Month: December 2024

डहाणूसह, तलासरी तालुक्यात अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त

00000 कासा : डहाणू तालुक्यासासह तलासरी तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया विधानसभा निवडणुकीमुळे अर्धवट राहिल्याने तालुक्यातील बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली…

अंबरनाथ शहरातील पाणी योजनेचे काम रखडले

अंबरनाथ : मागील अनेक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरकारने अंबरनाथ शहरासाठी तब्बल 258 कोटी रुपयांची अमृत योजना टप्पा दोन मंजूर केली आहे.…

कुख्यात गुंड विशाल गवळीसह पत्नी साक्षीलाही अटक

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगावात निर्जनस्थळी देऊन हत्या करण्यात आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर 24 तास उलटून जात…

भाजपा, विश्वास सामाजिक संस्थेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम ठाणे : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन जलसिंचन क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक आनंद भागवत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या सदस्य वृषाली वाघुले यांनी शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी विश्वास सामाजिक संस्थेकडून शिबीर भरविले जात आहे. या शिबिराला भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, भाजयुमोचे शहर सरचिटणीस प्रशांत कळंबटे, महिला मोर्चाच्या ओवळा मंडल अध्यक्षा अर्चना पाटील, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध सेल प्रमुख यांनी भेट दिली.

जे.जे. रुग्णालयात नववर्षापासून यंत्रमानव करणार शस्त्रक्रिया

 डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना दिले जातेय प्रशिक्षण मुंबई : जे.जे. रुग्णालयत येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अधिक सहज व सुलभ पद्धतीने पार पाडव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सिम्युलेटरचा वापर केला जात आहे. खासगी रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातात. यंत्रमानवाच्या मदतीने अचूक आणि सखोल पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होते. मात्र या पद्धतीची शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती परवडणारी नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही याचा लाभ व्हावा यासाठी जे.जे. रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानव आणण्यात आला आहे. या यंत्रमानवाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ व परिचारिका या प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये सध्या डॉक्टर व तंत्रज्ञांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी रुग्णाालयामध्ये सिम्युलेटरचा वापर करण्यात येत आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याबरोबरच यंत्रमानवाच्या वापरासाठी उभारण्यात येत असलेले स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे प्रशिक्षण व काही तांत्रिक कामे पूर्ण होताच जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात होणार आहे. यंत्रमानवाच्या मदतीने करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्त्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो, अशी माहिती शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. कशी होते यंत्रमानवाची मदत प्रचलित पद्धतीने शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना रुग्णांच्या चारही बाजूने फिरणे शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यंत्रमानवामध्ये असलेले कॅमेरे शस्त्रक्रिया करताना मानवाच्या शरीरातील प्रत्येक भाग अधिक सूक्ष्मपणे दाखवतो. तसेच यंत्रमानवाच्या हाताला असलेला प्रोब ३६० अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करणे सोपे जाते. यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपये खर्च जे.जे.रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना अद्ययावत व यंत्रमानवाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा लाभ व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर.

मुंबई: पिंपरी-चिंचवड विरुध्द पालघर, यजमान सांगली विरुध्द उस्मानाबाद या कुमारी गटाच्या उद्घाटनीय सामन्या बरोबरच अन्य चार सामन्याने सांगलवाडी, सांगली येथील ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ…

नवी मुंबईतील होल्डींग पाँडच्या पुनर्जिवीकरणासाठी गतीमान कार्यवाही

नवी मुंबई: नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने विशेषत्वाने पावसाळी कालावधीत समुद्राच्या भरतीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सिडकोने नवी मुंबई वसविताना डच पध्दतीने धारण तलावांची (होल्डींग पाँड) रचना…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्या – दीपक घाटे

रत्नागिरी : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त…

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर – डॉ.अंबादास देवमाने

अशोक गायकवाड रायगड :जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता २६ डिसेंबर, २७ डिसेंबर आणि २८ डिसेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वानी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे. या शिबिरामध्ये मेडिसीन विभाग-उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तपासणी व उपचार, हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X -ray, USG, ECG (stemi), डोळ्यांची तपासणी-डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप, मोफत चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी-महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोग तपासणी, नाक,कान, घसा तपासणी व शस्त्रक्रिया, गरजेनुसार एन्डोस्कोपीद्वारे कानाची श्रवण वाटप, ऑर्थोपेडिक-चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा, दंत विभाग- मुख आरोग्य तपासणी, दातांचे आजार, कवळी बसवणे, सर्जरी-हर्निया, हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया, मानसिक-मानसिक आजार तपासणी, उपचार व तपासणी, आयुष-पंचकर्म, आयुर्वेद उपचार, समुपदेशन, आभाकार्ड-मोफत आभाकार्ड काढून दिले जाईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.

पक्षाचा एक नंबर कायम ठेवायचा आहे – आमदार संजय केळकर

अनिल ठाणेकर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर हूरळून जाण्याची गरज नाही. त्याच ताकतीने आणि एकजुटीने पुन्हा आपल्याला कामाला लागायचे असून पक्षाचा एक नंबर कायम ठेवायचा आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे जरुरीच आहे असे मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्यता नोंदणी कार्यशाळेत उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ह्यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उत्तर रायगड जिल्हा सदस्य  नोंदणी कार्यशाळा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल येथे पार पडली.