Month: October 2024

‘डॉ. योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, दडपशाही करणार्‍यांचा निषेध’

अनिल ठाणेकर भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय समन्वयक डॉ योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, दडपशाही करणार्‍यांचा तीव्र  निषेध करत असल्याचे मत भारत जोडो अभियान, ठाणेचे कार्यकर्ते जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, नीता साने, राजेंद्र चव्हाण, मुक्ताश्री वास्तव, निमिष साने, अनिल शाळिग्राम, सुब्रतो भट्टाचार्य, विशाल जाधव, रवी घूले, शुभदा चव्हाण, अजित डफळे, मर्सिया डीकुन्हा, हुकुमचंद शिरसोदे,हर्षलता कदम, मीनल उत्तूरकर आणि अजय भोसले यांनी व्यक्त केले आहे. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विदर्भात अकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या वतीने  “लोकशाहीचे रक्षण व आमचे मतदान” या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॅा. संजय मं. गो., राज्य समन्वयक उल्का महाजन, विदर्भ संयोजक अविनाश काकडे आदी वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी ‘आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. “आम्ही उत्तरे देऊ, सर्व भाषणे होऊ देत.” अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले, त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली. ज्या वेगाने हे घडले, त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. भारत जोडो अभियानातर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या माहितीनुसार ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते असे कळते. वंचित बहुजन आघाडीचे नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील तसेच संविधान विरोधी शक्ती, भाजप, व संघाविरोधी लढताना शत्रू-मित्र विवेक बाळगतील अशी अपेक्षा आहे. जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत अशा साहित्यिक, विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा अलिकडच्या काळात वंबआच्या कार्यकर्त्यांनी नवाच पॅटर्न तयार केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवैधानिक हक्काची अशी पायमल्ली वंचितांचं राजकरण करू पाहणाऱ्या पक्षाने करणे यासारखी शोकांतिका नाही.अशाप्रकारच्या हुल्लडबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलीस यंत्रणेने असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अशाप्रकारच्या दडपशाहीला न भिता भारत जोडो अभियान आपले काम राज्यभरात सुरू ठेवेल असा आम्ही निर्धार व्यक्त करतो,असे भारत जोडो अभियान, ठाणेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्राची पहिली सरमिसळ संपन्न

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३ हजार ६८१ मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे , आचारसंहिता पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ६ हजार २०० बॅलेट युनिट, ३ हजार ४०५ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ६८१ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी जावळे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातदेखील मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे जावळे यांनी सांगितले. 0000

कोपरखैरणे, घणसोली परिसरात मतदान करण्याविषयी व्यापक जनजागृती

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकची माहिती नागरिकांमध्ये प्रसारित करण्यासाठी व नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार कर्तव्य भावनेने बजावावा याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या अनुषंगाने ‘मतदार जागरुकता…

 तीन वर्षांनंतर लालपरीचे होणार आगमन

ग्रामस्थांमध्ये जल्लोष   सोयगाव : वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी रविवारी (दि २०) बनोटी (ता.सोयगांव) येथील बसस्थानकाची पहाणी करून हिरवा कंदिल दिल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेली लालपरि गावात येणार असल्याने ग्रामस्थांत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तीन वर्षापूर्वी बनोटी येथील हिवरा नदिला आलेल्या महापुरात नदि वरील पुलासह एस. टी बसस्थानक वाहुन गेल्याने बस दोन किलोमीटर गावाबाहेरुन जात असल्याने महिला, विद्यार्थी, वृद्धांचे अतोनात हाल होत असल्याने बनोटी ग्रामपंचायतीने शासकीय अनुदानाची वाट न बघता बसस्थानकाचे काम हाती घेऊन पूर्ण झाल्याने सोयगाव, सिल्लोड, पाचोरा आगारास ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन बसेस पुर्वरत चालु करण्याची मागणी केल्यावर सोयगाव आगाराचे वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी शनिवारी बनोटी बसस्थानकाची पहाणी करीत बसेस पुर्वरत करण्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत आगार प्रमुख, चालक मनोज चव्हाण, वाहक रवि सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच उदय खैरनार, वामन जाधव, निळकंठ खैरनार, साहेबराव वेहळे, संतोष खैरनार, नामदेव चव्हाण, छोटूराम पाटील, योगेश निकम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरील ‘थॉटस् ऑफ आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

रमेश औताडे मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भाषणातील विविध पैलूंची विषयावर रचना असलेले ” थॉटस् ऑफ आंबेडकर ” या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अर्जुन डांगळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नामदेव साबळे म्हणाले, हे पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव आणि भारतीय घटनेचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संकलन आहे. बाबासाहेबांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार हे भारतातल्या शोषित, पिडीत पददलित लोक समुहाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढ्यांना ऊर्जा नि प्रेरणा देणारे विचार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारा शिवाय इथला सर्वहारा वर्ग त्याच्या मनुवादी बामन, बनिया शोषकाविरुद्ध, शोषकांच्या शासनाविरुद्ध आणि या शोषकांचं रक्षण करणाऱ्या समाज व धर्मव्यवस्थेविरुद्ध सर्वंकष निर्णायक लढा उभारू शकत नाही असे नामदेव साबळे म्हणाले. यावेळी दलित पॅंथर एनएलडी चे केंद्रीय अध्यक्ष सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, राजकीय विश्लेषक सुनील कदम, दैनिक सार्वभौम राष्ट्र चे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक साहित्यिक विचारवंत राजू रोटे तर सूत्रसंचालन केतकी प्रकाशन कार्यकारी संपादक पंकज चाळके यांनी केले.

 अतिवृष्टीच्या पावसात दोन घरे कोसळली

दोन्ही घरातील कुटुंबातील सदस्य जखमी   सोयगाव : बनोटी मंडळात झालेल्या शनिवारी रात्रीच्या अतिवृष्टी मुळे  दोन घरे कोसळून त्यामध्ये दोन कुटुंबातील पाच जण दबल्याची घटना  सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे शनिवारी रात्रीला एक वाजता घडली ह्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसुन दोन्ही कुटुंबातील सदस्य  कीरकोळ जखमी झाले आहेत…महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे जखमीना उपचार करून रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी सोडण्यात आले आहे कीन्हीसह परीसरात गेल्या पाच  दीवसापासुन परतीच्या पावसाने थैमान घातले असुन ढगफुटी दुश्य मुसळधार पाऊस होत असल्याने नदीनाल्यांना मोठा पूर येत आहे शुक्रवार व शनिवार रात्री आठ वाजेनंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये कींन्ही येथील गौतम शंकर शेळके हे पत्नी ,आई,दोन मुलांसह घरात झोपलेले होते तसेच कैलास ओंकार लोखंडे हे देखील पत्नी व दोन मुलांसह झोपलेले असताना पावसामुळे मध्यरात्रीला जवळजवळ असलेले दोघे घराच्या भिंती पडल्याने घरे कोसळली त्यामध्ये दोघे कुटुंबातील पाच सदस्य दबले मोठा आवाज आल्याने आजुबाजुचे रहीवाशी सरपंच छबाबाई फलके,कीशोर फलके,पप्पु देशमुख, वाल्मीक शेळके,वामन शेळके,शेनपडु थोरात आदींनी त्या कुटुंबातील सदस्याना बाहेर काढले व तातडीने उपचार साठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते यामध्ये प्रशिक गौतम शेळके(वय १३) ,पलक शेळके (वय १७) आणि छबाबाई शंकर शेळके(वय ६८) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून हे तिघेही झोपलेल्या अवस्थेत दबले यामध्ये ते जखमी झाले आहे त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी आणले आहे दरम्यान एकाच गावात दोन घरे पडल्याने संसार उपयोगी साहीत्याचे पुर्ण नुकसान झाले आहे हे गोरगरीब कुटुंब उघड्यावर आले आहे परंतु सुदैवाने ह्या घटनेत कुढल्याही जीवीतहानी झाली नाही तरी प्रशासनने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

 चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान   नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे. चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

गौरी लंकेशचा मर्डरर पांगारकरच्या शिंदेच्या सेनेतील प्रवेशाला स्थगीती

मुंबई: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यावर २४ तासाच्या आतच या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा…

ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरेंना संधी

कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी     ठाणे: भाजपकडून जाहिर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ठाण्याच्या ८ मतदारसंघांचा समावेश आहे. हरयानाच्या धर्तीवर भाजप यंदाच्या निवडणुकीत अँटी इन्कन्म्बन्सीचा फटका टाळण्यासाठी भाकरी फिरवेल आणि नव्या चेहऱ्यांना…