Category: ठाणे

Thane news

दिवा शिवसेना युवतीसेनेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

दिवा : शिवसेना दिवा युवतीसेना आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात कल पार पडला. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही विद्यार्थी व पालकांनी…

पाऊस पडल्यानंतर गाळ काढण्यात ठामपा प्रशासन दंग -राहूल पिंगळे

ठाणे: नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे, असे मत ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल…

काश्मीरमधील लोकांसाठी शिवसेना कटिबद्ध

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही कल्याण :  शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. काश्मीरमधील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. लडाखमधील द्रास जिल्हा रुग्णालयाला शिवसेनेने उपलब्ध केलेली सीटी स्कॅन मशीन व रुग्णवाहिका खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना राज्य संघटक आनंद परांजपे, बाजीराव चव्हाण, नितीन राठोड, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नाहर, लडाखचे खासदार हाजी मोहम्मद हनीफा, डॉ. मोहम्मद जाफर, अब्दुल वाहिद तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मागील काही वर्षांत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कश्मीरमधील मैत्री वृद्धींगत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कारगील युद्ध स्मारकासाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला. आता वर्षभरात द्रासमधील जिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिका आणि सीटी स्कॅन मशीन देण्यात आली. शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, देशात कुठेही नैसर्गिक संकट आले तर शिंदे साहेब स्वत: तिथे पोहोचतात. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे साहेब स्वत: काश्मीरला आले. इथे अडकून पडलेल्या शेकडो महाराष्ट्रीय पर्यटकांना विमानाने पुन्हा राज्यात सुरक्षितपणे नेण्याचे काम त्यांनी केले होते. याच हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना शहिद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या कुटुंबियांना शिवसेनेने घर बांधून दिले. शिवसेना केवळ मतांसाठी नाही तर माणसुकीच्या नात्याने काम करते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काश्मीरमधील लोकांना जे जे आवश्यक असेल त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. सीमेवर काम करणाऱ्या भारतीय जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण वाखणण्याजोगे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कर्तव्यावर असताना सहा सहा महिने जवान कुटुबियांना भेटत नाही, देशासाठी जवानांचे सर्वोच्च समर्पण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि लष्कराच्या हातात देश सुरक्षित आहे, असे ते म्हणाले. सरहद संस्थेने कश्मीरमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांचे खासदार डॉ. शिंदे यांनी कौतुक केले. लडाखमधील द्रास येथे सरहद फाउंडेशन आणि भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या सरहद शौर्यथॉनचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सरहद शौर्यथॉनमध्ये जवळपास तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर खासदार खासदार डॉ. शिंदे यांनी कारगीलमधील युद्ध स्मारक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. 0000

नवी मुंबईतील “ मधुर गंधार “ संगीत वर्गाचा वर्धापन दिन सोहळा

नवी मुंबई : येथील “मधुर गंधार”  या  संगीत वर्गाचा  तृतीय “वर्धापन दिन”  सानपाडा येथील सेक्टर ८ मधील गुडविल युनिटी सभागृहात ४  जुलै रोजी मराठी व हिंदी गीतांच्या मधुर आवाजात मोठ्या उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती…

 दिव्याच्या साबेगावातील दत्त निवारा सोसायटीत जिना कोसळला

अग्निशमन दलाची तत्परता, पाच रहिवासी सुरक्षित दिवा, दि. ५ जुलै : दिव्यातील साबेगाव परिसरात असलेल्या दत्त निवारा सोसायटीच्या जिन्याचा स्लॅब रविवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाच रहिवाशांची सुखरूप सुटका केली. शीळ अग्निशमन केंद्राला दुपारी १२.५२ वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान एक फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. ही घटना साबेगाव येथील वैभव धाब्याच्या मागे असलेल्या दोन मजली दत्त निवारा सोसायटीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्या प्रदीप मालुसरे (५०), प्राजक्ता मालुसरे (४२), चेतन मालुसरे (२१), गणेश राणे (४८) आणि आरोशी कुमडेकर (१४) या पाच रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली. 000000000

शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी १० ऑगस्टला देशव्यापी ‘जेल भरो’ आंदोलन

डॉ. अशोक ढवळे यांची घोषणा अनिल ठाणेकर ठाणे, शेतकरी, कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांवर १० ऑगस्ट रोजी देशभर प्रत्येक जिल्हा स्तरावर होत असलेले जेल भरो आंदोलन श्रमिकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संघर्ष ठरणार आहे. १० ऑगस्टच्या या लढ्यात संपूर्ण ताकदीने सामील होण्याचे आवाहन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्थीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी केले आहे. अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे २८ व २९ जून रोजी संपन्न झाली. सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात तीव्र झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची दोन दिवस सखोल चर्चा केल्यानंतर किसान सभेने हे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी शेतकऱ्यांचा देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक दिली आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, वाढता उत्पादन खर्च, पीक विमा, जमीन अधिग्रहण, खतांची कमतरता, फसव्या कर्जमाफी योजना, अन्न महामंडळाचे महत्व संपवण्याचे कारस्थान, ऊस दर, भारत अमेरिका, भारत युरोप, व भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे भारतीय शेतीवरील दुष्परिणाम इत्यादी प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या व श्रमिकांच्या इतर प्रश्नांवर देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक देण्यात आली. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर इतर शेतकरी संघटनांना एकत्र करत शेतकरी संघटनांची देशव्यापी एकजूट मजबूत करण्याची आवश्यकता आहे. २८ जुलै रोजी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व संघर्ष तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत घेण्यात येणार असून यात किसान सभा सहभागी होऊन आपले योगदान देईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शेतकरी एकजुटीला श्रमिक एकजुटीत परिवर्तित करून सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार संघटनांची २९ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवर होत असलेली संघर्ष परिषद यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. किसान सभेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची हाक यावेळी देण्यात आली.१५ नोव्हेंबर रोजी हुतात्मा बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभेचे ध्वजारोहण करून देशातील हजारो गावांत शेतकरी प्रश्नांवर सभा, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ नोव्हेंबर २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे होत असून याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकरी आंदोलनाला आणखी चालना मिळेल असा विश्वास देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. ००००००

एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर – डॉ..संजय मं.गो. 

ठाणे- दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र – मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ…

केडीएमसी व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने किन्नर महोत्सव संपन्न

शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा – महापौर ॲड. हर्षाली चौधरी कल्याण : शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या किन्नर महोत्सव २०२६ या कार्यक्रमात  बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते. किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त यांनी आपल्या भाषणात काढले.  या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे  आभार मानले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली.

श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न

ठाणे : प्रती वर्षीप्रमाणे यंदाही श्री माँ विद्यालयाच्या वतीने आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही ‘योग’ स्पर्धा शनिवार  २७ जूनला सकाळी ८.३० ते दुपारी १ या…

फुगाळे येथील २५ ते ३० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार

अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे. गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.