Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी नाशिक :  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरविरुध्द झुंज देत असताना नाशिकच्या संघाने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिला सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  योगेश राऊत ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. दुसऱ्या सामन्यात यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  संदीप चौधरी ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. तिसऱ्या सामन्यात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात  पुष्कर तऱ्हाळ ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत साखळी फेरीतील अजेय घोडदौड नंतर आरोग्य विद्यापीठाचा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द झाला. नाशिकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. कोल्हापूरच्या संघाने हे लक्ष्य १९.५ षटकांत ८ बाद १५८ धावा करत गाठले. केवळ २ गडयांनी विजय मिळवत कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यापीठाच्या संघातील  पुष्कर तऱ्हाळ यांना मालिकेतील ’सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील येशात गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे.  पुष्कर तऱ्हाळ यांनी आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील ’बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट’ (सर्वोत्तम गोलंदाज) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात संघव्यवस्थापक राजेश पाटील व कर्णधार योगेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर तऱ्हाळ, संदीप चौधरी, पवन गोलवाल, राजेंद्र दिवे, प्रविण जगताप, महेंद्रनाथ चौधरी, नंदकिशोर ठाकरे, नंदकिशोर वाघ, विजय कुरकुरे, संतोष जढाळ, बबन कांगणे, सचिन शिराळ, मुकुंद मुळे आदी खेळाडू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.

 डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येयवेडा तरुण

डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येयवेडा तरुण विशाख कृष्ण स्वामी सलग ३७० दिवस दररोज ४२ किलोमीटर धावण्याचा करणार रेकॉर्ड कल्याण : डोंबिवलीतील विशाख कृष्ण स्वामी हा धावपटू आता पर्यन्त धावण्याचे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. यावेळेस तो दररोज तो ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावून जागतिक रेकॉर्ड पार करणार आहे. विशाख कृष्णस्वामी हा एक सामान्य डोंबिवलीकर असून त्याला धावण्याचे वेड आहे. आता पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अनेक रेकॉर्ड केलेत. मात्र आता त्याला यावेळेस एक मोठा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. तो दररोज ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावणार आहे.  ६३ दिवस झाले असून वर्ल्ड रेकॉर्ड मुळे तो महाराष्ट्राचे आणि डोंबिवली चे नाव जगात मोठं करणार आहे ही त्याची जिद्द आहे. विशाख कृष्ण स्वामी हा एका सामान्य कुटुंबातला आहे. त्याला लहानपणापासून खेळाची जास्त आवड असल्यामुळे आता डोंबिवलीकर त्याला सपोर्ट करत आहेत.

ममता परदेशी यांचा ऐतिहासिक सायकलिंग जागतिक विक्रम

ममता परदेशी यांचा ऐतिहासिक सायकलिंग जागतिक विक्रम कल्याण : आदी कैलास व ओम पर्वत या अतिदुर्गम आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या स्थळांपर्यंत पहिली महिला सोलो सेल्फ सपोर्ट सायकल मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण करून डोंबिवलीच्या ममता परदेशी यांनी ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ही मोहिम २३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डकडून या विक्रमाची अधिकृत नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने डोंबिवली येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित सुसंस्कार क्लासेसच्या कार्यक्रमात ममता परदेशी यांना सन्मानित करण्यात आले. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे सीईओ दिनेश गुप्ता यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सायकलिंग मोहिमेत ममता परदेशी यांनी अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, उंच पर्वतीय मार्ग, बदलते हवामान आणि दीर्घ अंतरांचा सामना करत ही कामगिरी यशस्वी केली. त्यांच्या या विक्रमामुळे महिला सायकलिंग, साहसी क्रीडा तसेच प्रेरणादायी सामाजिक उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सुसंस्कार क्लासेसचे पदाधिकारी, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सायकलिंगप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ विषयावर जळजळीत लेखन स्पर्धा

‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ विषयावर जळजळीत लेखन स्पर्धा कल्याण : सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक विचारप्रवर्तक आणि जळजळीत लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘साहित्यिक म्हणजे कोण रे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद – विश्वनाथ पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद – विश्वनाथ पाटील अविनाश उबाळे ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा झालेला विमान अपघातातील मृत्यू हा मला संशयास्पद वाटत आहे.या अपघाताची पारदर्शकपणे सरकारने…

परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू

परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू आरती परब दिवा : बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक अनिल ठाणेकर ठाणे : शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता अनिल महाडिक यांनी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुखांकडे केली आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार , जिल्हा परिषद, कामगार उपायुक्त, धर्मदाय  सहाय्यक आयुक्त,  रेशनिंग कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन महानगरपालिका  कार्यालय ,व सर्व प्रभाग समिती, सार्वजनिक हॉस्पिटल ,जिल्हा/ ठाणे शहर सहकारी संस्था निबंधक* आपणास सविनय अर्ज सादर करतो की, महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ फेब्रुवारीला विशेष शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदींनुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने आपल्या कार्यालयात खालील बाबींची तातडीने पूर्तता व्हावी, शासनाचा हा निर्णय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी, आपल्या स्तरावरून या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून तशी सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, असे. अभिप्राय पेटीची स्थापना: कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी. शासन निर्णयासोबत जोडलेले अभिप्राय प्रारूप पेटीच्या शेजारी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांना गुणांकण देणे सुलभ होईल.कार्यवाही व अहवाल: प्राप्त झालेल्या विधायक सूचनांचे स्थानिक आणि धोरणात्मक असे वर्गीकरण करून त्यावर तात्काळ सुधारणात्मक पावले उचलण्यात यावी, अशी सूचना अनिल महाडिक यांनी केली आहे.

  साळवा बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा

साळवा बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा माकप व जनवादी महिला संघटनेची मागणी अनिल ठाणेकर ठाणे, साळवा येथिल बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटनेने केली आहे.यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य नेत्या रेहाना शेख, उज्वला पडलवार, लता गायकवाड, संगीता गाभणे, रमेश देवरे, प्रकाश दांडेगावकर, रामा कंटाळे, रेणुका कंटाळे हे उपस्थित होते कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे भूमिहीन कुटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करून आपले पोट भरते. पिडित कुटुंब भूमिहीन असून ९ वर्षाची मतिमंद मुलगी २ ऱ्या वर्गात शिकते, २८ तारखेला शाळेच्या दुपारच्या सुट्टीत ती खेळत असताना तिला ६९ वर्षाचा आरोपी संतुकराम आवटे यांने चॉकलेट चे अमिष दाखवून पीडितेला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी येऊन रडत असल्याने आईने काय झाले विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीचे आई वडील यांनी आरोपीच्या घरी जाऊन विचारले असता त्याने पीडित कुटुंबाला ५ लाख रुपये घे आणि घडलेला हा प्रकार कोणाला सांगू नका असे धमकावले आहे.त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि पुढील उपचार चालू असून मुलगी सुखरूप असल्याचे निदर्शनास आले.कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक होऊन त्यास परभणी येथील कारागृहात पाठवण्यात आले आहे.८ फेब्रुवारी २०२६ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पीडित मुलीच्या घरी जाऊन आई-वडिलांना धीर दिला आणि आरोपीला कडक शासन झाले पाहिजे या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासण देण्यात आले तसेच पक्ष व महिला संघटना आपल्याला सोबत आहे असे सांगून पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.पिडीत कुटुंबाच्या पुढील पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी आणी लेकरांच्या शिक्षणासाठी शासकीय मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कुटुंब भूमिहीन बेघर असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे हेही निवेदन लवकरच देण्यात येणार असून पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याची भूमिका माकप व जमस ने घेतली आहे.

काळ्या कामगार कायद्यांविरोधात, धर्मराज्य पक्षाची गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

काळ्या कामगार कायद्यांविरोधात, धर्मराज्य पक्षाची गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने अनिल ठाणेकर ठाणे-केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी,’धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरुवार,१२ फेब्रुवारी, लोकशाहीमार्गाने निदर्शने करण्यात येणार आहेत.पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला…