Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे टी शर्ट अनावरण सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील खेळाडूंसाठी खास गणवेश म्हणून रंगीत टी शर्ट तयार केला असून त्याचे अनावरण आज सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे ऑडिटोरियम, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी…

सुखटणकर सावित्री मोहन यांना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या  ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत  ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात  दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले.  त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी…

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’!

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’! मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांचे नाशिकमध्ये कडक निर्देश हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेवू नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव मनपाचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की, २००२ च्या यादीतील नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील एका मतदाराच्या नावावरून अन्य सदस्यांच्या नावांच्या जुळवणी कामाला गती द्यावी. मतदारांची अस्पष्ट छायाचित्रे, निरर्थक नोंदी दुरुस्तीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देत सुस्पष्ट रंगीत छायाचित्र संकलित करून बीएलओ अॅपमध्ये अपलोड करावीत. तसेच समान नाव आणि छायाचित्र असलेल्या मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत दुरुस्ती करून घ्याव्यात, मतदारांचे अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठ वर तत्काळ कार्यवाही करावी. कोणतेही अर्ज १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मतदारांनी संपर्क केल्यावर त्यांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असेही चोक्कलिंगम् यांनी दिले. जिल्ह्यात ५१ लाख ५६ हजार मतदार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ असून, एकूण ५१ लाख ५६ हजार मतदार आहेत, या मतदारांपैकी २००२ मध्य विशेष सखोल पुनरीक्षण करून तयार झालेल्या यादीशी विद्यमान मतदारांची नावे जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख १६ हजार मतदारांच्या जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.

तोष्णीवाल-श्रॉफ यांचा डबल सुवर्ण धमाका

 मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत अनुभवांचे स्मॅश मुंबई :  मुंबईच्या टेबल टेनिसच्या टेबलवर अनुभवी खेळाडूंनी अक्षरशः धमाका केला. विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात नुकत्याच रंगलेल्या मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरचे डॉ. नितीन तोष्णीवाल आणि मुंबईचे सरोष श्रॉफ यांनी आपल्या खेळाचा झंझावात उडवत दुहेरी सुवर्णपदकांवर शिक्कामोर्तब केले. ५० वर्षावरील गटात डॉ. तोष्णीवाल यांनी आपल्या अचूक फटक्यांनी आणि धारदार रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः गुडघ्यावर आणले. अंतिम फेरीत कपिल कुमारला ११-९, ११-८, १२-१० अशा सरळ गेममध्ये हरवत त्यांनी एकेरी किताब पटकावला. इतक्यावरच न थांबता तेजस नाईकच्या साथीने दुहेरीतही त्यांनी दबदबा कायम ठेवत सरोष श्रॉफ-जोगेश मोटानी जोडीचा ११-९, १२-१०, १३-११ असा पराभव करत दुहेरी सुवर्णाचा झेंडा रोवला. दुसरीकडे, ६० वर्षावरील गटात सरोष श्रॉफ यांनी अनुभव आणि अचूकतेचा परिपूर्ण मिलाफ सादर करत एल. व्ही. ठाकरे यांना ११-५, ११-५, ११-८ ने धूळ चारली. त्यानंतर दुहेरीत जोगेश मोटानीच्या जोडीने त्यांनी एल. व्ही. ठाकरे-शैलेश गोसाईन यांच्यावर ११-८, १४-१२, १४-१२ अशी मात करत आणखी एक सुवर्ण पटकावले. या स्पर्धेत गुजरातचे एल. व्ही. ठाकरे, हैदराबादचे निजामुद्दीन ताहेर आणि आर. जे. हरी कृष्ण यांनीही आपल्या खेळातून चुरस निर्माण केली. महिला गटात शिवप्रिया हिने दमदार कामगिरी करत जेतेपद पटकावले, तर सुकन्या उपविजेती ठरली. ज्येष्ठ आणि अनुभवी टेबल टेनिसपटूंच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू आणि व्यायाममहर्षी मधुकर तळवळकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. 00000000

महाड क्रांती अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

महाड क्रांती अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावर केलेल्या सामाजिक क्रांतीची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्या महाड क्रांतीचा इतिहास विद्यालय, महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी गाढे अभ्यासक असलेल्या तज्ज्ञांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेची घोषणा शुक्रवारी सुरू झालेल्या महाड क्रांती शताब्दी महोत्सवानिमित्त ‘ समान संधी अभियान ‘ चे अध्यक्ष सुनील कदम यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. अभ्यासक्रमात समावेशासाठी महाड क्रांतीच्या इतिहासावर आधारित धड्यांचे स्वरूप ही तज्ज्ञांची समिती निश्चित करणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ प्रल्हाद जोगदंड हे या अभ्यासक्रम तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असून प्रा. राजेश सोनावणे हे समन्वयक आहेत. या समितीमध्ये एकूण १७ अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात डॉ. मृदुल निळे, डॉ.सुंदर राजदीप, डॉ.अविनाश कोल्हे, डॉ.कृष्णा गायकवाड, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. प्रदीप वाघमारे, प्रा अतुल रणपिसे, प्रा. सुहास चव्हाण ( मुंबई ), प्रा. विजय मोहिते ( कोकण), डॉ. सुनील नरवडे (मराठवाडा ), डॉ विद्या चोरपगार,  डॉ चेतना सवाई,  डॉ . गौतम कांबळे, डॉ सुधीर जिंदे ( विदर्भ) सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती कदम यांनी पत्रकात दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांचा महाड क्रांती शताब्दीचा प्रारंभिक समारंभ गेल्या आठवड्यात पत्रकार भवनात पार पडला होता. त्यातून महाड क्रांतीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला अनेक संस्था – संघटनांनी पाठींबा यापूर्वीच जाहीर केला आहे.

युवा कुस्तीपटू सुरज मानेला रौप्य

ठाणे : पुण्यात ,वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि…

निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्थेचा आंदोलनाचा इशारा

निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्थेचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : सरकारने एस आर ए योजनेतून आम्हाला विकासकाच्या माध्यमातून घराचे स्वप्न दाखवले.  आज १८ वर्ष झाली. बिल्डर आणि सरकारी बाबूंनी आम्हाला या स्वप्नातील घरापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे आता आमचा अंत सरकारने बघू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्थाचे माजी मुख्य प्रवर्तक जोसेफ शांतीमानव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत  दिला. सायन कोळीवाडा येथे आमची हक्काची घरे होती. गगनचुंबी इमारती मध्ये स्वप्नातील घर मिळेल यासाठी एस आर ए चे सरकारी बाबू जे सांगतील ते कागदपत्र आम्ही दिले. आमची हक्काची घरे बिल्डर ने तोडली व गेल्या १८ वर्षापासूनच आमचा वनवास सुरू केला. भाडे दिले ते बंद अवस्थेत, टी डी आर साठी बिल्डर ने मंत्रालयातून स्वतःचे भले करून घेतले. करोडो रुपये या गगनचुंबी इमारतीमधुन बिल्डर कमवत असताना आम्हाला पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागत आहे. असे मोहन गुप्ता, गणेश बैजनकी, कैलास मेद, राजेश देवेंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल रमेश औताडे मुंबई : डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

 खासदार नरेश म्हस्के वाढदिवशी प्रत्यक्ष भेटणार नाहीत

खासदार नरेश म्हस्के वाढदिवशी प्रत्यक्ष भेटणार नाहीत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याने शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. या आदर्श निर्णयाचे अनुकरण करत  खासदार नरेश म्हस्के यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी, २४ मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र परिवार दरवर्षी मोठ्या जल्लोषात खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र यंदा आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत   खासदार नरेश म्हस्के यांनी  आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नरेश म्हस्के यांना दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक हारतुरे घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी येत असतात. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने खासदार नरेश म्हस्के हे दिल्लीत असून वाढदिवशी  प्रत्यक्ष ठाण्यात कोणालाही भेटू शकणार नाहीत. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता असल्याने कार्यकर्ते, हितचिंतक वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा देत असल्याने त्यांचा स्वीकार करत खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यकर्ते, हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाचे डॉ. ठरले गोरगरीबांसाठी देवदूत

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाचे डॉ. ठरले गोरगरीबांसाठी देवदूत राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील अतिदुर्गम भागात आरोग्य देवदूत म्हणून डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली असल्याचे तेथील काही गरीब आदिवासी आणि जानकरां मधे सध्या चर्चा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मोधलवाडी या आदिवासी वस्तीतील पिंटू विठ्ठल भला वय ५ महिने या बाळाच्या छातीमध्ये  पॉईंझन झाल्याकारणाने त्याला त्याच्या आई वडिलांनी अनेक  हॉस्पिटल मध्ये दाखवून सुद्धा कुठलाही फरक पडला नाही. शेवटी  बाळाला देवाच्या भरवशावर सोडून देतो असे निशब्द वाक्य आई वडीलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून काढले. आता पुढे जे काही होईल ते आमच्या नशिबाने होईल असे बोलत त्यांनी आपल्या बाळाला घरीच ठेवले, वैद्यकीय मदत पथक धारखिंड येथील डॉ. वर्षा ओंकार तंत्रपाळे यांना सदरील बातमी समजता त्यांनी बाळाचे आई वडील यांना विश्वासात घेऊन त्यांना आधार दिला व बाळाला उपचार करण्यासाठीचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेऊन बाळाला  हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी  राहत्या घरी मोधलवाडी येथे रुग्णवाहिका  घेऊन स्वतः गेल्या  तेथे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या मदतीने बाळाला अंबरनाथ येथे छाया हॉस्पिटल  तेथून उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञांना दाखवण्यासाठी नेले. सेंट्रल हॉस्पिटल येथील बालरोग तज्ञ डॉ.वैशाली पवार आणि डॉ. ऐश्वर्या मोरे यांनी प्राथमिक उपचार देऊन बाळाला पुढे सायन हॉस्पिटल  मुंबई येथे संदर्भित करण्यात आले. तिथे काही महिने ऍडमिट ठेवून घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकारांमध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथील आर. बी. एस. के. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी मोहोड यांचे मौल्यवान सहकार्य लाभले, आदिवासी  दुर्गम भागामध्ये वैद्यकीय मदत पथकाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे  आमच्या बाळाचा जीव वाचल्याचे आई वडीलांनी मोठ्या अंतःकरणाने दैनिक बित्तंबातमी शी  बोलताना सांगितले.