दिव्यांग चेतन पाशिलकरला दिल्लीमधील राष्ट्रीय अबीलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक
2027 ला फिनलँडमधील 11 व्या आलिम्पिक चित्रकला स्पर्धेतही निवड ठाणे ः ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. चेतन पाशिलकर यांची फिनलँड येथे 2027 साली होणार्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेसाठी पुन्हा निवड झाली आहे. (चेतन पाशिलकर यांनी मार्च 2023 साली फ्रान्स, मध्ये झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत पेंटिंग मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.) दिव्यांग चेतन पाशिलकर हे शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात पारंगत असून 2018 सालीही त्यांनी राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.. वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रादेशिक चित्रकला स्पर्धेतही सुवर्णपदके मिळविली होते.चेतन पाशिलकर हे आपल्या पत्नी आणि लहान मुलगा सह ठाणे शहरातील हायल्यांड रेसिडेन्सी मध्ये वास्तव्यास असून ते दिव्यांग तसेच सामान्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरेही घेतात. नुकतेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल Abilimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे त्यांच्या यशामुळेच 2027 या वर्षात फिनलॅण्ंडमध्ये होणार्या अकराव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत त्यांची पुन्हा निवड झाली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित 33 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात. 2024 यावर्षी जानेवारी महिन्यात गोवा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर चेतन पाशीलकर यांनी नुकत्याच ( डिसेंबर महिन्यात) दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय abylimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. चेतन पाशीलकर हे मुख आणि कर्णबधिर असून देखील ते स्वतः लहान मुलांना पेंटिंगचे ज्ञान देत आहेत. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त करूनही शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली न गेल्याची खंत ते व्यक्त करतात. क्रीडा क्षेत्रात प्रविण्या मिळणाऱ्या स्पर्धकाला अनेक बक्षिसे आणि मानधन मिळतात, मात्र चेतन पाशिलकर सारख्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेत्या चित्रकाराचा सामाजिक संस्था व राजकीय मानकऱ्यांना त्याचा विसर पडतो. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेता चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात येत नाही हे त्या गरीब चित्रकारांचे दुर्दैवच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांचे पालक आणि आपत्येष्ठ चेतन पाशिलकर यांच्या कलेसाठी मेहनत घेत आहेत. चेतन पाशीलकरांसारखे असंख्य दिव्यांग कलाकार आर्थिक कणा मोडल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांना मुकतात अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असते. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सुधागड तालुक्यातील पाली जवळील तळई या डोंगर वस्तीत वसलेल्या गावातील चेतन पाशिलकर या मूकबधिर आंतरराष्ट्रीय सुवर्णं पदक विजेत्या चित्रकाराला मदतीचा हात दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील abylimpic दर्जाच्या चित्रकला स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करून देशाचे नाव इतिहासात कोरण्याची किमया त्यांच्याकडून होऊ शकते. कारण दिव्यांगांच्या या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी चेतन पाशिलकर यांच्याच नावावर आहे. ००००