स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
ठाणे : एक दिशा मार्गिका असतानाही वाहतुक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करत असतात. अशा वाहन चालकांना वचक बसावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी भागात महत्त्वाच्या…
ठाणे : एक दिशा मार्गिका असतानाही वाहतुक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करत असतात. अशा वाहन चालकांना वचक बसावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी भागात महत्त्वाच्या…
ठाणे : ग्रंथाली वाचक दिनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांसह ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला तीन हजाराहून अधिक ठाणेकरांनी भेट दिली. तर, दोन हजार पुस्तकांची या प्रदर्शनात विक्री…
शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल डोंबिवली : येथील एमआयडीसीतील आजदे पाडा भागात बालाजी मंदिर परिसरातील एका रस्त्यावरील जलवाहिनी काही महिन्यांपासून फुटली आहे. या जलवाहिनीतील पाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहून जाते. या…
उल्हासनगर : सरत्या वर्षाच्या अगोदर मालमत्ता थकीत कर भरणा करा अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिका प्रशासनाने थकबाकीदाराना दिली आहे. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या थकबाकीदारांविरुध्द मालमत्ता कर विभागामार्फत कर वसुली…
अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी “थर्टी फस्ट” चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर,वर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता, अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दुष्टीकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरीकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरीता २८ डिसेंबरला सकाळी ६.०० ते दि.२९ डिसेंबर ४.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. 0000
अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही उल्हासनगर: उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शुक्रवारी सहा ते सात तास अंधारात होते. वीज नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. शुक्रवारी महावितरणाकडून स्थानिक परिसरात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होता. तर रुग्णालयातील पर्यायी वीज व्यवस्थाही त्याचवेळी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. एकाच दिवशी दोन्ही यंत्रणा बंद असल्याने रुग्णांचे मात्र हाल झाले. यादरम्यान अनेक शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. यापूर्वीही रुग्णालय अंधारात गेल्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होतो आहे. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू राहतो. मात्र शुक्रवारी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले होते. परिणामी संपूर्ण रुग्णालयाचा वीज पुरवठा १२ वाजल्यापासून खंडित झाला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता. वार्डातले दिवे, पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. सुदैवाने अतिदक्षता विभागात पर्यायी व्यवस्था असल्याने यंत्रणा सुरू होती मात्र या काळात रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि प्रसूती बंद ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली. एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची असल्यास आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे शस्त्रक्रिया करतो, अशी माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली. अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय तीन ते चार तालुक्यांसाठी महत्त्वाचे आहे. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. आधीच खाटा नसल्याने येथे रुग्णांना खाली झोपवून उपचार घ्यावे लागत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. त्यात आता या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीही वीज पुरवठा बंद गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्याचा रुग्णालयातील रुग्णांना मोठा फटका बसला होता. ऐन उन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची लाही लाही झाली होती. त्याचवेळी अनेक विभाग बंद झाले होते. शुक्रवारी अशाच प्रकारे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचे हाल झाले. रुग्णालय प्रशासन याबाबत नियोजन केल्याचे सांगत वेळ मारून नेत असले तरी रुग्णांचे मात्र या काळात हाल झाले. 900000
मुंबई : येथील एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाज कार्य विभागाने समाजकार्य विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेले पाच दिवसीय ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव…
डिसेंबरमध्ये दररोज सरासरी ८४४ शेतकऱ्यांना लाभ मुंबई : शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घ काळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. राज्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात २६ पर्यंत २१,९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले, अर्थात दररोज सरासरी ८४४ पंप बसविण्यात आले. ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे. राज्यात २०१५ पासून २०२३ पर्यंत विविध योजनेत १,८०,००० सौर पंप बसविण्यात आले होते. तथापि, या वर्षी मार्च २०२४ पासून आतापर्यंत फक्त आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात १,५८,००० सौर पंप बसविण्यात आले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते. 00000
माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून आयोजन ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : कोपरीवासीयांच्या डोक्यावर हक्काच्या घराचे छत असावे, विकसकाकडून होणारी फसवणूक टळून घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी कोपरी येथील सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञात जागर करण्यात आला. कोपरीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत व विकसकांकडून होणाऱ्या संभाव्य फसवणुकीबाबत रहिवाशांचे प्रबोधन करण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रमांतून नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. कोपरीमध्ये मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहेत. या पार्श्वभूमीवर महायज्ञाचे औचित्य साधून भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला कोपरी भागातील रहिवाशी सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी कोपरीच्या भविष्यातील विकासाबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. कोपरी परिसरातील ३० टक्के सोसायट्या सीआरझेड २ मध्ये येत आहेत. मात्र, या प्रश्नावर माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी पुढाकार घेऊन रहिवाशी सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत नवी दिल्लीत दाद मागितली. त्यानंतर २०१९ च्या कायद्यानुसार दिलासा मिळाला असून, आता सीआरझेड २ मधील इमारतींचाही विकास होऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९-अ नुसार पुनर्विकासासाठी प्रत्येक सोसायटीने नियमानुसार प्रक्रिया राबवावी. एखाद्या विकसकाकडून वाढीव `एफएसआय’ व अन्य आश्वासनांना बळी पडू नये. त्या विकसक कंपनीचा पूर्वेतिहास तपासावा. त्यांनी पूर्ण केलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी करुन तेथील रहिवाशांकडून माहिती घ्यावी. त्यानंतरच सोसायटीने पुनर्विकास प्रकल्प राबवावा, असे आवाहन वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी केले. कोपरीवासियांना कोपरीतच घराचा प्रयत्न जागांच्या वाढत्या किंमतीमुळे ठाण्यातील कुटुंबे बदलापूर, कर्जत, टिटवाळ्यापर्यंत स्थलांतरीत झाली. परंतु, कोपरीतील रहिवाशांनी कोपरीतच नव्या घरात राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सोसायट्यांनी एकत्रित येऊन निविदा प्रक्रिया राबवून सोसायटीचा विकास करावा. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना सर्वोतोपरी साह्य केले जाईल, असे आश्वासन. भरत चव्हाण यांनी दिले. कोपरीवासियांना चांगले व रुंदीकरण झालेले रस्ते, उत्तम मार्केट, नाट्यगृह आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीकोनातून `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ साकारले जात आहे, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी दिली. 0000