Category: ठाणे

Thane news

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा ठाणे : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून  निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल!

ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल! ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ३९ पैकी २८ जागा पटकावुन एकीकडे ७५ टक्के इतका स्ट्राईक रेट राखला असताना दुसरीकडे या २८ विजेत्यांमधील नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी यांनी ७१.५६ टक्के मते घेऊन त्या भाजपमध्ये अव्वल विजेत्या ठरल्या आहेत. मतदार राजाने प्रतिभा मढवी ह्यांना विक्रमी मतदान करून डॉ.राजेश मढवी फौंडेशनच्या माध्यमातून नौपाडा प्रभागात गेली अनेक वर्ष केलेल्या समाजकारणाची पावतीच एक प्रकारे दिल्याचे दिसुन येत आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीमध्ये असलेल्या भाजपने २८ जागांवर निर्विवाद विजय मिळवुन घवघवीत यश संपादीत केले. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या, त्यामध्ये ५ जागांची भर पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनसेवक आमदार संजय केळकर, ठाणे निवडणुक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन शक्तीच्या जोरावर ओवळा ते शिळ अशा प्रत्येक विधानसभेत भाजपने कमळ फुलवले आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या ह्या २८ नगरसेवकांपैकी नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मधील भाजप उमेदवार प्रतिभा मढवी यांनी, विजयाची पुनरावृत्ती करताना प्रभाग २१ मधून झालेल्या २५ हजार ७७ इतक्या मतदानापैकी तब्बल १७ हजार ९४५ असे ७१.५६ टक्के विक्रमी मतदान मिळवले आहे. प्रतिभा मढवी ह्या भाजपचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या पत्नी असुन गेली अनेक वर्षे हे दांपत्य पक्षभेद विसरून प्रभागातील नागरिकांची अविरत सेवा करीत आहे. एक प्रकारे मढवी दांपत्याच्या समाजकार्याची पोचपावती मतदारांनी दिल्याचे दिसुन आले आहे. चौकट महायुतीचे वीर दौडले ‘सात’ भाजप – शिवसेना महायुतीने ठाण्यात लढवलेल्या एकुण १३१ जागांमध्ये युतीचे तब्बल सात ‘वीर’ तुफान दौडले आहेत. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास या १३१ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक पसंतीचे हक्कदार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १७ ड चे योगेश जानकर ठरले असुन त्यांना ७६.४६ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल प्रभाग १६ अ मधील सेनेच्याच डॉ. दर्शना जानकर यांना ७२.३३ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल भाजपच्या प्रतिभा मढवी यांना ७१.५६ टक्के, संजय वाघुलेंना ७०.७३, सेनेच्या मंदार केणीना ७०.७१, संध्या मोरे ७०.६१ आणि जयश्री डेव्हीड यांना ७०.५९ टक्के इतके मतदान झाल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी अनिल ठाणेकर ठाणे : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व गावपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे…

नवी मुंबईत मनसेचे परप्रांतियाला खळखट्ट्याक

नवी मुंबईत मनसेचे परप्रांतियाला खळखट्ट्याक  नवी मुंबई :  नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्ट्याक करीत त्याला चांगलाच दिला चोप दिला आहे. कोपरखैरणे इथं ही घटना घडली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चांगलचा चोप दिला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.

हिंतेंद्र ठाकूरांनी वचपा काढला वसई-विरार मनपा जिंकली

विरार :- विधानसभेत भाजपाकडून पत्कराव्या लागलेल्या नामुष्कीजनक पराभवाचा वचपा हितेंद्र ठाकूरांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूकीत काढला.बहुजन विकास आघाडीने एकूण ११५ जागांपैकी ७१ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता काबीज केली. भाजपाने ४३ जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. उर्वरित पक्षांना एकही जागा मिळालेली नाही.  या विजयासह वसई–विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड यशस्वीपणे राखत पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध केली आहे. अनेक प्रभागांमध्ये चारच्या पॅनलने विजय मिळवत बविआने वर्चस्व प्रस्थापित केले.  या निकालामुळे वसई–विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर बविआचा ठसा अधिक ठळकपणे दिसणार आहे.

सी. के. टी. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘बायोटोपिया २०२६:

सी. के. टी. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘बायोटोपिया २०२६: नवी मुंबई:  रामशेठ ठाकूर यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून (अमृत महोत्सवी वर्षानिमित्त) चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पनवेल (अधिकारप्रदत्त …

अरबी समुद्रात थरारक पाठलाग पाकची ‘अल मदीना’ बोट ताब्यात

पाकिस्तानच्या ९ जणांना अटक कोस्ट गार्डची धडक कारवाई  भारतीय सागरी हद्दीत घुसखोरीचा संशय पोरबंदर : मुंबईत एन निवडणूकीची धामधूम सुरु असतानाचा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून काही शेकडो मैल अंतरावर अरबी समुद्रात कोस्ट…

शक्तीस्थळावर नतमस्तक…

शक्तीस्थळावर नतमस्तक… मुंबई ठाण्यासह राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शक्तीस्थळ येथे उपस्थित राहून नतमस्तक…

डहाणूच्या शाळेत पोषण आहाराला फाटा शिक्षकाने केले थेट तांदळाचे वाटप

डहाणूच्या शाळेत पोषण आहाराला फाटा शिक्षकाने केले थेट तांदळाचे वाटप प्रमुख शिक्षक शेलार यांची चौकशी होणार शालेय व्यवस्थापन समिती आणि वरिष्ठही अंधारात योगेश चांदेकर पालघरः जिल्हा परिषद  शाळातील मुलांना शालेय पोषण…

 यंगिस्तान फाउंडेशनतर्फे ‘प्राइड ऑफ यंग हिंदुस्तान’ अवॉर्ड संपन्न

यंगिस्तान फाउंडेशनतर्फे ‘प्राइड ऑफ यंग हिंदुस्तान’ अवॉर्ड संपन्न देशभरातून निवडलेल्या १५ युवा समाजसेवकांना सन्मान, प्रेरणा व ओळखीचे व्यासपीठ कल्याण: कल्याण उल्हासनगर अंबरनाथ परिसरात कार्यरत असलेल्या यंगिस्तान फाउंडेशन या सामाजिक संस्थेने…