Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

आठ दिवसांत अहवाल सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे

माझगाव ताडवाडीतील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी २१ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे मुंबई: माझगाव ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका, विकासक व सर्व संबंधित अधिकाऱ्यांची महानगरपालिका…

कॅथेटर-आधारित उपचाराने २० वर्षीय तरुणाचा जीव वाचला

  मिरा – भाईंदर वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे डॉक्टरांच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे आणि प्रगत कॅथेटर-आधारित उपचारामुळे २० वर्षीय तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले. योग्य वेळी अचूक निदान आणि…

ठाण्याच्या मालवणी महोत्सवातील नृत्य स्पर्धेत बालगोपाळांची भन्नाट अदाकारी

    अनिल ठाणेकर ठाणे, मालवणी चवीचा सुगंध, पारंपरिक वेशभूषेची रंगत आणि लहानग्यांच्या टपोऱ्या डोळ्यांतला आत्मविश्वास, अशा जल्लोषी वातावरणात ठाण्यातील मालवणी महोत्सवात रविवारी रंगलेल्या स्थानिक बालगोपाळांच्या नृत्य स्पर्धा अक्षरशः डोळ्यांचं…

दिलीप सुखटनकर व मिलिंद पूर्णपात्रे यांना राज्य उपविजेतेपद

  योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा   मुंबई: योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच बॉम्बे जिमखाना येथे उत्साहात पार पडली. या…

वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाण्यातील…

दादर दणाणलं, खो-खोचा जंगी महायुद्ध सुरू!

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धा पुरुष गटात पश्चिम रेल्वे वि बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया वि महाराष्ट्र पोष्ट; महिला गटात थरारक साखळी सामने मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार…

वडाळा येथे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा महिला व पुरुष संघ होणार सहभागी

मुंबई, दि. (प्रतिनिधी): येत्या शनिवार २१ व रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे महिला व पुरुष क्लासिक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगेश गुंड,…

ठामपाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा – २०२६

ठामपाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा – २०२६ अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, ठामपा व खाजगी शाळांना सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, लोकसहभाग वाढविणे तसेच नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धा दोन टप्प्यांत होणार असून प्रथम टप्प्यासाठी २५ मार्च २०२६ पर्यंत तर द्वितीय टप्प्यासाठी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत माहिती ऑनलाईन सादर करावी लागणार आहे. स्पर्धेचा निकाल ७ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेत चार गटांचा समावेश असून स्वयंसेवी संस्थांसाठी महापालिका स्तरावर, महाविद्यालयांसाठी परिमंडळ स्तरावर तर ठामपा व खाजगी शाळांसाठी प्रभाग समिती स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना रील/डॉक्युमेंटरी निर्मिती व हरित शपथ या दोन्ही प्रकारांत सहभाग बंधनकारक असून प्रत्येक टप्प्यात किमान पाच विषयांवरील व्हिडिओ सादर करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमधून किमान १० टक्के किंवा २०० ‘पर्यावरण दूत’ निवडून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत. शाळांनी किमान एक ते पाच जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचे जीओ-टॅग छायाचित्रे व सोशल मीडिया लिंक सादर करणे आवश्यक राहणार आहे. हरित शपथ नोंदणी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार असून ULB मध्ये “Thane Municipal Corporation” निवडणे बंधनकारक आहे. शपथेनुसार कृती पूर्ण केल्यास स्वतंत्र गुण दिले जाणार आहेत. तसेच स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. स्वयंसेवी संस्थांसाठी प्रथम क्रमांकाचे रु. १ लाख, द्वितीय रु. ७५ हजार व तृतीय रु. ५० हजार तर उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाविद्यालये व शाळांसाठीही विविध स्तरांवर रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. सहभागी संस्था/आस्थापनांनी दोन्ही टप्प्यांत स्वतंत्र माहिती ऑनलाईन सादर करणे आवश्यक असून गुणांकन स्वमूल्यांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम गुण निश्चित केले जातील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी www.thanecity.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा pcctmc.ho@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला कल्याण: मुलुंडमध्ये मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाचा एक स्लॅब कोसळला, ज्यामुळे घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामधन यादव यांना मदत मिळवून देण्यासाठी रविवारी आर. एन. यादव यांच्यासह संपूर्ण यादव समुदायाचे सदस्य दिवसभर जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईच्या मागणीबाबत लेखी आश्वासन मागत राहिले, परंतु एमएमआरडीए किंवा उपकंत्राटदाराचा कोणताही अधिकारी प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नव्हता. अखेर, दुपारी ४ वाजता, समुदायाच्या एका वरिष्ठ सदस्याने निर्णय घेतला की जर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठोस निकाल लागला नाही तर त्यांना रस्त्यावर उतरून निषेध करण्यास भाग पाडले जाईल. ही माहिती माध्यमांना आणि पोलिस ठाण्याला मिळाल्यावर, एक अधिकारी पीडितेच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री १० वाजेपर्यंत निकाल लागला, परंतु रात्री धनादेशावर स्वाक्षरी न झाल्यामुळे, अधिकारी लेखी आश्वासन देऊन निघून गेले. रात्री धनादेश न मिळाल्याने, कुटुंब रुग्णालयातून मृतदेह घेऊ शकले नाही. आज सोमवारी धनादेश मिळाला आणि मृतदेह घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शंशिकांत यादव, ईश्वर देव यादव, पारस यादव, मोतीलाल यादव, राम यादव, जितेंद्र यादव, कमलेश यादव, आर.डी. यादव, राम झलक यादव, पप्पू यादव, जयसिंग यादव, कीर्ती यादव, रमेश यादव, सुरेश यादव, सुनील यादव, ईश्वर देव यादव आणि पारस यादव यांच्यासह सुमारे २०० समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांचे आर.एन. यादव यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की पीडितेला न्याय समुदायाच्या एकजुटीमुळे मिळाला.

टिटवाळ्यात रेल्वेच्या कारवाईत १९ बेकायदेशीर बांधकामे पाडली

टिटवाळ्यात रेल्वेच्या कारवाईत १९ बेकायदेशीर बांधकामे पाडली कल्याण: टिटवाळा परिसरातील रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर आज रेल्वे प्रशासनाने निर्णायक कारवाई करत १९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सकाळपासून सुरू झालेल्या या धडक तोडक मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मध्य रेल्वेच्या भूमी व्यवस्थापन विभागाच्या सूचनेनुसार अप लाईनजवळील कि.मी. ६३/५-१८ परिसरातील रेल्वे मालकीच्या जागेवर उभारलेली कच्ची-पक्की दुकाने आणि काही निवासी बांधकामांचे भाग अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधितांना यापूर्वी लेखी नोटिसा देऊन ठराविक मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने थेट पाडकामाची कारवाई हाती घेतली. कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस दल यांच्या समन्वयातून ही मोहीम सुरळीत पार पडली. मधुबन सोसायटीसमोरील रेल्वे पावर हाऊसजवळील रस्त्यालगतचा भाग असल्याने पाडकामाची कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी रहिवाशांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या; मात्र प्रशासनाने संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि कारवाई कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण केली. रेल्वे मार्गांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी  सूत्रांनी  स्पष्ट केले. या कारवाईनंतर रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला असून, पुढील काळात अशा प्रकारांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. टिटवाळ्यातील या मोहिमेमुळे रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचा निर्धार अधोरेखित झाला आहे.