ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या ‘राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना आणि डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०२४-२५ करिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.
इच्छुक शाळा / मदरसा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. १५ सप्टेंबर, २०२४ असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन व त्रुटींची पूर्तता करुन अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.
तरी इच्छुक व पात्र संस्थांनी त्यांचे विहित नमुन्यातील प्रस्ताव व अर्ज जिल्हा नियोजन समिती, तिसरा मजला, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *