Month: January 2026

देशातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग

देशातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग मध्य प्रदेशमधील घनदाट नौरादेही येथील वीरांगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जाणारा भोपाळ-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग 45 देशातील पहिला वन्यजीव-सुरक्षित महामार्ग ठरला आहे. या महामार्गाच्या बांधकामात…

हिंदुत्वातून जातकारणाकडे…

हिंदुत्वातून जातकारणाकडे… बऱ्याच काळापासून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ब्राह्मण मतदारांनी भाजपवर दृढ विश्वास ठेवला आहे. या निवडणुकांमधील आकडेवारीनुसार भाजपला 72 ते 82 टक्के ब्राह्मण मते मिळाली आहेत. म्हणूनच…

ही पराभवानंतरच्या प्रतिक्रीयेची रंगित तालिम – देवेंद्र फडणवीस

नागपूर : मतदानावेळी वापरण्यात आलेली शाई लगेच पुसली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवर ही तर पराभवानंतरच्या प्रतिक्रियची ते रंगित तालिम करीत असल्याची मिश्किल प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा : उद्धव ठाकरे 

मुंबई : मतदानाच्या दिवशीच टपाली मतपेट्या उघडल्या. ही कसली लोकशाही आहे? विरोधक रडीचा डाव खेळतायेत असं मुख्यमंत्री म्हणतात मग निवडणूक आयुक्त त्यांचे घरगडी म्हणून काम करतायेत का? लोकशाहीची थट्टा करणाऱ्या या निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. साम, दाम, दंड भेद याचा वापर सगळीकडे सुरू आहे. महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही त्यामुळे निवडणुकीत वाट्टेल ते करा अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गणेश नाईक यांचे मतदान केंद्रच फरार झाले. ४ तास मतदान केंद्र शोधायला लागले. ही एका मंत्र्यांची अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीवर इलाज नसेल तर निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायेत आणि सत्ताधाऱ्यांसमोर लाचारी करतायेत. पुरुष मतदारां समोर महिलांचा फोटो आहे. मतदान केंद्रावर भाजपा उमेदवाराच्या पाट्याच दिसतायेत. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. वन नेशन, वन इलेक्शन त्यासाठी मोदींना हवं. एकाच वेळी सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे. निवडणूक आयोगाचा संपूर्ण स्टाफ रोज काय करत असतो त्याचा छडा लावला पाहिजे. बसल्या जागी पगार खातायेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठेवावे लागतील. तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल. कोर्टात जाऊन करणार काय, एकदा कोर्टात गेले की पुढे ४  ते ५ वर्ष सुरूच राहते. निवडणूक आयोग झोपेचे सोंग करतंय. हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबईतून ठाकरेंची ‘एक्झिट’ ? एकनाथ शिंदेनी ठाणे राखले !

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकेसाठीची मतदान प्रक्रिया संध्याकाळी साडेपाच वाजत पूर्ण होताच दुरचित्रवाहीन्यांवर एक्झिट पोलचा धमाका सुरु झाला. जवळपास सर्वच एक्झिट पोलने मुंबईतून उद्धव ठाकेरंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक्झिट दाखवली असून मुंबईत…

मुंबईत मतदानाचा टक्का घसरला

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का घसरलाय. निवडणूकी आयोगाकडून दुपारी साडेतीन वाजता जाहिर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फक्त ४१.०८ टक्के मतदान झाले होते. मतदानाची…

अरबी समुद्रात थरारक पाठलाग पाकची ‘अल मदीना’ बोट ताब्यात

पाकिस्तानच्या ९ जणांना अटक कोस्ट गार्डची धडक कारवाई  भारतीय सागरी हद्दीत घुसखोरीचा संशय पोरबंदर : मुंबईत एन निवडणूकीची धामधूम सुरु असतानाचा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून काही शेकडो मैल अंतरावर अरबी समुद्रात कोस्ट…

पायाभूत क्षेत्रात १७ लाख कोटींची गुंतवणूक

पायाभूत क्षेत्रात १७ लाख कोटींची गुंतवणूक देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने अर्थ मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली. मंत्रालयाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत 17…

इंडियन आर्मी डे

इंडियन आर्मी डे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. देश स्वातंत्र्य करण्यासाठी लाखो ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हजारो, लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर…