Category: ठाणे

Thane news

ठाण्यात डिजिटल क्रांतीची सुरुवात..शिक्षण व प्रशासनाला मिळणार नवे बळ

ठाण्यात डिजिटल क्रांतीची सुरुवात..शिक्षण व प्रशासनाला मिळणार नवे बळ (सिद्धेश शिगवण) ठाणे : वर्तकनगर, ठाणे येथील भाजप कार्यालयात आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये,…

ज्युपिटर हॉस्पिटल कडून डोंबिवलीत ५०० खाटांचे बहुविशेषज्ञ रुग्णालय सुरू

ज्युपिटर हॉस्पिटल कडून डोंबिवलीत ५०० खाटांचे बहुविशेषज्ञ रुग्णालय सुरू आरती परब डोंबिवली : ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे डोंबिवली येथे ५०० खाटांचे अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालय रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज झाले…

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’आंतरराष्ट्रीय व्यावसाय परिषदेत डॉ.सुनील खर्डीकर सन्मानित

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’आंतरराष्ट्रीय व्यावसाय परिषदेत डॉ.सुनील खर्डीकर सन्मानित कल्याण : विदर्भाला जागतिक गुंतवणुकीचा ‘हब’ बनवण्याच्या उद्देशाने आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. केंद्रीय…

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान–रामशेठ ठाकूर

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान–रामशेठ ठाकूर पनवेल : मातीतल्या खेळांपैकी एक असलेल्या कबड्डी खेळाचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे खेळाचे मोठे नुकसान झाले आहे, असे भावूक प्रतिपादन माजी…

केडीएमसीच्या त्या नॉट रीचेबल नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी

केडीएमसीच्या त्या नॉट रीचेबल नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर रंगलेलं राजकीय नाट्य आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलं आहे. निवडणूक निकालापासून नॉट रिचेबल असलेले शिवसेना…

 ठाणे शहराचे नाव लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

ठाणे शहराचे नाव लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ७ वर्षीय ठाणेकर जलतरणपटू रेयांश खामकरची लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ठाणेकरांसाठी अभ‍िमानाची बाब – महापौर शर्मिला पिंपळोलकर ठाणे, दि. १३…

पान दिवड सापाला मिळाले जीवदान

पान दिवड सापाला मिळाले जीवदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर, पाणबुडी नगर येथे निर्माणधीन चाळीच्या मागील भागात पान दिवड जातीचा साप भक्ष्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र…

 अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची मागणी

अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाचे केडीएमसी महापौरांना पत्र कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची, स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत आई एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेटून पत्र दिले आहे. गेल्या ६ ते ७ वर्षापासून अडिवली परिसरातील ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, येथील रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त व शहरअभियंता तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आई एकविरा महिला मंडळ वारंवार पत्राद्वारे पाठपुरवा करित आहे. मंडळाच्या वतीने पाठपुरावा करीत असताना वारंवार आयुक्त व शहर अभियंता यांच्याकडून निधीची कमतरता असल्याचे त्यांच्याकडून उत्तर येत असून ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, अडिवली येथील रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. मंडळाच्या वतीने दोन वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर निषेध व श्राध्द आंदोलन केले आहे. त्यामुळे या विभागाची पाहणी करुन तातडीने रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास अनिल ठाणेकर ठाणे : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे.  भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी ‘तणावमुक्ती आण‍ि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या महत्वपूर्ण विषयावर केले. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्यावतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी  यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी (१२ फेब्रुवारी) डॉ. काश‍िनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दिपक झिंजाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर,आुयक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात करण्यात आला.आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो  विद्यार्थी असो, गृहिणी असो की, नोकरदार वर्ग असो, प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचे नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येत असतात, त्यामुळे तणाव  निर्माण होत असतो, दोष व्यवस्थेचा नसतो तर आपण कशा पध्दतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे, तणावमुक्ती का आवश्यक आहे.संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे यासाठी इस्कॉनने ठाणे महापालिकेच्या अध‍िकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर आहे. “आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतो; पण परिणाम आपल्या हातात नसतो. आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात, परिणामावर नियंत्रण नसते, ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे,” असे गौरांग दास यांनी नमूद केले.जीवनातील स्पर्धा, बढती, यश-अपयश यामुळे निर्माण होणारा ताण वाढतो, अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनावर ताण वाढतो आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर होतात, असे सांगून भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.  सन्मान, सेवा आणि सामूहिक शक्तीचा स्वीकार हे तणावमुक्त जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. “आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे, ही जाणीव ठेवून नम्रता आणि सेवा वृत्ती स्वीकारली तर मन शांत राहते,” असे मार्गदर्शन करण्यात आले. ‘चिंता सोडा आणि जगायला शिका’  (‘Stop Worrying and Start Living’ ) हा मंत्र दिला. बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी, आपल्या जाणीवा आणि विचारांवर आपण ताबा मिळवू शकतो असे गौरांग दास यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने इस्कॉनच्या सहकार्याने अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

 रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव

रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव कल्याण : सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा मुंबई विद्यापीठातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरांच्या यशस्वी आयोजनाबरोबरच जनजागृतीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही दखल आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे ओएसडी प्रा.सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. एस.एस.टी. महाविद्यालयाने रक्तदान शिबिरांसाठी व्यापक जनजागृती करत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रत्यक्ष शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी सांगितले की, एस.एस.टी. महाविद्यालय सामाजिक जबाबदारी जपत रक्तदानाबरोबरच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बालके, समाजातील उपेक्षित घटक आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजासाठी कटिबद्ध राहण्याचा महाविद्यालयाचा निर्धार आहे.