विश्वकौतुक पाणी विषयक दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा
मुंबई – पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे.मोठ मोठी शहरे अपु-या पाणी पुरवठ्यामुळे चिंतीत आहेत. भूगर्भातूनही पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाढते उद्योग यांच्यामुळे…
सगे -सोयरे अध्यादेशाला कुणबी समाजासह सर्व ओबीसी संघटनांचा विरोध
कुणबी समाजोन्नती मंडळाकडून मुरबाड तहसीलदार यांना निवेदन राजीव चंदने मुरबाड : राज्यातील महायुतीचे सरकार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल याचे लाड पुरवत असून त्याने केलेल्या मागण्या सरकार पूर्ण करत आहे. हा एक प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय असून शासनाने सगे – सोयरे या काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास ओबीसी समाजाचा राज्यात ठिक ठिकाणी प्रखर विरोध होत आहे, सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देणे बंद करावे अन्यथा सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल . मराठा समाजाच्या हितासाठी काढलेल्या सगे -सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर नको व मराठ्यांना कुणबी दाखले देणे बंद करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन आज मुरबाड तहसीलदार यांना मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे, सरचिटणीस अरविंद विशे, माजी खजिनदार सदानंद मोरे, समाज सेविका योगिता शिर्के, ओबीसी युवा नेते मिलिंद मडके, पत्रकार दिलीप पवार, माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर वडवले, संजय हंडोरे (पाटील), संतोष राऊत उपस्थित होते, यावेळी तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी निवेदन स्विकारून समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
भागिदारीविना महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यास बौध्द समाज नाखूष
आंबेडकरवादी संघटनांचा सूर मुंबई : निवडणुकीत ‘स्वबळावर लढत ‘ आणि ‘ तिसरी आघाडी ‘ हे दोनही पर्याय आंबेडकरवादी राजकारणासाठी निरुपयोगी आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याद्वारे राज्यसभेत भाजपला बहुमत मिळू न देण्यासाठी तत्वतः महाविकास आघाडीला साथ देण्याची भूमिका अनेक आंबेडकरवादी पक्ष – संघटनांची जरूर आहे. मात्र अधिकृत संवादाशिवाय आणि प्रतिनिधीत्व, सत्तेत भागीदारी न देताच राज्यातील बौद्ध समाजाचा पाठिंबा गृहीत धरण्याची महाविकास आघाडीच्या धुरिणांची मानसिकता स्पष्ट होवू लागली आहे. परिणामी: लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला एकतर्फी आणि बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत आंबेडकरी समाजात नाखुषीची भावना वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती घडण्याची खात्री कुणीही देवू शकत नाही. हा सूर मुंबईत फोर्ट भागात सोमवारी झालेल्या आंबेडकरवादी पक्ष – संघटनांच्या एका बैठकीतून निघाला आहे. या बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, पँथर नेते सुरेश केदारे, रिपब्लिकन पक्ष ( खोब्रागडे) चे प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवणे, रामविलास पासवान यांच्या दलित सेनेचे नेते रवी गरुड, प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, विदर्भातील ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्राचार्य रमेश जाधव, प्रा. एकनाथ जाधव, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, सतीश डोंगरे, ॲड. जयमंगल धनराज आदी उपस्थित होते. वास्तवाचे भान ठेवा लोकसभा निवडणुकीतील भाजप – एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील मतांच्या टक्केवारीचा फरक हा केवळ एक – दीड टक्क्याचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होवू नये, अशी आमची इच्छा आहे. मात्र तसे घडू द्यायचे नसेल तर महाविकास आघाडीनेही वास्तव परिस्थितीचे भान ठेवावे, असे आवाहन बैठकीनंतर उपस्थित नेत्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. मते लुटण्याचे मनसुबे ? राज्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या ही सुमारे १ कोटी इतकी असून विधानसभेच्या १८९ जागांवर प्राबल्य आहे.असे असतांनाही त्या समाजाला सत्तेत कोणतीही भागीदारी न देता मतांची लयलूट करण्याचे मनसुबे कितपत योग्य आहेत, असा सवाल महाविकास आघाडीला बैठकीतून करण्यात आला आहे. छोट्या पक्षांना सोबत घ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेचे लक्ष्य चुकवायचे नसेल तर छोट्या मोठ्या परिवर्तनवादी पक्षांना सन्मानाने सोबत घेण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेण्याची गरज आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. महाविकास आघाडी स्वप्न रंजनात दंग महाविकास आघाडी ही आंबेडकरवादी पक्ष – संघटनांबरोबरच डाव्या, पुरोगामी छोट्या पक्षांनाही दूर लोटतांना दिसत आहे. त्यावरून आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून आरशात स्वतःचाच चेहरा दिसू लागला आहे. ते सारे मंत्रिपदाच्या शपथविधि सोहळ्याच्या स्वप्न रंजनात दंग झाले आहेत, असे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अनेकरंगी लढतींना आघाडीच जबाबदार महाराष्ट्रात समविचारी मित्र पक्षांना सोबत न घेतल्यामुळे राज्यात मतविभागणी करणाऱ्या अनेकरंगी लढती झाल्या तर त्याला महाविकास आघाडीच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी दिला आहे. 0000
साई बाबांचा पुण्यतिथी दिन मुलुंडमध्ये उत्साहात साजरा
मुंबई : मुलुंड पूर्व येथील पाम एकर सोसायटीत साई बाबांच्या पूजास्थानवर रविवारी बाबांचा पुण्यतिथी दिन शेकडो साई भक्तांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या पुण्यतिथीनिमित्त बाबांसाठी आराधना विधी करुन भक्तांनी त्यांचे पुण्यस्मरण केले. या…
भाजपच्या मुरबाडवर शिवसेनेचा दावा
शिवसेनेचे वामन म्हात्रे, सुभाष पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षांतर्गत कुरघोड्या वाढत असताना महायुतीतील पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीनेही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. बुधवारी बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भिवंडी लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुरबाड मतदारसंघाची मागणी केली आहे. मुरबाड मतदारसंघात बदलापूर आणि ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे आमचा दावा आहेच, असे म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध भाजप असे चित्र उभे राहिले आहे. विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षातील माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आघाडी उघडली आहे. नुकताच कपिल पाटील यांनी मुरबाडमध्ये कथोरे विरोधक आणि समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला निष्ठावंतांचा मेळावा असे नाव दिले. या मेळाव्यात पाटील यांनी कथोरे यांना थेट अपक्ष लढण्याचे सांगत ताकद दाखवण्याचे आव्हान केले. तसेच यावेळी कथोरे यांनी केलेल्या भूमीपूजन आणि इतर अनेक गोष्टींवरून कथोरे यांना लक्ष्य केले. लोकसभेत आलेले गद्दारीचे मळभ दूर करायचे आहे असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. जुन्या जाणत्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांची मोट बांधण्याचा कपिल पाटील यांचा प्रयत्न असतानाच दुसरीकडे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारीही आमदारकीसाठी गुढघ्याला बाशिंब बांधून तयार आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहराचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. भाजपातील अंतर्गत कलहामुळे महायुतीची भिवंडी लोकसभेची जागा हातून गेली. आता विधानसभेतही तसाच प्रकार सुरू आहे. त्यात या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे अशावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. बुधवारी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत मुरबाड मतदारसंघ शिवसेनेला घ्यावी अशी मागणी केली. म्हात्रे आणि पवार दोघेही इच्छुक असून ती तयारी दोघांनीही केली आहे. त्यामुळे आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षातील कपिल पाटील यांची आघाडी तर महायुतीतील शिवसेनेचे आव्हान असणार हे स्पष्ट झाले आहे. दावा का आणि चर्चा काय ? किसन कथोरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार होते. त्यांचा आजही त्या पक्षात चांगला संपर्क आहे. भाजपातून स्थानिक पातळीवर होणारा विरोध पाहता कथोरे पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे असे झाल्यास येथे शिवसेनेची तयारी असावी, म्हणून ही मागणी केली जात असल्याचे खात्रीलायक माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने खासगीत दिली आहे. मात्र कथोरे यांच्या गटाकडून यावर प्रतिक्रिया दिली जात नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांनी मला भाजपातून तिकिट मिळत असताना मी अपक्ष का लढू अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे कथोरे भाजपातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. 0000
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले
बदलापूर : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहिर केलेल्या ब्राह्मण समाजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या आशिष दामले यांनी निवड करण्यात आली आहे. आशिष आनंद दामले…
विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- डॉ. कैलास शिंदे
नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा करण्यात आली असून मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांची…
बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत स्वरूप सावळकर, चारुशीला नाईक विजेते बँक ऑफ बडोदा-
मुंबई विभागीय बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष गटात फिडे गुणांकित बुध्दिबळपटू स्वरूप सावळकरने तर महिला गटात चारुशीला नाईकने विजेतेपद पटकाविले. द्वितीय मानांकित स्वरूप सावळकर विरुध्द प्रथम मानांकित तमोजीत चक्रबर्ती यामधील…
