कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आरटीओला पत्र
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बोध चिन्हाचा गैर वापर होत असल्याची तक्रार एका जागरूक नागरिकातर्फे करण्यात आली होती. त्या तक्रारीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष जयपाल कांबळे यांनी बोधचिन्हाचा गैर वापर करणा-या खाजगी वाहन चालकांवर कार्रवाई करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
आमरण उपोषणाचा इशारा मिळताच मनपाने दखल घेत केडीएमसी प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उप प्रादेशिक विभागाला पत्र पाठवून महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा गैर वापर करणा-या खाजगी वाहन चालकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी सूचित केले आहे.
यामुळे आता सर्वांची नजर उप प्रादेशिक परिवहन विभागाकडे लागली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे मागील चार वर्षा पासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाही. पण बहुतांश माजी नगरसेवक आणि नगरसेविका आपल्या खाजगी वाहनावर महानगरपालिकेचे बोध चिन्ह लावून बिनधास्तपणे फिरत असतात. आता महानगरपालिका प्रशासनाकडून आदेश निघाल्या मुळे सर्वांना अनधिकृत रित्या लावलेले बोध चिन्ह काढायला लागते का आगमी काळात दिसेल.