Month: October 2024

– कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नवी मुंबई : “जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य…

सेंट ब्लेझ ‘बी’ संघाची ‘ए’ संघावर मात

44वी डब्ल्यूसीजी रिंक फुटबॉल स्पर्धा मुंबई, 28 ऑक्टोबर: 44 व्या विलिंग्डन कॅथलिक जिमखाना (डब्ल्यूसीजी) वार्षिक रिंक फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत सेंट ब्लेझ ’ब’ (आंबोली) टीमने त्यांची सीनियर…

सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धा

अर्णव, स्वराचे संघर्षपूर्ण विजय मुंबई : सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले आणि मुली एकेरीत अनुक्रमे अर्णव वाघ आणि स्वरा गुडेकर यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेबलटेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 1-2 असा पिछाडीवर पडलेल्या अर्णवने दमदार पुनरागमन करताना चौथ्या गेममध्ये बरोबरी साधली. त्यानंतर पाव्या आणि अंतिम गेमसह  11-8, 6-11, 8-11, 14-12, 11-8 अशी बाजी मारली. आदित्य दलाल, जेहान कोलाह आणि साहिल मोहिते यांनीही आगेकूच केली. मुलींमध्ये स्वरा आणि नीरजा खेडेकर यांच्यातही मोठी चुरस पाहायला मिळाली. पाच गेममध्ये रंगलेल्या लढतीत स्वराने 5-11, 11-7, 11-8, 6-11,11-5 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्वरासह सारा जामसुतकर, क्रिशा तन्ना आणि इन्सिया भावनगरवाला यांनी अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अंशिता ताम्हणकरने अर्पिता बोर्‍हाडेला 8-11, 11-8, 12-10, 8-11, 11-7 असे हरवले. श्वेता पार्टे-नायकने मुग्धा देसाईवर 3-0 अशी मात करताना आगेकूच केली. पुरुष एकेरीत मोहित वैष्णवने उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला तरी चैतन्य आहुजाने 11-7, 11-7, 4-11, 9-11, 11-9 असे झुंजवले. मंदार चिपळूणकरने शिवम आंब्रेचा 11-4, 6-11, 11-7, 11-8 असा पराभव केला. पार्थ मगरने तन्मय राणेला 11-4, 11-9, 11-2 तर शुभम आंब्रेने रवी चोप्राला 11-5, 11-3,…

प्रशांत – अंबिका विजेते  

रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब  डोंबिवली पूर्व आयोजित रोटरी क्लब रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या झैद अहमद फारुकीचा…

कोणताही गाजावाजा न करता निलेश राणेंनी केला उमेदवारी अर्ज दखल..!

कुडाळ : कोणताही गाजावाजा न करता महायुतीचे उमेदवार डॉ.निलेश राणे यांनी शिवसेना(शिंदे गट) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे दाखल केला.  यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते…

माऊली प्रतिष्ठानतर्फे निराधार महिलांना साडी वाटप

मुंबई : माऊली प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक संस्था प्रतीक्षा नगर मुंबईच्या वतीने रविवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता कै .श्री रघुनाथ विठल चव्हाण क्रीडांगण मैदानात समाजातील गरजू,निराधार व विधवा महिलांना…

रतन टाटांचे स्वप्न साकारण्यासाठी युवा उद्योजक अर्जुन देशपांडेंचा पुढाकार

रास्त दरातील औषधांकरता राबवणार मिशन जेनरिक औषधे घराघरात ठाणे : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सामाजिक दृष्टिकोन आणि भारतीयांना रास्त दरातील वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान युवा उद्योजक अर्जुन देशपान्डे यांनी स्वीकारले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त किमतीत औषधे मिळायला पाहिजेत या उद्देशाने वयाच्या १६ व्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनरिक आधार या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती.रतन टाटा यांना आपले प्रेरणास्रोत मानून अर्जुन देशपांडे यांनी किफायतशीर किंमत असणाऱ्या जेनरिक औषधे उपलब्ध करून देण्यास प्रार्थमिक्ता दिली होती. अर्जुन देहस्पंडे यांना टेड टॉकच्या माध्यमातून रतन टाटा यांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देशपांडे यांनी आपला उद्देश आणि कल्पना त्यांच्यासमोर मंडळी होती. समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच आग्रही पावले उचलणाऱ्या रतन टाटा यांनी देशपांडे यांच्या संकल्पना आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले होते. आपल्यासाठी रतन टाटा हि एक व्यक्ती नसून एक ऊर्जास्रोत होते.त्यामुळे त्यांचे स्वप्न साकारणे हाच आपला आता दृढसंकल्प असल्याचे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्रासह देशातील उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली आणि पंजाबच्या जोडीने १७ राज्यातील नागरिकांना स्वस्त दरातील औषधे अर्जुन देशपांडे पुरवत आहेत. हा आपल्यासाठी केवळ एक उद्द्योग नसून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे, असे अर्जुन देशपांडे म्हणाले. रतन टाटा आणि  अर्जुन देशपांडे या जोडीने भारतीय युवकांपुढे एक प्रेरणादायी उदाहरण कायम केले आहे. रतन टाटा यांच्या जयंतीच्या निमीत्ताने दृढ संकल्प आणि योग्य मार्गदर्शनामुळे कुठलेही स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येते असा संदेश अर्जुन देशपांडे यांनी युवकांना दिला आहे.

Heading – मुलींच्या गटात रायगड, नंदुरबारचे शानदार विजय

सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा – नंदुरबारच्या रोहिणी गावितची नाबाद नऊ मिनिटे खेळी धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत   मुलींच्या गटात नंदुरबारने छत्रपती संभाजीनगरचा ६-१ असा पाच गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र खो-खो hअसोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत रोहिणी गावित हिने सलामीचा सायंकाळचा दिवस गाजविला. तिने पहिल्या डावात ८.४०  व दुसऱ्या डावात नाबाद नऊ मिनिटे संरक्षण केले. छत्रपती संभाजी नगरच्या दिशा इंगळे हिनेही २.४० व ७.१० मि. पळती करीत लढत दिली. अन्य एका सामन्यात रायगडने लातूरला १६-१४ असे २ गुणांनी नमविले. मध्यंतराची सहा पाच ही एका गुणाची आघाडीच रायगडला विजय मिळवून दिली.  संजीवनी जगदाळे हिने २. ३० मिनिटे नाबाद पळती करीत आक्रमणात सहा गडी बाद केले. लातूरच्या पायल माने हिची लढत अपुरी पडली. तिने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत १.१० मिनिटे संरक्षण केले. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले. मुलांमध्ये धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला नमविले मुलांच्या गटात धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला २१-१८ असे तीन गुणांनी नमविले.  मध्यंतराची ११-९ ही ३ गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. त्यांच्या कुणाल शेटे याने दोन, एक व एक मिनिटे नाबाद पळती करत दोन गडी बाद केले.  अभिषेक गावित याने १.५०, १.२० मिनिटे संरक्षण करीत तीन गडी बाद केले. अन्य एका सामन्यात रायगडने सिंधुदुर्ग १७-१३ अशी चार गुणांनी मात केली. भावेश गोवलीकर त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच गडी बाद करीत एक व १.२० मिनिटे पळती केली. सिंधुदुर्गच्या अथर्व शिंदे (१.५०,१.०० मि. व ४ गुण) याची खेळी अपुरी पडली. अन्य सर्व सामने डावाने झाले. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले उद्घाटन या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले. अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे होते. सुरुवातीस ध्वजारोहण आणि त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. ती ज्योत प्रमुख पाहुण्यांनी प्रज्वलित केली. त्यानंतर  राणी लक्ष्मी आणि जानकी पुरस्कार प्राप्त आश्विनी शिंदे हिने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी द्वापेट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटमुरे, शि. प्र. मंडळ प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते सारिका काळे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, उपाध्यक्ष अश्विनी पाटील, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  जे. पी. शेळके, सुजाता शानमे, रोहिणी आवारे, सुप्रिया गाढवे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष वाघ, शिवतेज प्रतिष्ठान रेहमान काझी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत उस्मानाबाद खो खो असोसिएशनचे सचिव प्रवीण बागल, अभय इंगळे, प्रदीप होले, प्रभाकर काले, शोभना वाकुरे, विवेक कापसे, वर्षा जचव, निकिता पवार, गौरी शिंदे, संपदा मोरे,आकाश लोखंडे, अभिजित पाटील, रितेश जाधव, सुजित साळुंखे यांनी केले. असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष  संदीप तावडे यांनी आभार मानले. उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले संघ व त्यांचे होणारे सामने कुमार : सोलापूर- बीड, धुळे-अहमदनगर, नाशिक-रत्नागिरी, रायगड-सांगली, धाराशिव- सातारा, नंदुरबार-मुंबई, ठाणे-मुंबई उपनगर, जालना-पुणे. मुली : धाराशिव-नंदुरबार, अहमदनगर- रत्नागिरी, मुंबई उपनगर-पालघर, धुळे-ठाणे, सांगली-जालना, रायगड-पुणे, सोलापूर-मुंबई सातारा-नाशिक. 00000

ठाणे आणि कळवा – मुंब्रा विधानसभेसाठी जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल

ठाणे : जाहिर झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे , याच पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेचे अनेक उमेदवार कोकणातील वेगवेगळ्या भागातून अर्ज भरत आहेत . ठाणे विधानसभा…

स्वच्छ, पर्यावरणशील, प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी नवी मुंबईकरांना आवाहन

मुख्य रस्ते साफसफाई व प्रक्रियाकृत पाण्याने धुण्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांकडून समाधान नवी मुंबई : नाविन्यपूर्ण उपक्रमांव्दारे स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणा-या नवी मुंबई शहरातील जागरुक नागरिकांनी भारतातील सर्वात मोठा सण असणारा दिवाळी उत्सव हा ‘पर्यावरणशील, फटाकेमुक्त व प्लास्टिकमुक्त’ साजरा करण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून यादृष्टीने महानगरपालिकाही तशा प्रकारची कार्यवाही करीत आहे. दिवाळीपूर्वी नागरिक मोठया प्रमाणात आपल्या घराची साफसफाई करत असतात. अशावेळी नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या, टाकून देणार असलेल्या वस्तू नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात 92 ठिकाणी उभारलेल्या ‘थ्री आर’ सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात, जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल तसेच उर्वरित कच-याची विल्हेवाट लावणे सोयीचे ठरेल असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींचे फार मोठे योगदान असून कच-याचे वर्गीकरण करण्यातून तसेच महानगरपालिकेने निश्चित केलेल्या योग्य जागी कचरापेट्यांमध्ये योग्य प्रकारे कचरा टाकण्यातून आपल्या स्वच्छताकर्मींना करावे लागणारे अतिरिक्त काम कमी करून दिलासा द्यावा असे आवाहन आहे. तसेच कोणत्याही प्रकारे उघड्यावर कचरा जाळून वायू प्रदूषण वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी असेही आवाहन करण्यात आलेले आहे. दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून शहरातील मुख्य मार्गांवरील दुभाजकांचे कॉर्नर्स व पदपथ येथील गाळ सुकून झालेली माती काळजीपूर्वक साफ करण्यात येत आहे. याकरिता मॅकेनिकल स्विपींग वाहने तसेच वॉटर स्प्रेईंग वाहने यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यामध्ये अग्निशमन विभागाचेही विशेष सहकार्य मिळत आहे. पावसाळी कालावधीत पावसासोबत वाहून आलेली माती रस्त्यांच्या कडेला गाळ स्वरुपात जमा होते व पाऊस थांबल्यानंतर वाहनांच्या रहदारीमुळे हवेत उडून प्रदूषणात वाढ होते. ही बाब लक्षात घेत ही रस्त्यांच्या कडेला साचलेली माती जमा करण्यात येत असून त्यानंतर या रस्त्यांची जेटींग मशीनव्दारे पाणी मारुन सफाई करण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारे पाणी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्दीकरण केलेले प्रक्रियाकृत पाणी असून यामुळे रस्ते सफाईसोबतच पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे. या अंतर्गत नेरुळ विभागात राजीव गांधी उड्डाणपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते से 3 बस डेपो – जय भवानी सर्कलपर्यंत रस्ते स्वच्छता व रस्ते धुणे अशा दोन्ही प्रकारे विशेष स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे अवजड वाहनांची नियमित वर्दळ असणा-या बेलापूरमधील आम्रमार्गावर उरण फाटा ते नमुंमपा मुख्यालय भागाची सखोल रस्ते सफाई करण्यात आली. यासोबतच ठाणे बेलापूर मार्ग, कोपरखैरणे – रबाळे एमआयडीसी मार्ग, महापे शिळफाटा मार्ग, वाशी कोपरखैरणे मार्ग, घणसोली पामबीच मार्ग, पटणी मार्ग अशा मुख्य मार्गांची रस्ते साफसफाई व धुणे अशा दोन्ही प्रकारे सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. या भागात दररोज सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी येणा-या महिला व पुरुषांनी महानगरपालिकेच्या या सखोल स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली असून यामुळे धूळीचे प्रमाण कमी झाल्याचे अभिप्राय दिले आहेत. ००००