Month: October 2024

महाराष्ट्रासह देशातून पावसाचा परतीचा प्रवास

मुंबई : महाराष्ट्रासह देशातून परतीच्या पावसानं निरोप घेतला आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात दिनांक १४ ऑक्टोबरपर्यंत १० दिवस मुक्काम ठोकून होता. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबरला मात्र, परतीच्या पावसाने, महाराष्ट्राबरोबर सीमावर्ती मध्यप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक राज्यातून…

जानकरांचा महायुतीला धक्का; स्वबळावर सर्वजागा लढणार

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीला धक्का देत महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती.…

बंडोबांना थंड करण्यासाठी महामंडळावर घाऊक भरती

 मुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीत दगाफटका होऊ नये म्हणून बंडोबांना थंड करण्यासाठी तब्बल २७ महामंडळांवर सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची घाऊक भरती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास…

आचारसंहिता धाब्यावर बसवून शासनाकडून अनेक निर्णय जाहीर

  निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा   मुंबई :  विधानसभेसाठी राज्यात आचारसंहिता लागू असतनाही ती धाब्यावर बसवून शासनाव्दारे अनेक निर्णय जाहिर करण्यता आल्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उचलला. निवडणूक आयोगाने…

आश्चर्य ! सिंधूदुर्गातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही

राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात पराकोटीची राजकीय तेढ असतानाही आश्चर्यकारक रित्या येथील एकही मतदान केंद्र हे संवेदनशील नसल्याचे आज जाहिर करण्यात आले आहे. राजकीय पक्ष जास्त सुसंस्कृत झालेत की पोलिसांचा दरारा वाढलाय…

शिंदेंच्या ठाण्यात संतापजनक घटना

 अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला जामीन ० संतप्त कुटुंबीयांचा ठिय्या आंदोलन ० मनसे आक्रमक अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यात संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ…

मुख्यमंत्र्यांनी रेट कार्डवर आधी बोलावे: नाना पटोले

मुंबई  : कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्ट कार्डएवेजी आधी रेटकार्डवर बोलावे असा…

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली

नवी दिल्ली- न्याय यापुढे आंधळा असणार नाही असा प्रतिकात्मक संदेश देत भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचुड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नव्या शिल्पात…

जगातील सर्वांत कमी वयाच्या मुलीचा हात बदलला

रमेश औताडे मुंबई :खेळात असताना १६ ऑक्टोबर २०२२ मध्ये विजेचा धक्का लागल्याने अनामता अहमद हिला तिचा उजवा हात गमवावा लागला होता. तब्बल दोन वर्षांनी  मुंबईतील ग्लेनईगल हॉस्पिटल मध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. महिनाभरानंतर तिला घरी सोडण्यात येणार असून परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांकडून तिच्या या धाडसाचे कौतुक करण्याचा आनंदी सोहळा आयोजित केला होता. ही शस्त्रक्रिया पशस्वीरित्या पार पाडणारे डॉ. नीलेश सतभाई (विभाग प्रमुख-प्लास्टिक, हैंड, रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांटेशन) आणि त्यांच्या टीमचे अनामता ने आभार मानले. दोन वर्षांपूर्वी, गोरेगाव, मुंबई येथील 13 वर्षीय अनामता अहमद सुट्टीसाठी उत्तर प्रदेशातील अलीगढ़ या तिच्या मूळ गावी गेली होती. तिच्या चुलत भावांसोबत खेळत असताना, तिने चुकून टेरेसवरील 11 KV तारेला स्पर्श केला, परिणामी विजेचा जोरदार धक्का बसला ज्यामुळे ती भाजली. तिच्या उजव्या हाताला गैंगरीन झाला आणि तीनदा हात कापावा लागला. तिच्या डाव्या हातालाही मोठ्या जखमा आणि गंभीर दुखापत झाली होती. हात प्रत्यारोपण हा एकमेव योग्य उपाय असल्याचे त्यांना समजताच त्यांनी संपूर्ण भारतातील अनेक रुग्णालये आणि सिंगापूर आणि थायलंडमधील काही केंद्रांना भेट दिली. मात्र या सर्व केंद्रांवर हात प्रत्यारोपण करण्यास नकार देण्यात आला. शेवटी ते ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबई येथे आले आणि डॉ. सतभाईंचा सल्ला घेतला. तिच्या कुटुंबीयांनी प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली असता योग्य दाता मिळण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. महिन्यापूर्वीच अनामताच्या हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अशा प्रकारचे प्रत्यारोपण मिळवणारी जागतिक स्तरावर सर्वात तरुण प्राप्तकर्ता म्हणून तिने नवा इतिहास रचला आहे. अनामता हिला सूरत येथील 9 वर्षांच्या मेंदूमृत दात्याकडून हात मिळाला, जो आजपर्यंत देशातील सर्वात तरुण दाता आहे. हा क्षण म्हणजे आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. कार्यक्षम हातांशिवाय जीवन अतिशय अवघड आहे. दाता आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. या नवीन हाताने, मी माझे भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे. हे यशस्वी प्रत्यारोपण माझ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर हे शक्य झाले असून मी डॉ. नीलेश सतभाई आणि त्यांच्या टीमची सदैव ऋणी आहे अशी प्रतिक्रिया अनामता अहमद हिने व्यक्त केली. हात दान करणे हे आजही दुर्मिळ आहे कारण कित्येक कुटुंब यासाठी नकार देतात. परंतु दिवसेंदिवस याबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनामताची दुखापत गंभीर होती तिची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असून या शस्त्रक्रियेला जवळपास 12 तास लागले. अंगदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी २० वर्षांहून अधिक काळ काम केल्याने, या हात प्रत्यारोपणासाठी देणगीदार कुटुंबाशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा मला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया अवयव दान प्रक्रिया अनुभव तज्ञ निलेश मांडलेवाल यांनी दिली. डॉ. बिपिन चेवले  मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लेनईगल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई व इतर डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

धनगर समाजाचा विश्वासघात करणाऱ्यांना मतदार धडा शिकवणार – प्रकाश शेंडगे

रमेश औताडे मुंबई :धनगर समाजाला आरक्षणाचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आमचा विश्वासघात करण्यात आला आहे. मात्र आचारसंहितेच्या अगोदर जीआर काढायला सरकार अपयशी ठरलेले आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने काहीच न केल्यामुळे धनगर समाजातील लोकांनी उमेदवार पाडण्याच ठरवले असून ओबीसी बहुजन आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आम्ही ठरवले आहे. असे ओबीसी नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जेथे धनगर तिथे तेथे धनगर उमेदवार, लिंगायत तिथे लिंगायत ,आदिवासी तेथे आदिवासी असे उमेदवार आम्ही देणार आहेत. ओबीसी बहुल अशी ही निवडणूक होताना पाहायला मेळेल.  महाराष्ट्रात ओबीसी पर्याय म्हणून आम्हाला पसंती मिळणार आहे. मराठा ओबीसी वाद पाहता बीड जिल्ह्यातला ओबीसी संतापलेला आहे ४६ पैकी २५ उमेदवार तयार झालेले आहेत, येणाऱ्या २० तारखेला आम्ही उमेदवार जाहीर करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०, उत्तर महाराष्ट्र ५ आणि विदर्भातही आमच्याकडे ओढा आहे .जरांगे फॅक्टर जे जे उमेदवार उभे करतील, तर त्यांचे लेबल लावलेले कुठल्याही पक्षाचा असू द्या तो प्रत्येक उमेदवार ओबीसी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. १६० आम्ही पाडू आणि १६० निवडून आणू. अनेक जण आता ओबीसींचे उमेदवार शोधत आहेत, यावेळी या निवडणुकीत ओबीसी दलितांच्या हिताचे बोलेल तोच राज्यावर राज्य करणार आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये चिन्ह मिळणार असून ते चिन्ह चहाची किटली असेल आम्ही त्याचीच मागणी केली आहे असे शेंडगे म्हणाले. 00000