Month: October 2024

उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही

उरण : गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेला याचा फायदा होणार…

 कुलकर्णी, खर्डेकर संयुक्त आघाडीवर

 पहिली अखिल भारतीय फिडे रेटिंग खुली बुद्धिबळ स्पर्धा मुंबई : एसएमसीए-चेस स्कूल आयोजित पहिल्या अखिल भारतीय फिडे रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवलेले मुंबईचे चॅलेंजर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी आणि अर्णव खर्डेकर हे संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. रशियन हाऊस, पेडर रोड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत बुधवारी अव्वल क्रमांकावर असलेल्या कुलकर्णीने (2185) काळ्या मोहऱ्यानिशी खेळत निझमो इंडियन क्लासिकच्या सलामीला दिल्लीच्या सैकत नाथविरूद्ध (1829) टॉप बोर्डवर निवडले. दडपणाखाली असलेल्या दिल्लीच्या खेळाडूने 29व्या चालीवर चूक केली आणि कुलकर्णीने संधी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, खर्डेकर (1846) पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळत यश कापडी विरुद्ध (1818) फिलिडोर बचावाच्या सलामीने सुरुवात केली आणि डावावर संपूर्ण नियंत्रण राखले. मात्र,  47व्या चालीतील चूक महागात पडली. निकाल – टॉप १०: सातवी फेरी: एआयएम सैकत नाथ (५.५) पराभूत आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (६.५) ०-१; अथर्व सोनी (6) बरोबरी वि. यश वाटरकर (6) 0.5-0.5; अर्णव खर्डेकर (6.5) विजय वि. यश कापडी (5); उडुपी आचार्य (5) पराभूत संजीव मिश्रा (6); दर्श शेट्टी (6) विजयी वि. आतिश लद्दड (5) 1-0; दीपक सोनी (5) पराभूत वि. गुरुप्रसाद कुलकर्णी (6) 0-1; तरुण एन (5) पराभूत वि. क्षौनीश जैस्वाल (6) 0-1; शुभ पटेल (5) पराभूत वि. कार्तिक कुंभार (6) 0-1; युती पटेल (6) विजयी वि. प्रिशा मरगाई (5) 1-0; श्रद्धा पडवेकर (4.5) पराभूत वि. ओम गडा (5.5) 0-1. 000

मिरा-भाईंदरमध्ये ६८ हजारांनी मतदार वाढले

भाईंदर : मेमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदर मतदारसंघात मतदारांची संख्या तब्बल ६८ हजारांनी वाढली आहे. या मतदारसंघात आता पाच लाख सात हजार ५४२ मतदार झाले आहेत.…

वर्षोनुवर्षे एकाच विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

काहींची पदोन्नती झाल्याने त्यांची दिवाळी गोड उल्हासनगर – सामान्य प्रशासनाच्या अहवालानुसार आयुक्त विकास ढाकणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर काहींची…

माथेरानची राणी नोव्हेंबरमध्ये येणार रुळावर

माथेरान : सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन १ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही…

मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी १५० कोटींचा विकास निधी – आनंद परांजपे/नजीब मुल्ला

अनिल ठाणेकर ठाणे : मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी १५० कोटींचा भरघोस विकास निधी महायुती सरकारने उपलब्ध करून दिला असून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन

 राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच निवडणूक खर्च करण्याचे केले आवाहन ठाणे : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, याबाबत जिल्हा…

सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळले काळाराम मंदिर

हरिभाऊ लाखे नाशिक : काळाराम मंदिराच्या आवारात सौरऊर्जेचा वापर करीत वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या ओवरीच्या वरील भागात सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या सीएसआरअंतर्गत साडेचौदा…

टोलमुक्तीनंतर आनंदनगर टोलनाक्याची रचना बदलणार

ठाणे : मुंबईच्या प्रवशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हलक्या वाहने कोंडीत अडकू नये यासाठी आता आनंदनगर टोलनाक्यावर नव्याने रचना करण्याचे नियोजन टोल कंपनीकडून सुरू आहे. त्यानुसार, टोलमुक्त मोटारी आणि इतर वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई शहरातून लाखो नोकरदार त्यांच्या वाहनांनी मुंबई गाठत असतात. या वाहन चालकांना टोल आकारला जातो. त्यामुळे दररोज वाहन चालकांना टोलचा फटका सहन करावा लागत होता. मुलुंड आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाक्यावरून अधिक वाहनांची वाहतुक होत असते. टोलनाक्यावरील काही मार्गिका या फास्टॅग असलेल्या मोटारी आणि काही मार्गिका दैनंदिन टोल वसूलीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. टोल वसूली दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाल्यास कोंडीची समस्या चालकांना सहन करावी लागते. टोल वसूलीविरोधात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली होती. अखेर राज्य शासनाने आता हलक्या वाहनांसाठी मुंबईच्या पाचही टोलनाक्यावर वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज मोटारीने मुंबई गाठणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय लागू झाल्याने आनंदनगर येथील टोलनाक्याची रचना बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यानुसार, आराखडा तयार केला जात असून येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले दोन टोलनाके हटविले जाण्याची शक्यता आहे. तसेच मालवाहू वाहनांना किंवा टोलमाफीपासून वगळण्यात आलेल्या वाहनांना इतर मार्गिकेतून प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी दिल्यानंतर लहान आकाराचे ट्रक, टेम्पो चालक देखील टोल नाक्यावर टोल देण्यास टाळाटाळ करत होते. हलक्या वाहनांनामध्ये आमची वाहने मोडतात असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. तर टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून टोल मागितला जात होता. त्यामुळे चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र विविध टोलनाक्यांवर पाहायला मिळत आहे.  

ठाण्यात जागोजागी कचऱ्याचे ढिग

काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी ठाणे : संपुर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जागोजागी कचऱ्याचे ढिग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात साचलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण आहेत. तसेच या कचऱ्यामुळे शहरावासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी झाल्याचे सांगत येत्या दोन दिवसांत हा कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. परंतु त्यास विरोध झाल्यानंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिकेने शहराबाहेर म्हणजेच भांडर्ली येथे तात्पुरती कचराभुमी उभारली होती. डायघर कचरा प्रकल्प सुरु होताच भांडर्ली कचराभुमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला डायघर प्रकल्प सुरळीतपणे सुरू होता. परंतु गेल्या काही डायघर प्रकल्प बंद पडल्याने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा गाड्या वागळे इस्टेट येथील सी पी तलाव आणल्या जात होत्या. यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागल्याने त्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. एका वाहनांची दोन ते तीन वेळा फेरी व्हायची पण, वाहनांच्या रांगामुळे एकच फेरी होऊ लागली. दिवसाच्या सुमारे ५० ते ६० टक्के फेऱ्या रद्द होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे कचरा ओला होऊन तो कुजत आहे. या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कचऱ्यामुळे शहरावासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकट काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी झाली आहे. सी पी तलाव येथे कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा वाढल्या. या वाहनकोंडीमुळे कचरा उचलणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे कचरा साचल्याचे दिसून येत आहे. परंतु डायघर प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला असून शहरातील कचरा आता उचलण्याचे काम सूरू झाले आहे. जादा वाहने आणि मनुष्यबळाचा वापर करून कचरा उचलण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.