्सो लिंग संघाला विजेतेपद ठाणे : फ्लेक्सो लिंग -लेबल डिव्हिजन संघाने ड्रिम एकादश संघाचा २७ धावांनी पराभव करत नोबल प्रिंटिंग प्रेस आयोजित मर्यादित…

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिवा : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलिस ठाण्याचे ए. पी.आय वसंत खतेले, ए. पी.आय. अमोल कोळेकर आणि ए. पी.आय राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.