Category: ठाणे

Thane news

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा दुर्गंधीने उद्यानातील बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक त्रस्त कल्याण : २७ जानेवारी या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती असते. या दिवशी शिवसैनिक, त्यांचे नेते मंडळी व त्यांचावर प्रेम करणारे असंख्य नागरिक हे उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात. पण त्यांच्या नावाने असलेली उद्याने व इतर ठिकाणे यावर पाहिजे तितके लक्ष दिले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मॉडेल स्कुल जवळ असलेले धर्मवीर आनंद दिघे उद्यान २००२ साली तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उभारले होते. कालांतराने याचे दोनवेळा सुशोभीकरण हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या निधीतून करण्यात आले होते. परंतु केडीएमसी कडून याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने हे उद्यान नेहमी दुर्लक्षित राहिले आहे. आता तर या उद्यानात असणारा महापालिकेचा कंत्राटी सुरक्षारक्षक हा पण नसतो. त्यामुळे सकाळ/संध्याकाळी उघडे असणारे हे उद्यान फक्त सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेतच उघडे ठेवले जात आहे. सुरक्षारक्षक नसल्याने झाडांना पाणी मारले जात नाही. तसेच प्रेमियुगल जोड्या या उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने प्रेमीचाळे करीत असतात. महापालिकेच्या निवडणूक पूर्वी येथील शिवसेनेचे  इच्छुक उमेदवार अभिषेक चौधरी यांनी या उद्यानाची साफसफाई व खेळणी दुरुस्त करून घेतली होती. परंतु त्याना नगरसेवक पदाचे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने आता त्याची देखभाल/दुरुस्ती पाहण्यासाठी दुसऱ्या कोणालाही सवड मिळत नसल्याचे दिसत आहे. गेले काही दिवस या उद्यानाला लागून असलेल्या पावसाळी गटारातून ड्रेनेज सांडपाणी जमा झाल्याचे दिसत असून त्यात डासांची अंडी,पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत असल्याने उद्यानात येणारे बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. येथील ही गटारे एमआयडीसी ठेकेदाराकडून बांधण्यात येत असून तीही अर्धवट स्थितीत आहेत. गटारे बांधतांना येथील सांडपाणी वाहिन्या या फुटल्याने त्यातील सांडपाणी हे पावसाळी गटारात जमा झाले आहे. याबद्दल एमआयडीसी व केडीएमसी यांना स्थानिक रहिवाशी शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख सागर पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, मंदार स्वर्गे यांनी कळवूनही यावर प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. २७ जानेवारी या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होते. कमीतकमी या जयंती पूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे लक्ष देतील का ? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

 पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण

निवडणूक प्रक्रियेत घोळ पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण अनिल ठाणेकर ठाणे: नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत सदोष यंत्रणा वापरून मतदान प्रक्रियेत घोळ घातला आहे, असा आरोप करीत नव्याने निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी अपक्ष उमेदवार रवींद्र चांगो शिंदे हे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधून रवींद्र शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, हा पराभव सदोष प्रक्रियेतून झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. रवींद्र शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात झालेले मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही निवडणूक नियमबाह्य झाली असल्याने ही निवडणूक रद्द करून फेरमतदान घ्यावे. तसेच, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर आयोगाने कार्यवाही न केल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या उपोषणादरम्यान, असंविधानिक पॅनल पद्धती रद्द करावी, व्हीव्हीपॅट सुविधा सुरू करावी अथवा मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, जिथे बिनविरोध प्रक्रिया राबविली आहे; त्या ठिकाणी माघार घेणाऱ्यांची चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, असे रवींद्र शिंदे यांनी सांगितले.

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम कल्याण : कल्याण पूर्व येथील कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्येची देवी माँ सरस्वतीची पूजा-अर्चा श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. मिथिलाजन एज्युकेशनल सोशल अँड रिलिजियस ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कल्याणी दुर्गा माता मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन, सरस्वती पूजन, हवन तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. वसंत पंचमीच्या खास प्रसंगी मिथिलाजन ट्रस्टच्या माध्यमातून ज्ञानाची देवी माँ सरस्वतीची पूजा करण्यात आली तसेच शेकडो गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेची फी भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करण्यात आली. या उपक्रमाबाबत मिथिलाजन ट्रस्टचे अध्यक्ष संजीव मिश्रा यांनी सांगितले की, मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने दरवर्षी ट्रस्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी, सुमित झा, दीपक मिश्रा, केशरी पांडेय, आनंद झा आदींचे मोलाचे योगदान लाभले.

मिरा-भाईंदरचा कुस्तीपटू सूरज माने यांना राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक

मिरा-भाईंदरचा कुस्तीपटू सूरज माने यांना राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिरा – भाईंदर मिरा -भाईंदरचा प्रतिभावान कुस्तीगर सूरज माने याने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झालेल्या २० वर्षांखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राभरातील २० कुस्तगरांशी स्पर्धा करताना, मानेने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या श्री गणेश आखाड्याचे प्रतिनिधित्व करत आणि क्रांतीवीर जी.डी. बापू लाड मिशन ऑलिम्पिक कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या मानेने छत्रपती संभाजीनगरच्या रुपेश धनवतवर १२-२ अशा एकतर्फी विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोलापूरच्या विवेक भालेकरवर १२-१ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत सोहेल शेखला ११-४ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत, मानेने धाराशिवच्या हृषिकेश भोसलेवर ८-६ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत मानेचा सामना नाशिकच्या ऋत्विक सामोरेसोबत झाला. सामन्याच्या बहुतेक वेळेस आघाडीवर असूनही, मानेने शेवटच्या क्षणी काही महत्त्वाचे गुण गमावले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मानेचे हे पहिले राज्यस्तरीय पदक आहे. श्री गणेश आखाड्याचे मुख्य प्रशिक्षक वसंत पाटील यांनी त्याच्या भविष्यातील यशाबद्दल विश्वास व्यक्त केला. अभिनव कॉलेजमध्ये कला शाखेच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मानेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारला गेला. हा एकप्रकारे लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे.असा आरोप अपक्ष उमेदवार ॲड. विक्की पाटील यांनी रविवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला.याविरोधात आम्ही जनहीत याचिका दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. अशी माहिती ॲड. विक्की पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून  अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या ऍड.विक्की पाटील यांनी १० हजारहून अधिक मत घेतली होती.यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. याबाबत सविस्तर बोलण्यासाठी विक्की पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी बोलतांना विक्की पाटील म्हणाले की २०१० पासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्याने शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काम करत होतो.पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली. परिणामी प्रभाग क्रमांक ४ (अ )येथे मी इच्छुक असताना जागावाटपात ती जागा भाजपाच्या वाट्याला गेली. मात्र जनसेवेचा वसा मी घेतला असल्याने नागरिकांच्या सेवेकरिता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. माझ्याकडे प्रचारासाठी खूप कमी अवधी होता. त्यातही माझ्यामागे पक्षाचे कोणतेही पाठबळ नव्हते. तरीही मी सुरुवातीपासून दारोदारी जाऊन  प्रचार करण्यावर भर दिला. मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही मला प्रचारादरम्यान मिळत होता.माझ्या मतदारसंघात अनेक उच्चभ्रू सोसायटी ही येतात. पण या निवडणुकीत माझ्या मतदार संघातील अनेक उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेशच नाकारला जात होता. या येथे अनेक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचूच दिले गेले  नाही.याचा अनुभव मी माझ्या प्रचाराच्यावेळी स्वतः त घेतला आहे. आम्हाला प्रचारादरम्यान सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रोखले जात होते. हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे.असा आरोप विक्की  पाटील यांनी यावेळी बोलतांना केला.ही पद्धत लोकशाहीला घातक अशी आहे. हे रोखण्यासाठी  यासंदर्भात लवकरच आपण एक जनहित याचिका  न्यायालयात  दाखल करण्याचा   विचार सुरू केला आहे. अशी माहिती ऍड.विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.तसेच माझा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी यापुढे मी एस. के. पाटील या माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे. असे ही विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण नवी मुंबई : भारत निवडणूक आयोग यांचेमार्फत प्राप्त निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक शपथ २३ जानेवारी रोजी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ग्रहण केली. नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी सुव्यवस्थित रितीने पार पडलेली आहे व ५७.१५ टक्के नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदविलेला आहे. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणारा भारत देश १०० कोटी मतदार नोंदणीकडे वाटचाल करत असून यावर्षीच्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची ‘My India, My Vote’ ही संकल्पना घोषित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने देशातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, सहा.आयुक्त अरुण पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक सुरेश वांदिले आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते. ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’ – अशा आशयाची सामुहिक शपथ उपस्थितांनी ग्रहण केली.

नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात

नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांची माहिती अनिल ठाणेकर ठाणे : येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ठाण्यात होणाऱ्या संचलनात नागरी संरक्षण दलाचा (सिव्हिल…

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते या सर्व पदांवर भाजपचा दावा – संदिप लेले

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते या सर्व पदांवर भाजपचा दावा – संदिप लेले शिवसेनेने भाजपचा यथोचित सन्मान ठेवावा – आमदार निरंजन डावखरे अनिल ठाणेकर ठाणे : ठामपात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपकडेच राहावीत, यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे, असे जाहीर उद्गार ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी काढले. तर सत्तेतील मित्रपक्षाने( शिवसेनेने) यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, असे मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. ठाणे वर्तकनगर येथील भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते.या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या २७ जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. तसेच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावे, भाजप पक्षामध्ये देखील अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत. सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचासुद्धा विचार मित्रपक्षाने करावा, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत हरवलेल्या मतिमंद बालकाचा पालकांशी यशस्वी पुनर्मिलाप

‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत हरवलेल्या मतिमंद बालकाचा पालकांशी यशस्वी पुनर्मिलाप ठाणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU) यांनी “मुस्कान ऑपरेशन” दरम्यान हरवलेल्या एका मतिमंद विशेष बालकाचा यशस्वी शोध घेऊन त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द केले आहे.सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव,सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे (शोध–२) यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU), ठाणे येथील म.पो.उपनि. शिंदे व मपोशि ७०२२ / यादव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. १९ जानेवारी रोजी सुमारे १७ वर्षांचा मुलगा हा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे विना पालक आढळून आला होता. त्यानंतर त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात दाखल करण्यात आले होते. ९ जानेवारी रोजी पोलीस हवालदार तानाजी गायकवाड यांनी बालगृहास भेट दिली असता सदर बालकाबाबत सविस्तर माहिती प्राप्त झाली.सदर बालक मतिमंद असल्याने तो नीट बोलू शकत नव्हता. मात्र, त्याच्याकडून मिळालेल्या मर्यादित माहितीतून – वडिलांचे नाव आलमगीर, नमाजची ओळख व मुंब्रा परिसराचा अंदाज – CPU पथकाने शोधकार्य सुरु केले. मुंब्रा व शिळ–डायघर पोलीस ठाण्यात तपास केला असता कोणतीही तक्रार नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर स्थानिक मशिदींचे मौलवी, धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शाळांचे व्हॉट्सॲप गट तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून बालकाचा फोटो व माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे प्राप्त माहितीनुसार २३ जानेवारीला बालकाची आई मोहीबोनीसा यांनी CPU, ठाणे येथे संपर्क साधला. त्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे मुलाची ओळख मोहम्मद इमरान आलमगीर अशी पटवून दिली. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे बालकानेही आपल्या आईस ओळखले.त्यानंतर सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेव्हिड ससून बालगृह, माटुंगा येथे बालकास बालकल्याण समिती (CWC), मुंबई समोर सादर करण्यात आले व समितीच्या आदेशानुसार त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.ठाणे पोलीस आयुक्तालय नागरिकांना आवाहन करते की, कोणतेही हरवलेले किंवा बेवारस बालक आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क करावा.

बाळासाहेबांची स्वप्ने मोदींनी पूर्ण केली – एकनाथ शिंदे

मुंबई :  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात  महापालिका निवडणुकांमध्ये भाजपानंतर शिवसेना (शिंदेगट) हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय, “चांदा ते बांदा शिवसेना घराघरात पोहोचली आहे. शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे आपण…