महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन

 

ठाणे : श्रीगणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो, श्रीगणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केले. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ४२वे वर्ष आहे.
मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मीनल पालांडे, परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, मंडळाचे सचिव पी. एच. पाटील, कार्यवाह आर. के. पाटील आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयुक्त सौरभ राव यांचा तर, उपायुक्त मीनल पालांडे यांनी प्रियांका राव यांचा सत्कार केला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *