Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

  जलसंवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम

जलसंवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम मुंबई महानगर प्रदेशात एकंदर ६७ ठिकाणी प्रोजेक्ट अमृतचे आयोजन कल्याण : संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या…

  टिटवाळ्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकचा थरार

टिटवाळ्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकचा थरार अनेक वाहनांना दिली जोरदार धडक कल्याण: टिटवाळा पूर्वेकडील असलेल्या मुख्य गणेश मंदिर रोडवर बुधवारी सकाळी ११च्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली. एका मोठ्या मालवाहू ट्रकने…

शिवजन्मोत्सवनिमित्त आज शिवसन्मान ज्योत यात्रा

शिवजन्मोत्सवनिमित्त आज शिवसन्मान ज्योत यात्रा ठाणे – शिवजन्मोत्सवनिमित्त शिव सन्मान ज्योत यात्रा २०२६ चे आयोजन सकल मराठा समाज, ठाणे व मराठा क्रांती मोर्चा, ठाणे यांच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी करण्यात…

२१ फेब्रुवारीला नवलेखक कार्यशाळेचे आयोजन  

२१ फेब्रुवारीला नवलेखक कार्यशाळेचे आयोजन ठाणे: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व अनघा प्रकाशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय नवलेखक कार्यशाळेचे (कवितालेखन) आयोजन…

कंत्राटी कामगार आणि वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार- संजय केळकर

कंत्राटी कामगार आणि वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार- संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे आयुक्त…

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक आडतदारांबरोबर मूळ शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे – अण्णा बनसोडे मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पुणे मार्केट यार्ड येथील फळ विभागाऐवजी भाजीपाला विभागात डमी आडत्यांमार्फत लिंबू विक्री सुरू…

कल्याण  आगीत  १२ वाहने खाक

कल्याण  आगीत १२ वाहने खाक कल्याण: कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागातील एका उच्चभ्रू इमारतीच्या तळमजल्याला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत १२ वाहने जळून खाक झाली. यामध्ये मोटार, दुचाकी आणि सायकलींचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आग नक्की कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. आगीत तीन मोटारी, सहा दुचाकी, तीन सायकली जळून खाक झाल्या. पहाटेच्या सुमारास इमारतीच्या परिसरात धूर आणि टायर जळल्याचा वास सर्वदूर पसरला. दोन दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेत मानपाडा रस्त्यावरील सागाव भागात चेरानगरमध्ये रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंटच्या तळमजल्याला पहाटे चारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत रहिवाशांच्या तळमजल्याला उभ्या केलेल्या एकूण २९ दुचाकी, मोटारी जळून खाक झाल्या. यावेळी घरातून बाहेर पडताना आगीची झळ लागून पाच रहिवासी जखमी झाले होते.

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसी टीव्ही कॅमेरा प्रकल्प’ हाती घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल १११ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बस स्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये; तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७,०३५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक हालचालीवर सतत नजर राहणार आहे, असे सरनाईक म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी इ-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) या संस्थेकडे सोपवली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी एक वर्ष निश्चित केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (यूएटी) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येईल. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालये सुरक्षित होतील. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

अंत भला तो सब भला…

अंत भला तो सब भला… शेवट्च्या मॅचमध्ये नेपाळचा पहिला विजय वर्ल्डकप विजय स्कॉटलंडचा केला पराभव वाढदिवशी गुलशन झाने ठोकला विजयी चौकार मुंबईत :  टी२० क्रिकेट वर्ल्डकपच्या आपल्या शेवटच्या मॅचमधये मुंबईत रंगलेल्या सामन्यात नेपाळने…

हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी 

हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देत छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्याअसल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे सपकाळ यांनी आज सांगितले. सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्यास समाजात तेढ निर्माण न होता ऐक्याचा संदेश जावा, हा आपल्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा गाभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय असून ते आपले आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सपकाळ यांनी नमूद केले.