Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दिवा, ता. 16 फेब्रुवारी (आरती परब) – दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ऊॅ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

सिंधुदुर्गातील नगरपरिषदा – नगर पंचायतींना निधी वाढवून मिळावा- निलेश राणे

सिंधुदुर्गातील नगरपरिषदा – नगर पंचायतींना निधी वाढवून मिळावा- निलेश राणे सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी)–सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि दरवर्षी त्यात वाढ होत आहे परिणामी…

२०वी राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

२०वी राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न मुंबई : २० व्या राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा नुकत्याच मुंबईत वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या भारतीय क्रीडा…

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ए टी स्पोर्ट्स दुसऱ्या फेरीत ठाणे : ए टी स्पोर्ट्सने डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा एक गडी राखून पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन…

 गार्गी मोहितेला दुहेरी मुकुट

ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा गार्गी मोहितेला दुहेरी मुकुट ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’ कल्याण – कल्याण येथील गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल येथे ७ व ८ फेब्रुवारीला पार…

 प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी मुंबई जिल्हा कॅरम संघटना आयोजित भारतीय आयुर्वीमा महामंडळ, ओ एन जी सी व हिंदुस्थान पेट्रोलियम पुरस्कृत ३३ व्या वरिष्ठ मुंबई…

  मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार?

मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल मुंबई : मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर…

  वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित,…

 कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार?                              

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार? कांदळवनांचा वाढता ऱ्हास कधी थांबणार ? कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सीआरझेड आरआरझेड क्षेत्राचा वाढता ऱ्हास पाहता यावर प्रशासनाने कठोर पायबंद घालत हे क्षेत्र संरक्षित करणे गरजेचे आहे. गेली आठ वर्षात प्रशासकीय राजवटीत सीआरझेड, आरआरझेड क्षेत्रात झालेले अनाधिकृत भराव आणि कांदळवनाच्या ऱ्हासाचा फटका पाहता प्रशासनाने सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राची कठोर अमंलबजावणी केली पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रफळ ६७.६५ चौ.कि.मी. अंदाजे, भौगोलिक परिस्थिती समुद्र सपाटीपासून ० ते २० मीटर उंच तीन बाजूंनी खाडी यामध्ये  बारावे जंक्शन जवळील कल्याण खाडी, ते मोठागाव खाडी परिसर असा मोठा परिसर उल्हास खाडी  सीआरझेड  अंतर्गत समावेश आहे. तर कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात  उल्हास नदी, काळूनदी, वालधूनी नदी यादेखील बारावे जक्शंन जवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. कल्याण-डोंबिवली मनपा परिसरातील सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि आरआरझेड (रिव्हर रेग्युलेशन झोन) संबधित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत असून कल्याण-डोंबिवली हा भाग खाडीच्या जवळ असल्याने येथे सीआरझेड नियम लागू होतात. डोंबिवलीतील कोपर, आयरे आणि मोठागाव या खाडी नजीकच्या भागांत सीआरझेड, उल्लंघन करून चाळी बांधल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. भूमाफियांनी खाडीकिनारच्या  भागात भराव टाकून अतिक्रमण केले असून, त्यावर कारवाईसाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने मागणी करत आहेत. शहारातील जमिनी संपल्याने अनधिकृत बांधकामदारांनी आता आपला मोर्चा खाडीकिनारी वळवला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी खाडी किनारच्या खारफुटीच्या झाडांची तोड सुरु असून ‘पर्यावरणाला यातून धोका निर्माण होत आहे. खारफुट अर्थात खाडीकिनारच्या जमीनीवर असणाऱ्या वृक्षांना पर्यावरणाच्या दृष्टीने भरपूर महत्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वृक्षांची आवश्यकता असते. या सीआरझेड क्षेत्रातील कांदळवन दलदलीच्या भागावर भूमाफिया यांची वक्र दृष्टीमुळे अनाधिकृत भराव करीत बांधकामाची जागा निर्माण करायला या ठिकाणी असणाऱ्या खाडी किनारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. तर काही ठिकाणी विकासकामांच्या कॉंक्रीटीकरणामुळे कांदळवनांना फटका बसल्याने खारे पाणी येत नसल्याने कांदळवने बाधित होत आहेत. या वृक्ष तोडीकडे प्रशासनाने योग्य लक्षपुरवून कारवाई करत नसल्याने या वृक्षतोडीला आळा बसत नाही. ग्रामीण भागत नव्हे तर शहरी विभागातील अशा खारफुटीच्या झाडांची मोठया प्रमाणात तोड झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या या खारफुटीच्या तोडीने विविध आपत्तींना तोंड देण्याची वेळ यायची संभवाना असून प्रशासन येथे जातीने दुर्लक्ष करत आहे. वास्तविक पाहता कोणताही वृक्ष तोडण्यास रितसर परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु खाडी किनारी भागात या वृक्षांची खुलेआम कत्तल करुन चाळी वा तत्सम अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. खाडी किनारी संरक्षित करुन हरित पट्ट्याचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आर्थिक गणितातून या खाडी किनारी असणाऱ्या खारफुटीची कत्तल होत असल्याची चर्चा आहे.  तसेच अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती, हाय टाईड यावेळेस कांदळवन क्षेत्रातील खारफुटी ही पाण्याचा वाहता प्रवाह इतरत्र  पसरण्यापासून रोखण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत्र असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे खारफुटीचे संवर्धन काळाची गरज आहे.         आता तरी प्रशासनाने डोळसपणे कारवाईचा बडगा उगरित खारफुटीची झाडे वाचवून खाडी किनारी संवर्धन केले पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे अशी मागणी जोर धरु पाहत आहे. “खारफुटीच्या वृक्षतोडीच्या तक्रारी आम्ही मुंबई कांदळवन कक्षकडे वर्ग करतो असे वृक्ष प्राधिकरणाचे क.डों.म.पा अधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.” तर नदी किनारी भागात देखील किनाऱ्यालगत भराव, नदी किनाराचा नैसर्गिक समतोलला बाधा आणित खोदकाम करीत मातीच्या नैसर्गिक उंचवटे यांचे सपाटीकरण  याबाबत प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, तसेच नदी किनारा जवळील बांधकामा बाबत नियमावलीचे काटेकोर पालन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. “याबाबत पर्यावरण दक्षता मंडळ व्यवस्थापक रूपाली शाईवाले यांच्याशी संपर्क साधला असता कांदळवन वाढता ऱ्हास संदर्भात सांगितले की, सातपूल जेटी कुभंरखाण पाडा, खाडी परिसर, जुनी डोंबिवली, खाडीपरिसर कोपर खाडीपरिसर, भोपर खाडी परिसर या परिसरात कांदळवन अजूनही अस्तित्वात असून या संदर्भीत परिसरात विकास कामे करताना  कांदळवनाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देत खारफुटी चे संवर्धन करीत या परिसरात पाणथळ, दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्षांचा अधिवास टिकून राहण्यासाठी, तसेच नैसर्गिक समतोल साधण्यासाठी खारफुटीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.”

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश घेण्यास येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी विनाविलंब शुल्कासह घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारीपासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८  शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची मुदतवाढ ही येत्या दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.